डिझेल ८ रुपये प्रति लिटरने झालं स्वस्त, पण...

काम-धंदा
Updated Jul 30, 2020 | 16:41 IST | टाइम्स नाऊ मराठी

Diesel rate in Delhi: दिल्लीचे मुख्यमंत्री (Delhi CM Arvind Kejriwal) अरविंद केजरीवाल यांनी सांगितले की दिल्लीत डिझेल (Diesel) 8 रुपये प्रति लीटरने (8 rs. per litre) स्वस्त झाले आहे. जाणून घ्या ताजा दर

Diesel rates in Delhi come down by 8 rupees per litre
दिल्लीत डिझेल 8 रुपये प्रति लीटरने झाले स्वस्त  |  फोटो सौजन्य: Twitter

नवी दिल्ली: गेले अनेक दिवसांपासून डिझेलचे वाढणारे दर आज ८ रुपयांनी कमी झाले आहेत. पण हे दर फक्त राजधानी दिल्लीतच कमी झाले आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गुरुवारी (30 जुलै) सांगितले की दिल्लीत डिझेल ८ रुपयांनी स्वस्त होऊन ७३.६४ रुपये प्रति लिटर झालं आहे. एएनआय या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार केजरीवाल यांच्या मंत्रिमंडळाने आज डिझेलवरील व्हॅट किंवा वाढीव मूल्य कमी करून १६.७५% वर आणण्याचा निर्णय घेतला आहे. लॉकडाऊनदरम्यान दिल्ली सरकारने पेट्रोलवरील व्हॅट २७% वरून ३० % तर डिझेलवरील व्हॅट १६.७५% वरून ३०% इतका केला होता. सध्या दिल्लीत डिझेल ८१.९४ रुपये प्रति लिटर तर पेट्रोल ८०.४३ रुपये प्रति लिटर इतकं आहे.

केजरीवाल यांनी डिझेलवरील व्हॅट ३०% वरून कमी करून १६.७५% केला आहे. यामुळे दिल्लीत डिझेलची किंमत ८.३६रुपये प्रति लीटरने कमी होणार आहे. त्यांनी सांगितले की, जे डिझेल आदल्या दिवशी ८२ रुपयांना मिळत होते ते आता ७३.६४ रुपयांना मिळेल. केजरीवाल यांनी सांगितले की, तेलाच्या किंमती कमी व्हाव्यात अशी दिल्लीतील लोकांची इच्छा होती. यामुळे दिल्लीच्या अर्थव्यवस्थेला गती मिळेल.

अशी वाढते पेट्रोल, डिझेलची किंमत

भारतात पंपावर आपल्याकडून घेण्यात येणारी पेट्रोल आणि डिझेलची किंमत ही आंतरराष्ट्रीय तेलाची किंमत आणि बाजारातील इतर परिस्थितीवर अवलंबून असते. पेट्रोल आणि डिझेल हे वस्तू आणि सेवा कराच्या (GST) अंतर्गत येत नाही. दिल्ली सरकारने मे महिन्यात ऑटो इंधनांवर मूल्यवर्धित कर (वॅट) वाढवला होता. केंद्राने दोनदा ऑटो इंधनांवर उत्पादन शुल्क वाढवले. या वर्षाच्या मे महिन्यात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती या उत्पादन शुल्कातील वाढीमुळे वाढल्या. पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ मूल्यातील वाढीत उत्पादन शुल्क, वॅट, बाजारातील किंमत आणि मार्जिन, डीलरचे कमिशन इत्यादींचा समावेश होतो.

27.52 रुपये प्रति लीटरचे डिझेल कसे झाले 81.18 रुपये प्रति लीटर

१६ जुलै रोजी दिल्लीत डिझेलचे किरकोळ विक्री मूल्य ८१.१८ रुपये प्रति लीटर होते. इंडियन ऑईलच्या वेबसाईटनुसार मूलभूत किंमत २७.५२ रुपये प्रति लीटर होती. यात ०.३० रुपये प्रति लिटरचे भाडे शुल्क, डीलरवर लावण्यात येणारा चार्ज (उत्पादन शुल्क आणि वॅट वगळून) २७.८२ रुपये प्रति लीटर इतका येतो. यानंतर ३१.८३ रुपये प्रति लीटर उत्पादन शुल्क, सरासरी डीलर कमिशन २.५५ रुपये प्रति लीटर आणि व्हॅट (डीलर कमिशन आणि वॅटसह) शुल्क १८.९८ रुपये प्रति लीटर इतके असते. इंडियन ऑईलच्या संकेतस्थळानुसार अंतिम किरकोळ विक्री मूल्य साधारण ८१.१८ रुपये प्रति लीटर आहे.  

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी