बँकेतून पैसे काढणं पडणार महागात, 'इतकी' रक्कम काढल्यास द्यावा लागणार कर?

काम-धंदा
Updated Jun 10, 2019 | 18:11 IST | टाइम्स नाऊ मराठी

Tax on Cash: रोख व्यवहार कमी करुन डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. आता सरकारने एक नवा प्रस्ताव तयार केला असून यानुसार, बँकेतून रोकड काढल्यास टॅक्स द्यावा लागण्याची शक्यता आहे.

Government planing tax on cash withdrawal
बँकेतून 'इतकी' रक्कम काढल्यास द्यावा लागू शकतो कर  |  फोटो सौजन्य: Thinkstock

मुंबई: डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आता सरकारने नवा प्रस्ताव सादर केला आहे. या प्रस्तावानुसार, बँक खात्यातून जास्त प्रमाणात रोख रक्कम काढण्यास टॅक्स द्यावा लागण्याची शक्यता आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, बँक अकाऊंटमधून एका वर्षभरात १० लाख रुपयांपेक्षा अधिक पैसे काढल्यास त्यावर कर (टॅक्स) आकारण्याचा प्रस्तावावर सरकार विचार करत आहे.

कागदी मुद्राचा उपयोग करण्यासाठी आणि डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारचे हे प्रयत्न असल्याचं बोललं जात आहे. सरकारी सूत्रांच्या मते, जास्त रक्कमेच्या व्यवहारांसाठी आधार प्रमाणीकरण करण्याच्या प्रस्तावावर सुद्धा चर्चा सुरू आहे. या निर्णयामुळे त्या व्यक्तिला ट्रॅक करणं सोपं जाईल आणि त्यामुळे त्या व्यक्तींकडून टॅक्स आणि टॅक्स रिटर्न मिळेल.

या प्रक्रियेत केवळ आधार कार्डच नाही तर OTP च्या माध्यमातून आधार प्रमाणीकरण केलं जाईल. जेणेकरुन आधार नंबरचा दुरुपयोग होणार नाही. एका अधिकाऱ्याने सांगितले की, एखादा व्यक्ती मनरेगाची रक्कम बँकेतून काढण्यासाठी गेला तर त्याला आधार प्रमाणीकरण करावं लागतं तर एखादा व्यक्ती ५ लाख रुपये बँकेतून काढायला गेला तर त्याला कुठल्याही प्रकारचं आधार प्रमाणीकरण द्यावं लागत नाही.

सरकारच्या मते, वर्षाला एखाद्या व्यापाऱ्याला किंवा कुठल्याही व्यक्तिला १० लाख रुपये रोख बँकेतून काढण्याची आवश्यकता सामान्यत: पडत नाही. कारण, डिजिटल पेमेंटच्या सुविधा आता उपलब्ध झालेल्या आहेत. फारच कमी व्यक्तिंना वर्षाला १० लाख रुपयांची आवश्यकता भासते.

ही चर्चा ५ जुलै रोजी सादर होणाऱ्या अर्थसंकल्पापूर्वी केली जात आहे. सूत्रांच्या मते, सरकारने तयार केलेल्या या प्रस्तावावर अद्याप अंतिम निर्णय झालेला नाहीये. गेल्या आठवड्यात रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) ने एनईएफटी आणि आरटीजीएस यावर लावण्यात येणारे चार्जेस हटवण्यात आले. यामुळे डिजिटल पेमेंट करण्यास मदत होणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
बँकेतून पैसे काढणं पडणार महागात, 'इतकी' रक्कम काढल्यास द्यावा लागणार कर? Description: Tax on Cash: रोख व्यवहार कमी करुन डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. आता सरकारने एक नवा प्रस्ताव तयार केला असून यानुसार, बँकेतून रोकड काढल्यास टॅक्स द्यावा लागण्याची शक्यता आहे.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola