Rooh Afza Controversy Update : नवी दिल्ली : एरवी लोकप्रिय असलेले रुफ अफजा (Rooh Afza)हे उत्पादन आता वादाचा विषय झाले आहे. पाकिस्तानात निर्मिती होत असलेल्या रुफ अफजाची भारतात विक्री होते आहे. त्यातून हा वाद निर्माण झाला आहे. त्यावर आता दिल्ली उच्च न्यायालयाने (Delhi High Court) आघाडीची ई-कॉमर्स वेबसाइट असलेल्या अॅमेझॉन इंडियाला (Amazon India) त्यांच्या वेबसाइटवरून पाकिस्तानात निर्मिती झालेल्या रुह अफजाला हटवण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणात हमदर्द नॅशनल फाऊंडेशन ऑफ इंडियाने न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेत म्हटले आहे की अॅमेझॉन इंडिया प्लॅटफॉर्मवर सूचीबद्ध रूह अफझाचे काही प्रकार हमदर्द लॅबोरेटरीज (इंडिया) द्वारे उत्पादित केलेले नाहीत. ( Delhi high court orders Amazon India to stop the sale of Pakistan manufactured Rooh Afza)
अधिक वाचा - वेदांतानंतर आणखी एक कंपनी राज्याबाहेर जाणार?
अमेझॉन इंडिया आपल्या प्लॅटफॉर्मवर विकत असलेल्या रूह अफझाचे काही प्रकार पाकिस्तानच्या 'हमदर्द प्रयोगशाळा (वक्फ)' द्वारे तयार केले जात आहेत. हमदर्द नॅशनल फाऊंडेशन आणि हमदर्द लॅबोरेटरीज इंडियाने न्यायालयाला सांगितले आहे की त्यांना भारतात रूह अफजाचा अधिकार आहे.
दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती प्रतिभा एम सिंह यांनी म्हटले आहे की, रूह अफजा या उत्पादनाचा भारतीय जनता दीर्घकाळ पेय म्हणून वापर करत आहे. यामुळे, त्याच्या गुणवत्ता मानकांना अन्न सुरक्षा आणि मानक कायद्याने घालून दिलेल्या लागू नियमांचे पालन करावे लागेल. यासोबतच न्यायालयाने अॅमेझॉनला 48 तासांच्या आत पाकिस्तानी बनावटीचा रुह अफजा प्लॅटफॉर्मवरून हटवण्याचे आदेश दिले आहेत.
अधिक वाचा - लखीमपूरी खेरीमध्ये त्या बहिणींवर बलात्कार करून खून,६जण अटकेत
तुमच्या माहितीसाठी रूह अफजा हे सुमारे 115 वर्षे जुने पेय आहे. हे पेय प्रथम 1907 मध्ये पारंपारिक औषध व्यवसायी हकीम हाफिज अब्दुल मजीद यांनी तयार केले होते. सुरुवातीच्या काळात ते जुन्या दिल्लीत विकले जायचे. 1947 मध्ये फाळणीनंतर हाफिज अब्दुल मजीद यांचा धाकटा मुलगा- हकीम मोहम्मद सईद यांनी पाकिस्तानात स्थलांतर केले आणि तेथे हमदर्दची स्थापना केली. त्याच वेळी मोठा मुलगा अब्दुल हमीद भारतातच राहिला आणि वडिलांचा व्यवसाय करू लागला.
अधिक वाचा - क्रिकेटमध्ये वाढणार अमित शहांची ताकद, जय शाह बनणार नवे बीसीसीआय अध्यक्ष?
याचाच अर्थ फाळणीनंतर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी रुह अफझाची निर्मिती सुरू केली. बांगलादेशात स्वातंत्र्यानंतर १९७१ मध्ये तिसरे युनिट तयार झाले. न्यूयॉर्क टाइम्सच्या वृत्तानुसार, 2021 मध्ये तिन्ही व्यवसाय एकाच कुटुंबातील सदस्य चालवतात. प्रसार माध्यमांमधील आलेल्या माहितीनुसार, हमदर्द इंडिया रुह अफजा नावाने उत्पादने विकून दरवर्षी 200 कोटी रुपयांहून अधिकचा महसूल कमावते.
विविध उत्पादनांच्या विक्रीवरून काहीवेळी वाद निर्माण होत असतात. खास करून ई-कॉमर्स कंपन्यांच्या जमान्यात जगभरातील कोणत्याही कंपनीचा माल कोणत्याही देशात विकला जात असतो. अशावेळी स्थानिक विक्रेते आणि परदेशातील विक्रेते यांच्यात वाद होऊ शकतो.