डाबर कंपनी मसाला बाजारात प्रवेश करणार, 'बादशहा'चे 51 टक्के शेअर खरेदी करणार

dabur has entered masala bazaar will buy 51 shares of badshah masala : एफएमसीजी (Fast-moving consumer goods - FMCG) क्षेत्रातील मोठी कंपनी म्हणून लोकप्रिय असलेली डाबर कंपनी मसाला बाजारात प्रवेश करणार आहे.

dabur has entered masala bazaar will buy 51 shares of badshah masala
डाबर कंपनी मसाला बाजारात प्रवेश करणार  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • डाबर कंपनी मसाला बाजारात प्रवेश करणार
  • 'बादशहा'चे 51 टक्के शेअर खरेदी करणार
  • डाबर आणि बादशहा यांच्यातील व्यवहाराचा ब्रँडेड मसाला बाजारावर मोठा परिणाम होणार

dabur has entered masala bazaar will buy 51 shares of badshah masala : एफएमसीजी (Fast-moving consumer goods - FMCG) क्षेत्रातील मोठी कंपनी म्हणून लोकप्रिय असलेली डाबर कंपनी मसाला बाजारात प्रवेश करणार आहे. डाबर कंपनी बादशहा मसाला प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे 51 टक्के शेअर 587.52 कोटी रुपये मोजून खरेदी करणार आहे. या व्यवहारानंतर पाच वर्षांनी डाबर कंपनी बादशहा मसाला प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे बाकीचे 49 टक्के शेअर खरेदी करण्याचा व्यवहार करणार आहे. या व्यवहारामुळे अब्जावधी रुपयांच्या ब्रँडेड मसाला बाजारात डाबर कंपनीचा प्रवेश होणार आहे. 

बादशहा मसाला प्रायव्हेट लिमिटेड कंपनी कुटुन तयार केलेले मसाले, मिश्र मसाले, मसाला निर्मिती, मसाला मार्केटिंग, मसाला निर्यात या क्षेत्रात दीर्घ काळापासून कार्यरत आहे. आता 'बादशहा'चे 51 टक्के शेअर खरेदी करून डाबर कंपनी मसाला बाजारात दिमाखात प्रवेश करणार आहे. भविष्याचा विचार करून डाबर कंपनीने मसाला बाजारात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.

युनिलिव्हरला ग्रहण !, Dove आणि Tresemme Shampoo मुळे कॅन्सरचा धोका

Diwali 2022: या बँकांमध्ये मिळतायेत स्वस्त व्याजदरात कर्जे...पाहा जबरदस्त ऑफर्स

फूड सेक्टरमध्ये मोठी गुंतवणूक करण्याची तयारी डाबर कंपनी करत आहे. या तयारीचा एक भाग म्हणून कंपनीने 'बादशहा'चे 51 टक्के शेअर खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. ब्रँडेड मसाला बाजारात बादशहा हे नाव काही दशकांपासून गुणवत्ता, विश्वास आणि लोकप्रियतेचे प्रतिक झाले आहे. यामुळेच विस्तार योजनेत सर्वोच्च प्राधान्य देत 'बादशहा'मध्ये गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतल्याचे डाबर कंपनीने सांगितले. लवकरच फूड सेक्टरमध्ये मोठा विस्तार करणार असल्याचेही डाबर कंपनीने सांगितले.

सध्या डाबर कंपनी हेल्थ सर्व्हिस सेक्टरमध्ये च्यवनप्राश, डाबर हनी, डाबर हनीटस, डाबर पुदीनहरा, डाबर लाल तेल या उत्पादनांसाठी लोकप्रिय आहे. पर्सनल केअर क्षेत्रात डाबर आंवला, डाबर रेड पेस्ट, वाटिका ही डाबरची उत्पादने लोकप्रिय आहेत. 

डाबर कंपनीने यंदाच्या आर्थिक वर्षात आतापर्यंत 10 हजार 889 कोटी रुपयांची उलाढाल करून सर्व कर भरल्यानंतर 1742 कोटी रुपयांचा नफा कमावला आहे. भारतीय ग्राहकांमध्ये लोकप्रिय असलेल्या डाबर आणि बादशहा या दोन्ही कंपन्यांची आर्थिक स्थिती उत्तम आहे. दोन्ही कंपन्या मोठा नफा कमवत आहेत. या टप्प्यावर डाबर आणि बादशहा या दोन कंपन्यांमध्ये एक मोठा व्यवहार होत आहे. या व्यवहारामुळे दोन्ही कंपन्यांमधील गुंतवणूकदारांचा फायदा होईल. ग्राहकांच्या हितांचे रक्षण होईल. 

विस्तार योजनेमुळे अधिकाधिक ग्राहकांपर्यंत पोहोचणे आणि ब्रँडेड मसाला बाजारात स्वत:चा ब्रँड आणखी मोठा करणे डाबर कंपनीला शक्य होणार आहे. सध्या ब्रँडेड मसाला बाजारात टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्सचा टाटा संपन्न, आयटीसीचा आशीर्वाद हे दोन मोठे ब्रँड आहेत. एव्हरेस्ट, एमडीएच, शक्ति मसाला, आची, ईस्टर्न काँडिमेंट्स हे पण लोकप्रिय मसाला ब्रँड आहेत. डाबर आणि बादशहा यांच्यातील करारानंतर ब्रँडेड मसाला बाजारावर मोठा प्रभाव पडण्याची शक्यता आहे. 

एका आर्थिक अभ्यासानुसार भारतीय मसाला बाजार 70 हजार कोटी रुपयांचा आहे. या बाजारात ब्रँडेड मसाल्यांचा वाटा 35 टक्क्यांचा आहे. पण 2025 पर्यंत ब्रँडेड मसाल्यांची देशातील बाजारपेठ 50 हजार कोटींपेक्षा मोठी होईल असा अंदाज आहे. तसेच 2030 पर्यंत भारतात किमान 15 मसाला कंपन्यांचा रेव्हेन्यू 1 हजार कोटींपेक्षा जास्त असेल. यातील किमान 4 कंपन्यांची वार्षिक उलाढाल 5 हजार कोटींपेक्षा जास्त असेल. यामुळे डाबर आणि बादशहा यांच्यातील व्यवहाराचा ब्रँडेड मसाला बाजारावर मोठा परिणाम होणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी