Dhirubhai Ambani : शिक्षण फक्त 10वीपर्यतच...भाविकांना भजी विकली, खिशात 500 रुपये घेऊन गाठली मुंबई...पाहा कसे अब्जाधीश झाले धीरूभाई अंबानी

Success story of Dhirubhai Ambani : प्रत्येक दिवस तसा नेहमीचाच आणि तरीही महत्त्वाचा असतो. 2002 मध्ये 6 जुलैच्या दिवशी मुंबईतील प्रसिद्ध ब्रीच कॅंड हॉस्पिटलमध्ये एकदम धावपळ सुरू झाली होती. देशाच्या उद्योग विश्वातील सर्वात मोठा दिग्गज आपले शेवटचे श्वास मोजत होता. त्याच्या या स्थितीमुळे कधीही न थांबणाऱ्या दलाल स्ट्रीटच्या काळजाचा ठोकादेखील चुकला होता. ही व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून रिलायन्स समूहाची जन्मदाते आणि प्रख्यात उद्योगपती धीरूभाई अंबानी (Dhirubhai Ambani) हे होते.

Story of Dhirubhai Ambani
धीरूभाई अंबानींची कहाणी 
थोडं पण कामाचं
  • 6 जुलै रोजी धीरूभाईने शेवटचा श्वास घेतला
  • ते फक्त 500 रुपये घेऊन मुंबईत आले होते.
  • आपल्या चुलत भावाबरोबर म्हणजे चंपकलाल दमानीबरोबर त्यांनी 1960 मध्ये रिलायन्स कमर्शियल कॉर्पोरेशनचा पाया घातला.

Story of Dhirubhai Ambani :मुंबई : प्रत्येक दिवस तसा नेहमीचाच आणि तरीही महत्त्वाचा असतो. 2002 मध्ये 6 जुलैच्या दिवशी मुंबईतील प्रसिद्ध ब्रीच कॅंड हॉस्पिटलमध्ये एकदम धावपळ सुरू झाली होती. देशाच्या उद्योग विश्वातील सर्वात मोठा दिग्गज आपले शेवटचे श्वास मोजत होता. त्याच्या या स्थितीमुळे कधीही न थांबणाऱ्या दलाल स्ट्रीटच्या काळजाचा ठोकादेखील चुकला होता. ही व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून रिलायन्स समूहाची जन्मदाते आणि प्रख्यात उद्योगपती धीरूभाई अंबानी (Dhirubhai Ambani) हे होते.  24 जून 2002 रोजी धीरूभाई अंबानी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना दुसरा ब्रेनस्ट्रोक झाला होता. यापूर्वी, 1986 मध्ये त्यांनी याचा सामना केला होता. यानंतर, त्यांच्या उजव्या हाताला अर्धांगवायू झाला. शेवटी डॉक्टरांनी हार मानली. 6 जुलै रोजी धीरूभाईने शेवटचा श्वास घेतला. धीरूभाई अंबानीशी संबंधित बर्‍याच कथा आहेत. अशीच एक कथा मायानागारीमध्ये त्यांच्या आगमनाशी संबंधित आहे. ते फक्त 500 रुपये घेऊन मुंबईत आले होते. त्यानंतर प्रचंड मेहनत, चाणाक्ष बुद्धी आणि बाजारावरील उत्तम पकड याच्या जोरावर धीरूभाई अंबानी यांनी अब्जावधींचे साम्राज्य उभे केले. (Dhirubhai Ambani used sell bhajjiya to pilgrims in childhood, see how he built the biggest business empire in India)

अधिक वाचा : Gold-Silver Rate Today, 07 July 2022: मजबूत डॉलरने केली सोन्याच्या मुस्कटदाबी, सोन्याच्या भाव किंचित वाढला मात्र थांबली घोडदौड

लहाणपणापासूनच व्यवसायाचे वेध

धीरुभाई यांचे पूर्ण नाव धीरजलाल हिराचंद अंबानी होते. त्यांचा जन्म 28 डिसेंबर 1932 रोजी गुजरातेतील सौराष्ट्रामधील जुनागढ येथे झाला होता. वडील शाळेत शिक्षक होते. घराची आर्थिक स्थिती फार चांगली नव्हती. धीरूभाई यांना कोणत्याही परिस्थितीत ते बदलायचे होते. या उत्कटतेमुळे त्यांनी लहान वयातच व्यवसाय सुरू केला. त्या दिवसांमध्ये, बरेच लोक गिरनार हिलवर तीर्थयात्रेसाठी येत असत. धीरूभाई या यात्रेकरूंना भजी विकत असत. ते फक्त 10 पर्यंत शिकलेले होते. 

धीरूभाईंचे वय साधारण 16 वर्षे असेल, ते आपला भाऊ रामणिकलाल कडे येमेनला पैसे कमवण्यासाठी निघून गेले. ही 1949 ची गोष्ट आहे. तेथे त्यांना पेट्रोल पंपवर नोकरी मिळाली. त्यांचा पगार महिन्याला 300 रुपये होता. धीरुभाई यांच्या कामावर कंपनी खूप खूष झाली. त्यांना फिलिंग स्टेशन मॅनेजर बनवले गेले. काही वर्षे काम केल्यानंतर ते 1954 मध्ये पुन्हा भारतात परतले. धीरूभाईंना हे माहित होते की जी महत्त्वाकांक्षा त्यांनी बाळगली आहे ती ते घरात राहून तो पूर्ण होणार नाही. म्हणून ते स्वप्नांच्या शहरात म्हणजे मुंबईला आले. त्यावेळेस त्यांच्या खिशात 500 रुपये होते.

अधिक वाचा : Bank of Baroda Update : महत्त्वाचे! बँक ऑफ बडोदाच्या ग्राहकांसाठी चेकसाठी लागू झाला नवा नियम...जर 'हे' केले नाही तर चेक अडकणार

बाजाराची नाडी ओळखली 

मुंबईला पोचल्यावर धीरूभाईंनी वेगवेगळ्या प्रकारच्या व्यवसायांमध्ये नशीब आजमवण्यास सुरूवात केली. त्यांना बाजारपेठेबद्दल बरीच माहिती होत होती. धीरूभाईंच्या हे लक्षात आले होते की की भारतातील पोलीइस्टरला जोरदार मागणी आहे. त्याच्याउलट परदेशात भारतीय मसाल्यांना मागणी आहे. यातून त्यांना मोठी झेप घेण्याची कल्पना मिळाली. आपल्या चुलत भावाबरोबर म्हणजे चंपकलाल दमानीबरोबर त्यांनी 1960 मध्ये रिलायन्स कमर्शियल कॉर्पोरेशनचा (Reliance Commercial Corporation) पाया घातला. या कंपनीने परदेशात भारतीय मसाले विकण्यास आणि परदेशातील पॉलीइस्टर भारतात विकण्यास सुरवात केली. धीरुभाई यांचे पहिले कार्यालय एका खोलीत उघडले गेले. मुंबईच्या मशीद बंदर परिसरातील नरसिनाथन स्ट्रीट जवळ एका खोलीत हे कार्यालय सुरू झाले. ती एक 350 चौरस फूट खोली होती. खोलीत दोन टेबल्स, 3 खुर्च्या आणि फोनशिवाय काही नव्हते.

बर्‍याच वेळा कंपनीचे नाव बदलले

धीरूभाई अंबानी यांनी आपला व्यवसाय केवळ 50 हजारांचे भांडवल आणि दोन सहाय्यकांनीशी सुरू केला. तिथून झेप घेत ते 2000 मध्ये, तो देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले. रिलायन्सचे पूर्वीचे नाव रिलायन्स कमर्शियल कॉर्पोरेशन असे होते. नंतर त्याचे नाव रिलायन्स टेक्सटाईल प्रायव्हेट लिमिटेड असे ठेवले गेले. शेवटी कंपनीला रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) असे नाव देण्यात आले. धीरूभाई अंबानी यांना कुटुंबासमवेत राहण्याची आवड होती. त्यांना पार्टीवगैरेमध्ये जास्त रस नव्हता.

अधिक वाचा : Life Insurance : तुमच्यासाठी किती रकमेचा आयुर्विमा पुरेसा ठरेल? यासाठीची सूत्रे जाणून घ्या

वाईट दिवसात महानायकालादेखील दिला होता मदतीचा हात 

धीरूभाई देखील अंबानीशी संबंधित एक मानवी पैलू आहे. बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्याशी हा संबंध आहे. जेव्हा अमिताभ खूप वाईट टप्प्यातून जात होता त्या दिवसांमधील ही गोष्ट आहे. अमिताभ दिवाळखोर झाला होता. बँक खाते रिक्त होते. जेव्हा धीरूभाई यांना याबद्दल कळले तेव्हा त्यांनी मदतीचा हात पुढे केला. हे स्वतः अमिताभ बच्चन यांनी सांगितले. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या 40 व्या फाउंडेशनच्या दिवशी त्यांनी संपूर्ण कथा सांगितली. हा किस्सा सांगत असताना अमिताभ बच्चन भावनाविविश झाले होते. अमिताभ यांनी सांगितले होते की एकवेळ अशी आली होती की ते दिवाळखोर झाले होते. त्याची कंपनी तोट्यात गेली होती. कमाईचे सर्व मार्ग बंद होते. अशा परिस्थितीत धीरूभाईंनी आपला धाकटा मुलगा अनिल अंबानी यांना अमिताभकडे पाठवले होते.

अमिताभ यांनी सांगितले होते की अनिल अंबानी हा त्याचा चांगला मित्र आहे. धीरूभाई यांनी त्याला मदत करण्यासाठी पाठविले. त्यांनी अनिल अंबानींना अमिताभला काही पैसे देण्यास सांगितले होते. मदतीची ही रक्कम इतकी मोठी होती त्यामुळे अमिताभ बच्चनच्या सर्व अडचणी दूर होणार होत्या. अर्थात ही वेगळी बाब आहे की अमिताभ बच्चन यांनी ही रक्कम घेण्यास अत्यंत विनम्रपणे नकार दिला होता. मात्र या औदार्याने अमिताभ भावनाविविश झाले होते. नंतर, अमिताभची स्थिती सुधारली. त्यांनी यशाचे नवे टप्पे गाठले. त्यांच्यावर असणारे संपूर्ण कर्ज त्यांनी फेडले होते. मात्र आजही अमिताभ बच्चन यांना त्यांच्या सर्वात कठीण काळात धीरूभाईंनी देऊ केलेली मदत चांगलीच लक्षात आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी