7th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मार्च महिन्याचा शेवट गोड; महागाई भत्त्यात केली 3% वाढ, 1 जानेवारी 2022 पासून लागू होणार

काम-धंदा
भरत जाधव
Updated Mar 30, 2022 | 17:30 IST

 केंद्रीय कर्मचाऱ्यांना (Central Employees ) आज सरकारकडून (Government) मोठी बातमी मिळाली आहे. आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या (Union Cabinet) बैठकीत महागाई भत्त्यात (Dearness Allowance) ३ टक्के वाढ करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या आणि निवृत्तीवेतनधारकांच्या महागाई भत्त्यात तीन टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

central employees DA  increase
सरकारनं केली कमी केंद्रीय कर्मचाऱ्यांची महागाई,डीए वाढला   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • केंद्राच्या या निर्णयानंतर आता महागाई भत्ता 34 टक्क्यांवर गेला आहे.
  • केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या आणि निवृत्तीवेतनधारकांच्या महागाई भत्त्यात तीन टक्क्यांनी वाढ
  • सुमारे 48 लाख कर्मचारी आणि जवळपास 69 लाख पेन्शनधारकांना मिळणार लाभ

DA Hike : नवी दिल्ली :  केंद्रीय कर्मचाऱ्यांना (Central Employees ) आज सरकारकडून (Government) मोठी बातमी मिळाली आहे. आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या (Union Cabinet) बैठकीत महागाई भत्त्यात (Dearness Allowance) ३ टक्के वाढ करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या आणि निवृत्तीवेतनधारकांच्या महागाई भत्त्यात तीन टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्राच्या या निर्णयानंतर आता महागाई भत्ता 34 टक्क्यांवर गेला आहे. ही वाढ पूर्वलक्षी प्रभावाने जानेवारी ते जून 2022 पर्यंतसाठी असणार आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाचा फायदा देशातील सुमारे 48 लाख कर्मचारी आणि जवळपास 69 लाख पेन्शनधारकांना मिळणार आहे.  

किती वाढणार पगार?

केंद्रीय कर्मचारी (Central Government employees) आणि पेन्शनधारकांना 34 टक्क्यांने महागाई भत्ता मिळणार आहे. ही वाढ सातव्या वेतन आयोगाच्या शिफारसींवर आधारीत आहे. त्याशिवाय कर्मचाऱ्यांचे इतर भत्तेदेखील वाढणार आहेत. जर एखाद्या कर्मचाऱ्याला 56 हजार इतकं मूळ वेतन असल्यास त्याला 19 हजार 40 रुपये इतका महागाई भत्ता मिळणार. या कर्मचाऱ्याला वर्षाला दोन लाख 28 हजार 480 रुपये इतके वेतन मिळेल.  एखाद्या कर्मचाऱ्याचे मूळ वेतन 18 हजार रुपये असल्यास महागाई भत्ता म्हणून त्याला 6120 रुपये मिळतील. यानुसार, वर्षाकाठी 73 हजार 440 रुपये इतकी रक्कम मिळेल.   केंद्र सरकार वर्षातून दोनदा महागाई भत्त्यात वाढ करते. त्यानुसार आता, जुलै 2022मध्ये पुन्हा एकदा महागाई भत्त्यात वाढ होऊ शकते.  

महागाई भत्त्याची सुरुवात कधी? 

वाढती महागाई लक्षात घेता राहणीमानाचा स्तर कायम राखण्यासाठी केंद्रीय कर्मचाऱ्यांना तसेच राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता देण्यात येतो. देशात सर्वप्रथम, मुंबईमध्ये 1972 साली महागाई भत्ता देण्यात आला. त्यानंतर त्याचे अनुकरण केंद्र सरकारने करत केंद्रीय कर्मचाऱ्यांनाही महागाई भत्ता देण्याचा निर्णय घेतला. 

महागाई भत्ता (DA) म्हणजे काय?

महागाई भत्ता हा पगाराचा भाग आहे. ही कर्मचाऱ्याच्या मूळ पगाराची निश्चित टक्केवारी असते. देशातील महागाईचा प्रभाव कमी करण्यासाठी सरकार आपल्या कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता देते. तो वेळोवेळी वाढवला जातो. निवृत्त कर्मचाऱ्यांनाही याचा लाभ मिळतो.

DA नंतर पगार कसा बदलेल?

सोप्या भाषेत समजून घ्या, बेसिक पगारात ग्रेड वेतन जोडल्यानंतर त्या पगारात महागाई भत्त्याचा दर गुणाकार केला जातो. जो निकाल येतो त्याला महागाई भत्ता (DA) म्हणतात. आता हे एका उदाहरणाने समजून घेऊ, समजा तुमचा मूळ पगार 10 हजार रुपये आणि ग्रेड पे 1000 रुपये आहे. दोन्ही जोडल्यावर एकूण 11 हजार रुपये झाले. आता महागाई भत्त्यात 34% ने वाढ केली तर ती 3,740 रुपये आहे. सर्व जोडून तुमचा एकूण पगार 14,740 रुपये झाला. यापूर्वी, 31% DA नुसार, तुम्हाला 14,410 रुपये पगार मिळत होता. आता DA 31% वरून 34% केल्याने दरमहा 330 रुपये नफा झाला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी