Unemployment Allowance update : नवी दिल्ली : देशात सध्या बेरोजगारीचा (Unemployment)प्रश्न सतावतो आहे. कोरोना संकटाच्या (Corona Pandemic)काळात अनेकांना आपला रोजगार गमवावा लागला आहे. त्यातच दरवर्षी पदवी किंवा इतर शिक्षण घेऊन हजारो तरुण रोजगाराच्या (Job seekers) शर्यतीत उतरत असतात. अशावेळी प्रत्येकालाच नोकरी किंवा रोजगार मिळणे कठीण होऊन बसते. मात्र जर बेरोजगारांना सरकारकडून काही मदत मिळाली तर त्यांच्यासाठी तो मोठाच दिलासा असणार आहे. तुम्हीही दिल्लीत राहत असाल आणि बेरोजगार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप उपयोगी आहे. बेरोजगारांना आर्थिक मदत करण्यासाठी दिल्ली सरकार (Delhi Government) बेरोजगारी भत्ता (Unemployment Allowance)देते आहे. या योजनेअंतर्गत, दिल्लीतील पदवीधर (Graduate)असलेल्या तरुणांना सरकार दरमहा 5,000 रुपये आणि पदव्युत्तर (PG) असलेल्या तरुणांना 7,500 रुपये आर्थिक मदत देते आहे. (Delhi government is giving unemployment allowance to unemployed graduate & post graduates)
हे लक्षात घेण्यासारखे आहे की ज्या तरुणांनी एम्प्लॉयमेंट एक्सचेंजमध्ये नोंदणी केली आहे त्यांना दिल्लीत बेरोजगारी भत्ता दिला जातो. या नोंदणीद्वारे बेरोजगार तरुणांना रोजगार मिळेपर्यंत आर्थिक मदत केली जाते. लक्षात घेण्यासारखे आहे की देशात अशी अनेक राज्ये आहेत जिथे अशा योजना राबवल्या जात आहेत. तुमचीही नोकरी गेली असेल आणि तुम्ही पदवीधर किंवा पदव्युत्तर पदवीधर असाल तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता. त्याच्या नोंदणीची संपूर्ण प्रक्रिया जाणून घेऊया.
सरकारच्या या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर ऑनलाइन नोंदणी करावी लागेल. यासाठी आधार कार्ड, पॅनकार्ड, निवासी प्रमाणपत्र, आय कार्ड, मोबाईल क्रमांक, पदवी किंवा पदव्युत्तरची गुणपत्रिका, पासपोर्ट आकाराचा फोटो असणे बंधनकारक आहे.
रोजगारासाठी केंद्र सरकारकडून विविध योजना चालवल्या जातात. स्वयंरोजगार किंवा उद्योजकता विकासासाठी सरकारने खास आर्थिक तरतूद केली आहे. स्वत:चा व्यवसाय सुरू करणाऱ्यांना आर्थिक मदत मिळावी म्हणून विविध योजना लागू करण्यात आल्या आहेत. यात बॅंकांकडूनदेखील भांडवलाची मदत कर्जरुपाने मिळते.