Divi's Lab declared Dividend : नवी दिल्ली : फार्मास्युटीकल्स क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या डिव्हिस लॅबोरेटरीज (Divi's Laboratories)या कंपनीला दणदणीत नफा झाला आहे. त्यामुळे आता कंपनी आपल्या गुंतवणुकदारांना लाभांश भेट देणार आहे. डिव्हिस लॅबच्या संचालक मंडळाने 2021-22 या आर्थिक वर्षासाठी प्रत्येक शेअरसाठी 1500 टक्के लाभांश देण्याची शिफारस केली आहे. सोमवार, 23 मे 2022 रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) वर डिव्हिस लॅबचे शेअर्स 9.5 टक्क्यांनी घसरून 3,897.55 रुपयांवर बंद झाले. डिव्हिस लॅबच्या शेअर्सचा 52 आठवड्यांचा उच्चांक 5,425 रुपये रुपये प्रति शेअर आहे. (Divi's Laboratories declares 1500% dividend to shareholders)
अधिक वाचा : Multibagger Stock : टाटांच्या या शेअरबद्दल माहित आहे का? गुंतवणुकदार झाले करोडपती, लाखाचे झाले करोडो...
प्रत्येक शेअरवर 30 रुपये लाभांश देण्याची तयारी कंपनीच्या संचालक मंडळाने सोमवारी झालेल्या बैठकीत 2021-22 या आर्थिक वर्षासाठी 2 रुपये दर्शनी मूल्याच्या प्रत्येक इक्विटी शेअरवर 1500 टक्के (म्हणजेच प्रति शेअर 30 रुपये) लाभांश देण्याची शिफारस केली आहे, असे कंपनीने एक्सचेंज फाइलिंगमध्ये म्हटले आहे. . एजीएमच्या तारखेपासून 30 दिवसांच्या आत लाभांश जमा केला जाईल. कंपनी एजीएमची तारीख आणि लाभांश भरण्याची रेकॉर्ड तारीख येत्या काही दिवसांत जाहीर करेल. डिव्हिस लॅबोरेटरीजचे बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजवरील बाजारमूल्य 1,03,467 कोटी रुपयांचे आहे.
अधिक वाचा : Multibagger Stock : हा 23 पैशांचा शेअर पोचला 9 रुपयांवर...एका वर्षात 1 लाखाचे झाले 40 लाख
मार्च तिमाहीत कंपनीला 894 कोटी रुपयांचा नफा झाला आहे डिव्हिस लॅबोरेटरीजने (Divis Laboratories)जानेवारी-मार्च 2022 तिमाहीत 894 कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला. गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत कंपनीच्या नफ्यात 78 टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत कंपनीला 502 कोटी रुपयांचा नफा झाला होता. मार्च 2022 च्या चौथ्या तिमाहीत कंपनीचा महसूल 40 टक्क्यांनी वाढून 2,518 कोटी रुपये झाला. जे मागील वर्षी याच कालावधीत 1,788 कोटी रुपये होते. डिव्हिस लॅबोरेटरीज एपीआय उत्पादनातील एक आघाडीची औषध निर्मिती कंपनी आहे.
कोणतीही आपल्याला झालेल्या नफ्यातील काही हिश्याचे वाटप आपल्या गुंतवणुकदारांमध्ये म्हणजे शेअरधारकांमध्ये करते, यालाच लाभांश किंवा डिव्हिडंड असे म्हणतात. तुमच्याकडे त्या कंपनीचे जितके शेअर्स असतील तितक्या प्रमाणात हा लाभांश मिळतो. शेअर्स जितके जास्त तितकी लाभांशाची रक्कमदेखील जास्त असते. लाभांश देण्यासाठी कंपनीला चांगला नफा व्हावा लागतो आणि तिची आर्थिक स्थिती भक्कम असावी लागते.
फार्मा कंपन्यांनी यंदा दणकून कमाई केली आहे. शेअर बाजारात (share market) औषध निर्मिती कंपन्यांनी दणकून कमाई करून दिली आहे. फार्मा कंपन्यांच्या (Pharma Company) शेअर्सनी मागील काही वर्षात जोरदार तेजी दाखवली आहे. असाच एक शेअर आहे- 'अजंता फार्मा' (Ajanta Pharma)या औषधनिर्मिती कंपनीचा. अजंता फार्माच्या समभागांनी दीर्घ कालावधीत त्यांच्या गुंतवणुकदारांना 55,336% पेक्षा जास्त चांगला परतावा दिला आहे. कंपनीने अलीकडेच गुंतवणुकदारांना बोनस शेअर्स देण्याची घोषणा केली आहे.
(डिस्क्लेमर : आर्थिक साक्षरता वाढवणे हाच टाइम्स नाऊ मराठीचा उद्देश आहे. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखीमयुक्त असते. आम्ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक सुचवत नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या आर्थिक सल्लागाराच्या मार्गदर्शनाखाली योग्य तो निर्णय घ्यावा.)