DGCA action : 50 percent SpiceJet flights banned : डीजीसीएने स्पाईसजेट विमान कंपनीवर मोठी कारवाई केली. स्पाईसजेट कंपनीच्या ५० टक्के नियोजीत उड्डाणांवर आठ आठवड्यांसाठी डीजीसीएने बंदी लागू केली आहे.
भारतात १९ जून ते ६ जुलै २०२२ या कालावधीत वेगवेगळ्या ठिकाणी स्पाईसजेट कंपनीच्या आठ उड्डाणांच्या कार्यक्रमात बदल करण्यात आला. विमानांमधील तांत्रिक समस्यांमुळे उड्डाणांच्या कार्यक्रमात बदल करण्यात आला. वारंवार घडलेल्या या घटनांची गंभीर दखल घेऊन डीजीसीएने स्पाईसजेट कंपनीवर कारवाई केली. तसेच कंपनीला विमान सेवेचा दर्जा सुधारण्यास सांगितले.
याआधी डीजीसीएने स्पाईसजेट कंपनीला १९ जून ते ६ जुलै २०२२ या कालावधीत विमानांमधील तांत्रिक दोषांमुळे निर्माण झालेल्या स्थिती प्रकरणी कारणे दाखवा नोटीस बजावली होती. यानंतर डीजीसीएने स्पाईसजेट कंपनीवर कारवाई केली. डीजीसीएचे पत्र मिळाले आहे आणि आम्ही डीजीसीएच्या सर्व आदेशांचे पालन करणार आहोत, असे स्पाईसजेट कंपनीने सांगितले.