लाखो कर्मचाऱ्यांना मिळणार महागाई भत्ता, नेमके काय मिळणार जाणून घ्या

काम-धंदा
Updated May 13, 2021 | 15:24 IST | टाइम्स नाऊ मराठी

Dearness Allowance news : सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांमधील ८.५ लाख कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता (Dearness Allowance, DA)मिळणार आहे. हा महागाई भत्ता मे, जून आणि जुलै २०२१ साठी मिळणार आहे. यामध्ये ७ स्लॅबची घट करण्

Dearness Allowance for PSU bank employees
सार्वजनिक क्षेत्रातील बॅंक कर्मचाऱ्यांना मिळणार महागाई भत्ता 

थोडं पण कामाचं

  • पीएसयु बॅंक कर्मचाऱ्यांना डीए
  • २०१७पासून लागू होणार वेतनवाढ
  • मिळणार मागील थकबाकी

नवी दिल्ली : सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांमधील ८.५ लाख कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता (Dearness Allowance, DA)मिळणार आहे. हा महागाई भत्ता मे, जून आणि जुलै २०२१ साठी मिळणार आहे. यामध्ये ७ स्लॅबची घट करण्यात आली आहे. इंडियन बॅंक्स असोसिएशनने (Indian Banks' Association)एआयएसीपीआयचे म्हणजेच AIACPI (All India Average Consumer Price Index)ची आकडेवारी आल्यानंतर यासंदर्भातील घोषणा केली आहे. तर ७व्या वेतन आयोग (7th Central Pay Commission)मिळालेले ५२ लाख केंद्र सरकारच्या कर्मचारी यावर्षी आपल्या महागाई भत्त्यात वाढ होण्याची वाट पाहत आहेत. त्यांना मागील वर्षापासून महागाई भत्ता देण्यात आलेला नाही.

आयबीएचा आदेश

आयबीएच्या आदेशानुसार इंडस्ट्रियल वर्करसाठी जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्चसाठीचा एआयएसीपीआयची सरासरी ७८१८.५१ इतकी आहे. यासाठी डीए स्लॅब ३६७ ७ (७८१८.५१ - ६३५२ = १४६६.५१/४ = ३६७ स्लॅब्स) इतका होतो. फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिलसाठी डीए ३७४ स्लॅब्स होता. यामध्ये ७ स्लॅब्सची घट झाली आहे. यामुळेच यावेळेस डीएचचे कॅल्क्युलेशन बेसिक वेतनाच्या २५.६९ टक्के इतके निघाले आहे.

मागील वेळेस एआयएसीपीआय म्हणजेच AIACPI (All India Average Consumer Price Index)ऑक्टोबर २०२० मध्ये वाढून ७८५५.७६ वर पोचले होते. त्यानंतंर यामध्ये वाढ नोंदवण्यात आली आहे. नोव्हेंबर आणि डिसेंबर मध्ये हा अनुक्रमे ७८८२.०६ आणि ७८०९.७४ इतका झाला होता.

महागाई भत्त्याचे कॅल्क्युलेशन


डीए स्लॅब ७८१८.५१ - ६३५२ = १४६६.५१ /४ = ३६७ स्लॅब्स

मागील तिमाहीतील स्लॅब : ३७४ डीए मध्ये घट = ३७४-३६७ = ७ स्लॅब्स

पीओचे वेतन


स्टेट बॅंक ऑफ इंडियाचे मासिक वेतन ४०,००० ते ४२,००० रुपये प्रति महिना इतके असते. त्यांचे सुरुवातीचे मूळ वेतन २७,६२० रुपये इतके असते. डीएमध्ये बदल झाल्याने वेतनावर परिणाम होईल. बॅंक पीओला ४ इन्क्रीमेंट मिळतात. प्रमोशन नंतर कमाल बेसिक वेतन ४२०२० रुपयांपर्यत पोचते.

महामारीच्या काळात वाढला पगार


कोविड-१९ महामारीच्या काळात ८.५ लाख बॅंक कर्मचाऱ्यांचे वेतन वाढण्याचा आदेश आला होता. बॅंक कर्मचारी संघ आणि आयबीएमध्ये वेतनात वार्षिक १५ टक्के वाढ घेण्यावरून करार झाला होता. या करारानुसार बॅंकांवर ७,९०० कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडला आहे.

वेतनवाढ नोव्हेंबर २०१७पासून लागू


बॅंक युनियन्स आणि आयबीएमधील करारानुसार ही वेतनवाढ नोव्हेंबर २०१७ पासून लागू झाली आहे. म्हणजेच बॅंक कर्मचाऱ्यांना जवळपास ३० महिन्यांची थकबाकी (Arrear)मिळला आहे. वेतन आणि भत्त्यांमध्ये वार्षिक १५ टक्के वाढ ३१ मार्च २०१७ च्या वेतन बिलाच्या आधारवर होईल.

महागाई भत्ता हा कर्मचाऱ्यांच्या वेतनातील महत्त्वाचा घटक असतो. त्यामुळे महागाई भत्त्यात वाढ झाल्याने कर्मचाऱ्यांच्या वेतनातदेखील वाढ होते. महागाई भत्ता हा बेसिक वेतनावर ठरत असतो. मात्र यामुळे एकूणच वेतनात आणि मिळणाऱ्या इतर फायद्यांमध्ये वाढ होत असते. केंद्र सरकारचे कर्मचारी अजूनही डीएची वाट पाहत आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी