Job Opportunity : Delhivery भरती करणार 75,000 हून अधिक कर्मचारी, तुम्हालाही आहे संधी, पाहा तपशील

Job Alert : तुम्ही डिलिव्हरी बॉयची (Delivery Boy)नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. डेल्हिव्हरी (Delhivery) ही लॉजिस्टिक कंपनी दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांची भरती करणार आहे. कंपनीने 75 हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांची भरती करण्याची घोषणा केली आहे. कंपनी एक ते दीड महिन्यात ही भरती करेल. ही हंगामी भरती असेल. सणासुदीच्या काळात कंपनी ही भरती करत आहे.

Job Opportunities
जॉबची संधी 
थोडं पण कामाचं
  • डेल्हिव्हरीमध्ये दीड महिन्यात 75 हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांची भरती होणार
  • डिलिव्हरी बॉय नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांसाठी चांगली संधी
  • कंपनी 50,000 एजंट नियुक्त करणार

Delhivery Job Alert : नवी दिल्ली : तुम्ही डिलिव्हरी बॉयची (Delivery Boy)नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. डेल्हिव्हरी (Delhivery) ही लॉजिस्टिक कंपनी दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांची भरती करणार आहे. कंपनीने 75 हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांची भरती करण्याची घोषणा केली आहे. कंपनी एक ते दीड महिन्यात ही भरती करेल. ही हंगामी भरती असेल. सणासुदीच्या काळात कंपनी ही भरती करत आहे. यासोबतच कंपनी आपली कुरिअर सेवेची क्षमता दररोज 15 लाख शिपमेंटपर्यंत वाढवणार आहे. कंपनीने सांगितले की, या 75 हजार नोकऱ्यांपैकी 10 हजार नोकर्‍या दिल्ली गेटवेज, वेअरहाऊस आणि लास्ट माईल डिलिव्हरीच्या ऑफ-रोल कर्मचाऱ्यांसाठी असतील. (Delhivery to recruit more than 75,000 employees in one and half month)

अधिक वाचा : First Maruti 800 Car : ही आहे भारतातील पहिली मारुती 800, 39 वर्ष जुनी, पहिल्या कारची कहाणी...पाहा फोटो

सणासुदीच्या काळात मोठी मागणी 

सणासुदीच्या काळात कुरिअर सेवा व्यवसायातील मोठ्या मागणीची पूर्तता करण्याच्या उद्देशाने या भरतीचे उद्दिष्ट असल्याचे कंपनीने म्हटले आहे. कंपनीने हरियाणा येथे स्थापन केलेले पूर्णपणे स्वयंचलित कुरिअर आणि वितरण केंद्र या वर्षी एप्रिलमध्ये कार्यान्वित झाले आहे.

अधिक वाचा : Face Beauty Tips: या 3 नैसर्गिक गोष्टींमुळे तुमच्या चेहऱ्यावर येईल चमक...दिसाल तरुण आणि सुंदर

50 हजार एजंटांची भरती

डेल्हिव्हरीने (Delhivery) सांगितले आहे की ते शेवटच्या-माइल एजंट प्रोग्राम अंतर्गत 50,000 एजंट्सना नियुक्त करेल. याद्वारे स्वयंरोजगार, विद्यार्थी आणि सेवानिवृत्त व्यावसायिकांव्यतिरिक्त अनेकांना उत्पन्नाच्या संधी मिळणार आहेत.

लास्ट माईल रायडर्ससाठी आहेत इतक्या नोकऱ्या 

डेल्हिव्हरीने (Delhivery)सांगितले की ते 15,000 हून अधिक लास्ट माइल रायडर्ससह आपली क्षमता वाढवेल. कंपनी आपले इतर कार्यक्रमही मजबूत करण्यावर भर देणार आहे. याव्यतिरिक्त, कंपनी आपल्या बीपी व्यवसाय भागीदारांद्वारे दलाल, फ्लीट मालक आणि ट्रकर्सचा समावेश करेल. यामुळे कंपनीची ट्रकलोड क्षमता 50 टक्क्यांनी वाढण्याची अपेक्षा आहे.

अधिक वाचा : LIVE मॅच दरम्यान स्टेडियममध्येच दाम्पत्याचे शारीरिक संबंध, 6 सेकंदांच्या VIRAL VIDEO ने खळबळ

डेल्हिव्हरी (Delhivery) त्याच्या लास्ट-माईल एजंट (LMA) प्रोग्रामद्वारे 50,000 लास्ट-माईल एजंट्सची नियुक्ती करेल. सर्व स्वयंरोजगार असलेल्या व्यक्ती, विद्यार्थी, निवृत्त व्यावसायिक आणि इतर नोकरी शोधणारे साइन अप करू शकतात, असे कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे. फक्त एक दुचाकी, वैध ड्रायव्हिंग लायसन्स आणि स्मार्टफोन असणे आवश्यक आहे, असेही त्यात नमूद करण्यात आले आहे.

डेल्हिव्हरी (Delhivery)चे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पै म्हणाले, "डिलिव्हरी क्षमता वाढवण्यासोबतच, आम्ही आर्थिक वर्ष 23 च्या पहिल्या तिमाहीत आमच्या पायाभूत सुविधांचा ठसा एक दशलक्ष चौरस फुटांनी वाढवला आहे."

डेल्हिव्हरी (Delhivery) ने 15,000-प्लस लास्ट-माईल रायडर्स जोडून त्याची क्षमता वाढवण्यासाठी त्याचे D@S (ड्रॉप अॅट स्टोअर) आणि इतर कार्यक्रम मजबूत करण्याची योजना आखली आहे. हे त्याच्या बिझनेस पार्टनर्स (बीपी) प्रोग्रामद्वारे ट्रकर्स, फ्लीट मालक आणि दलाल यांना देखील सेवेत घेईल, असे कंपनीने म्हटले आहे. डेल्हिव्हरीने सुरुवातीपासून 1.6 अब्ज पेक्षा जास्त शिपमेंट्स पूर्ण केल्या आहेत आणि सध्या 29,000 पेक्षा जास्त ग्राहकांसह कार्य करते, असे निवेदनात म्हटले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी