Types of Provident Fund: प्रॉव्हिडंट फंडांचे विविध प्रकार कोणते, त्यातील फरक काय... जाणून घ्या सर्वकाही

Provident Fund : निवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांच्या हाती निवृत्तीनंतर पैसा असावा आणि त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये हा कर्मचारी भविष्य निर्वाह निधी योजनेचा मुख्य हेतू असतो. या योजनांअंतर्गत नियमित गुंतवणूक (Investment) केली जाते. या गुंतवणुकीतून कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर मोठी रक्कम मिळते. मात्र पीएफच्या किती प्रकारच्या योजना आहेत हे तुम्हाला माहित आहे का? जाणून घेऊया.

Provident Fund Schemes
पीएफ योजनांचे प्रकार 
थोडं पण कामाचं
  • प्रॉव्हिडंट फंड योजनांचे विविध प्रकार
  • या योजनांचे फायदे
  • योजनांमध्ये गुंतवणूक करण्याचे निकष

Provident Fund Accounts : नवी दिल्ली : प्रोव्हिडंट फंड म्हणजे भविष्य निर्वाह निधी योजना (PF)या नोकरदारांसाठी खूप महत्त्वाच्या असतात. निवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांच्या हाती निवृत्तीनंतर पैसा असावा आणि त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये. या योजनांअंतर्गत नियमित गुंतवणूक (Investment) केली जाते. या गुंतवणुकीतून कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर मोठी रक्कम मिळते. मात्र पीएफच्या किती प्रकारच्या योजना आहेत हे तुम्हाला माहित आहे का? प्रॉव्हिडंट फंड योजनांमध्ये कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF), सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) आणि सामान्य भविष्य निर्वाह निधी (GPF) यांचा समावेश आहे. हे तिन्ही प्रकार काय आहेत हे जाणून घेऊया. (Different types of provident fund schemes and benefits)

अधिक वाचा  :मुंबईत पुन्हा सीएनजी-पीएनजीच्या दरात वाढ

प्राव्हिडंट फंडांच्या विविध योजना आणि त्यांची वैशिष्ट्ये-

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी म्हणजेच ईपीएफ (EPF)
सर्वसामान्यपणे आपण जेव्हा पीएफ म्हणतो तेव्हा याच योजनेसंदर्भात बोलत असतो. EPF ही सरकारी कर्मचार्‍यांव्यतिरिक्त इतर नोकरदार लोकांसाठी भविष्य निर्वाह निधी योजना आहे. या योजनेचे संचालन आणि नियमन कर्मचारी भविष्य निर्वाह संस्थेद्वारे (EPFO) चालविली जाते. सध्याच्या EPFO ​​नियमांनुसार, एक कर्मचारी मूळ वेतन आणि महागाई भत्त्याच्या 12 टक्के, कमाल 15,000 रुपये प्रति महिना योगदान देतो. म्हणजे त्याच्या वेतनातून दरमहा इतकी रक्कम कापली जाते. त्याचबरोबर तो ज्या कंपनीत काम करत असतो ती कंपनीदेखील तितकीच रक्कम (12 टक्के) कर्मचाऱ्याच्या पीएफ खात्यात जमा करते.

अधिक वाचा  : Blood Sugar Control Tips: मधुमेहाची लक्षणे दिसताच लगेच करा हे 5 उपाय...होईल फायदा

पीएफमधील योगदानात कंपनीच्या वतीने 8.33 टक्के कर्मचारी पेन्शन योजना (EPS) मध्ये जमा केली जाते. तर उर्वरित 3.67 टक्के रक्कम कर्मचाऱ्याच्या EPF खात्यातमध्ये गुंतवली जाते. चालू आर्थिक वर्षासाठी म्हणजे 2022-23 साठी EPF चा व्याजदर 8.10 टक्के आहे. कर्मचारी निवृत्तीनंतर त्यांचे ईपीएफ खाते कायमचे बंद करू शकतात आणि नोकरी बदलताना ते हस्तांतरित करू शकतात.

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी किंवा पीपीएफ (PPF)

PPF ही एक स्वैच्छिक भविष्य निर्वाह निधी योजना आहे. म्हणजेच या योजनेत गुंतवणूक करायवयाची असल्यास तुम्हाला स्वत:च यात गुंतवणूक करावी लागते. पगारदार किंवा पगारदार नसलेला कोणताही भारतीय नागरिक हे खाते उघडू शकतो. एखादी व्यक्ती पीपीएफ खाते सुरू केल्यानंतर एका आर्थिक वर्षात त्याच्या PPF खात्यात किमान 500 रुपये आणि जास्तीत जास्त 1,50,000 रुपये जमा करू शकते.

EPF हे खाते नोकरदार जोपर्यत नोकरी करतो तोपर्यत सुरू असते आणि त्याच्या निवृत्तीनंतर त्याला त्यातील रक्कम मिळते. तर PPF खाते 15 वर्षांच्या कालावधीसाठी असते. यात पाच वर्षांच्या ब्लॉकने कालावधी वाढवता येतो. पीपीएफ खाते उघडल्याच्या सातव्या आर्थिक वर्षापासून दरवर्षी आंशिक पैसे काढता येतात. पीपीएफवरील सध्याचा व्याजदर 7.1 टक्के इतका आहे.

अधिक वाचा  : 'द केरला स्टोरी'चा टीझर आऊट

सामान्य भविष्य निर्वाह निधी किंवा जीपीएफ (GPF)

जनरल प्रॉव्हिडंट फंड (GPF)ही योजना फक्त केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी आहे. यात नियमित कर्मचाऱ्यांबरोबरच सर्व तात्पुरते सरकारी कर्मचारी जे एका वर्षापासून सतत सेवेत आहेत असे सर्व कायम कर्मचारी आणि सर्व पुनर्नियुक्ती पेन्शनधारक GPF खाते उघडू शकतात. या योजनेत मासिक पगाराच्या किमान 6 टक्के रक्कम जीपीएफ खात्यात जमा करावी लागते. चालू तिमाहीसाठी GPF योजनेवरील व्याज दर 7.1 टक्के आहे. ही योजना केंद्र सरकारच्या पेन्शन आणि पेन्शनर्स विभागामार्फत चालवले जाते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी