Gold Investment | सोन्यात गुंतवणूक कशी कराल? हे आहेत पर्याय...मिळवा फायदा

Types of Gold Investment | सोन्यातील गुंतवणूक (Gold Investment)नेहमीच सुरक्षित आणि महत्त्वाची मानली जाते. त्यातच जर अर्थव्यवस्थेत आणि बाजारात अस्थिरता असेल तर गुंतवणुकदारांचा कल सोन्यात (Gold) गुंतवणूक करण्याकडे असतो. आपल्या गुंतवणुकीच्या एकूण पोर्टफोलिओमध्ये सोन्यातील गुंतवणुकीला १० ते १५ टक्के स्थान देणे जाणकार योग्य समजतात.

Types of Gold Investments
सोन्यातील गुंतवणुकीचे प्रकार आणि त्यांचे फायदे 
थोडं पण कामाचं
  • सोन्यातील गुंतवणूक ही सर्वात सुरक्षित समजली जाते
  • तुमच्या गुंतवणुकीच्या पोर्टफोलिओमध्ये सोन्याचा समावेश असावा
  • सोन्यातील गुंतवणुकीचे विविध पर्याय

Types of Gold Investment | मुंबई: सोने हे नेहमीच भारतीयांसाठी आकर्षणाचे केंद्र राहिले आहे. सोन्यातील गुंतवणूक (Gold Investment)नेहमीच सुरक्षित आणि महत्त्वाची मानली जाते. त्यातच जर अर्थव्यवस्थेत आणि बाजारात अस्थिरता असेल तर गुंतवणुकदारांचा कल सोन्यात (Gold) गुंतवणूक करण्याकडे असतो. आपल्या गुंतवणुकीच्या एकूण पोर्टफोलिओमध्ये सोन्यातील गुंतवणुकीला १० ते १५ टक्के स्थान देणे जाणकार योग्य समजतात. सध्या जरी सोन्याच्या भावात (Gold rate) घसरण दिसत असली तरी मागील वर्षापासून सोन्याच्या भावात प्रचंड वाढ झाली होती. अर्थात सध्या शेअर बाजारातील (Share market) तेजीमुळे इतर गुंतवणूक प्रकारांकडे थोडे कमीच लक्ष जाते आहे. मात्र सोने ही अतिशय सुरक्षित गुंतवणूक (Investment) समजली जाते. मागील काही वर्षात सोन्यातील गुंतवणुकीने दणदणीत परतावा दिला आहे. त्यामुळे आपल्या गुंतवणुकीच्या पोर्टफोलिओत एक हिस्सा नेहमी सोन्यातील गुंतवणुकीसाठी राखून ठेवला पाहिजे. सोन्यात सर्वसाधारणपणे पाच प्रकारे गुंतवणूक करता येते. ( Different types of Gold Investments & It's benefits, check the details)

सर्वसाधारणपणे सोन्यात पाच पद्धतीने गुंतवणूक करता येता. हे पाच प्रकार जाणून घेऊया आणि या सर्व पर्यायांविषयी आणि त्यातील फायद्या-तोट्याविषयी समजून घेऊया. सोन्यातील गुंतवणुकीसाठीचा एखादा प्रकार निवडताना तुमची गरज, गुंतवणूक कालावधी, तुमची सुविधा लक्षात घेऊन गुंतवणूक करणे योग्य ठरेल. 

१. प्रत्यक्ष सोन्याची खरेदी

नेहमी आपण जसे प्रत्यक्ष सराफा बाजारात जाऊन दागिने किंवा नाणी किंवा बिस्किट रुपात सोन्याची खरेदी करतो त्यालाच प्रत्यक्ष खरेदी म्हणतात. प्रत्यक्ष सोन्याची खरेदी  करणे हा आपल्या देशातील सर्वात लोकप्रिय पर्याय आहे. आपल्या देशात पारंपारिकपणे याच पद्धतीने सोन्यातील गुंतवणूक केली जाते. या पद्धतीने गुंतवणूक केल्यास सोने आपल्याजवळ बाळगावे लागते किंवा बॅंकेच्या लॉकरमध्ये ठेवावे लागते. अर्थात गरज पडल्यास सराफा बाजारात जाऊन लगेचच सोने विकून पैसा गाठीशी बांधता येतो. 

२. गोल्ड ईटीएफ

गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंड म्हणजेच गोल्ड ईटीएफ . गोल्ड ईटीएफमध्ये डीमॅट खात्याद्वारे गुंतवणूक करू शकतो. गोल्ड ईटीएफमध्ये प्रत्यक्ष सोने विकत मिळण्याऐवजी सोने युनिटरुपाने मिळते. म्हणजेच  जितके ग्रॅम सोने विकत घेऊ तितके युनिट आपल्या खात्यात जमा होतात. किमान एक ग्रॅम सोन्यात गुंतवणूक करावी लागते. शेअरप्रमाणेच गोल्ड ईटीएफच्या किंमतीतही चढउतार होत असतात. शेअरप्रमाणेच आपण केव्हाही हे युनिट विकून त्यातून नफा कमावू शकतो. 

३. ई-गोल्ड 

ही सोन्यातील इलेक्ट्रॉनिक गुंतवणूक असते. म्हणजेच हे सोने इलेक्ट्रॉनिक माध्यमातून विकत घेतले जाते. यातील गुंतवणूक हीदेखील पेपरलेस असते. अनेक युपीआय अॅपदेखील ही सुविधा पुरवतात. नॅशनल स्पॉट एक्सचेंजच्या डिलरमार्फतही ही गुंतवणूक करता येते. प्रत्यक्ष सोने सांभाळण्याची जबाबदारी या प्रकारामुळे टाळता येते. 

४.गोल्ड फंड

गोल्ड फंड हा प्रकार म्युच्युअल फंडांसारखाच असतो. गोल्ड फंडाद्वारे सोन्यात गुंतवणूक केली जाते. या फंडामध्ये आपण एसआयपीच्या माध्यमातूनदेखील गुंतवणूक करू शकतो. आपण जितकी गुंतवणूक करू तितके युनिट आपल्याला मिळतात.  यात गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला डीमॅट खात्याची आवश्यकता नसते. शिवाय किमान गुंतवणूक ही एक ग्रॅम सोन्यापेक्षाही कमी असू शकते. म्हणजेच अगदी ५०० रुपये प्रति माहची एसआयपीदेखील तुम्ही करू शकता. 

५. सोव्हेरन गोल्ड बॉंड

हा सर्वाधिक लाभदायक प्रकार आहे. सोन्यातील गुंतवणुकीचा हा सर्वात खास पर्याय आहे. हे बॉंड केंद्र सरकार किंवा रिझर्व्ह बॅंकच बाजारात आणत असल्यामुळे अतिशय सुरक्षित समजले जातात. यात किमान एक ग्रॅम सोन्याच्या मूल्याएवढी गुंतवणूक करावी लागते. या पद्धतीने जितकी गुंतवणूक करू तितके ग्रॅम सोने किंवा युनिट आपल्या खात्यात जमा होतात. साधारणपणे आठ वर्षांच्या कालावधीसाठी हे बॉंड असतात. तर यातील गुंतवणुकीसाठीचा लॉकइन कालावधी पाच वर्षांचा असतो. याशिवाय दरवर्षी तुमच्या गुंतवणूकीवर २.५ टक्के इतके अतिरिक्त व्याज तुम्हाला दिले जाते.  म्हणजेच पाच वर्षांनी तुम्ही तुमची गुंतवणूक काढून घेऊ शकता. तुमचा गुंतवणूक कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यावेळच्या बाजारभावाप्रमाणे तुम्ही जितके ग्रॅम सोने घेतले असेल तितकी रक्कम तुम्हाला मिळते. 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी