Dhanteras Gold Rate : धनत्रयोदशीच्या दिवशी वायदे बाजारात सोने-चांदी स्वस्त, खरेदीसाठी चांगली संधी 

Dhanteras Gold an Silver Rate:  मंगळवारी धनत्रयोदशीच्या दिवशी सोन्याचे दर (Gold Rate) घसरले. चांदीच्या बाबतीतही दरात (Silver Rate)घसरण दिसून आली.

Dhantrayodashi gold silver futures price 2 november Dhanteras
धनत्रयोदशीच्या दिवशी सोने झाले स्वस्त, खरेदीची संधी  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  •  मंगळवारी धनत्रयोदशीच्या दिवशी सोन्याचे दर (Gold Rate) घसरले.
  • चांदीच्या बाबतीतही दरात (Silver Rate)घसरण दिसून आली.
  • आंतरराष्ट्रीय बाजारात, सोने आणि चांदी अनुक्रमे  1,783 डॉलर प्रति औंस आणि 23.75  डॉलर प्रति औंसवर जवळपास अपरिवर्तित होते.

Dhanteras Gold an Silver Rate:   नवी दिल्ली :  मंगळवारी धनत्रयोदशीच्या दिवशी सोन्याचे दर (Gold Rate) घसरले. चांदीच्या बाबतीतही दरात (Silver Rate)घसरण दिसून आली. मंगळवारी, MCX वर डिसेंबर डिलिव्हरीसाठी सोन्यासाठी 9859 लॉटचा व्यवहार झाला. सोन्याचा भाव 161 रुपयांनी घसरून 64791 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. दुसरीकडे, डिसेंबर डिलिव्हरीसाठी चांदीचा भाव 47903 रुपये प्रति किलोच्या मागील बंदच्या तुलनेत 78 रुपयांच्या खाली होता. (Dhantrayodashi gold silver futures price 2 november Dhanteras )

दुसरीकडे, जागतिक बाजारातील कमजोर कलामुळे सोमवारी राष्ट्रीय राजधानीच्या सराफा बाजारात सोने 10 रुपयांनी किरकोळ घसरून 46,673 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. एचडीएफसी सिक्युरिटीजने ही माहिती दिली. त्यामुळे मागील व्यवहारात सोने 46,683 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाले होते. चांदीचा भावही 230 रुपयांनी घसरून 63,014 रुपये प्रतिकिलो झाला. मागील ट्रेडिंग सत्रात तो 63,244 रुपये प्रति किलोवर बंद झाला होता.

आंतरराष्ट्रीय बाजारात, सोने आणि चांदी अनुक्रमे  1,783 डॉलर प्रति औंस आणि 23.75  डॉलर प्रति औंसवर जवळपास अपरिवर्तित होते. एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटीज) तपन पटेल म्हणाले, "सोमवारी अमेरिकन कमोडिटी एक्स्चेंज COMEX वर स्पॉट गोल्डच्या किमती $1,783 प्रति औंसवर कायम राहिल्याने सोन्याचे भाव स्थिर राहिले."

पाहूया महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरातील २४ कॅरेट सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम) 

शहर आजचा दर कालचा दर 
मुंबई ४७ हजार ७४० ४७ हजार ७४०
पुणे  ४७ हजार ७४० ४७ हजार ७४०
जळगाव  ४७ हजार ७४० ४७ हजार ७४०
कोल्हापूर ४७ हजार ७४० ४७ हजार ७४०
लातूर ४७ हजार ७४० ४७ हजार ७४०
सांगली ४७ हजार ७४० ४७ हजार ७४०
बारामती  ४७ हजार ७४० ४७ हजार ७४०

पाहू या महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरातील २२ कॅरेट  सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम)

शहर आजचा दर कालचा दर 
मुंबई ४६ हजार ७४० ४६ हजार ७४०
पुणे  ४६ हजार ७४० ४६ हजार ७४०
जळगाव  ४६ हजार ७४० ४६ हजार ७४०
कोल्हापूर ४६ हजार ७४० ४६ हजार ७४०
लातूर ४६ हजार ७४० ४६ हजार ७४०
सांगली ४६ हजार ७४० ४६ हजार ७४०
बारामती  ४६ हजार ७४० ४६ हजार ७४०

पाहू या महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरातील चांदीचा दर (प्रति किलोग्रॅम)

शहर आजचा दर कालचा दर 
मुंबई ६४ हजार ६०० ६४ हजार ४००
पुणे  ६४ हजार ६०० ६४ हजार ४००
जळगाव  ६४ हजार ६०० ६४ हजार ४००
कोल्हापूर ६४ हजार ६०० ६४ हजार ४००
लातूर ६४ हजार ६०० ६४ हजार ४००
सांगली ६४ हजार ६०० ६४ हजार ४००
बारामती  ६४ हजार ६०० ६४ हजार ४००

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी