Financial Planning Tips | नवीन आर्थिक वर्षात तुमच्या फायद्याच्या 5 गोष्टी... हे केल्यास तंदुरुस्त राहील तुमचा खिसा

Investment : र्थिक नियोजनातील (Financial Planning)सर्वात महत्त्वाची टिप्स म्हणजे उत्पन्न मिळण्यास सुरूवात होताच तुमचे बजेट बनवा. किती पैसे येणार आहेत आणि किती खर्च होणार आहे याची लिखित नोंद तुमच्याकडे ठेवा. अनावश्यक खर्च तर होत नाहीना हे यातून तुमच्या लक्षात येईल. खर्च केल्यावर किती बचत (Savings)होते आहे याचा अंदाज घ्या. अर्थात दरमहा काही सक्तीची बचत तुम्ही केलीच पाहिजे.

Financial Planning Tips
आर्थिक नियोजनाची सूत्रे 
थोडं पण कामाचं
  • कमाई करण्यास सुरूवात केल्याबरोबर बजेटची आखणी करा
  • दरमहा सक्तीने बचत करा आणि त्यातून गुंतवणूक करा
  • गुंतवणुकीच्या पोर्टफोलिओचा वेळोवेळी आढावा घ्या

Top Financial Planning Tips : नवी दिल्ली : आर्थिक नियोजनातील (Financial Planning)सर्वात महत्त्वाची टिप्स म्हणजे उत्पन्न मिळण्यास सुरूवात होताच तुमचे बजेट बनवा. किती पैसे येणार आहेत आणि किती खर्च होणार आहे याची लिखित नोंद तुमच्याकडे ठेवा. अनावश्यक खर्च तर होत नाहीना हे यातून तुमच्या लक्षात येईल. खर्च केल्यावर किती बचत (Savings)होते आहे याचा अंदाज घ्या. अर्थात दरमहा काही सक्तीची बचत तुम्ही केलीच पाहिजे. त्यानंतर त्या बचतीचा वापर करून योग्य ती गुंतवणूक (Investment) करा. यासाठी तुम्ही गुंतवणुकीचा एक भक्कम पोर्टफोलिओ तयार करा. त्याचबरोबर गुंतवणूक करतानाच तुम्ही तुमच्या बजेटमधील कोणत्याही आपत्कालीन खर्चासाठी पैसे कुठून आणाल याचीही योजना तयार करणे आवश्यक आहे. (Do these things in this financial year to get finanical benefits)

अधिक वाचा : Small Savings Schemes Update | तुमच्यासाठी आनंदाची बातमी! एप्रिल-जून 2022 साठी अल्पबचत योजनांचे व्याजदर जैसे थे...व्याजदरात बदल नाही

प्राप्तिकराचे नियोजन

तुम्ही प्रत्येक आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला प्राप्तिकराचे नियोजन करता का? जर नसेल तर ते करायला सुरुवात करा आणि आतापासून त्यावर काम करा. यामुळे शेवटच्या क्षणी तुमची कोणतीही चूक होणार नाही आणि तुमच्यावर कोणताही आर्थिक बोजा पडणार नाही.

पुरेसा आयुर्विमा हवाच

अपघातामुळे किंवा कोणत्याही अनपेक्षित परिस्थितीमुळे उत्पन्नाचे नुकसान झाल्यास विमा तुमच्या कुटुंबातील सदस्यांना आर्थिक भरपाई देतो. तुमच्या विमा गरजांचे मूल्यमापन करा आणि त्यानुसार विमा घ्या. तुमच्यासाठी टर्म इन्शुरन्स घेणे चांगले होईल कारण तो आयुर्विम्याचा सर्वात स्वस्त पर्याय आहे.

अधिक वाचा : Homebuyers alert | तुमच्या गृहकर्जावर 1 एप्रिलपासून नाही मिळणार 'हा' कर वजावटीचा लाभ...पाहा किती बसणार फटका

क्रिप्टोकरन्सी कराचा मुद्दा

क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणुकीचे प्रमाण वाढते आहे. मात्र, 2022 च्या अर्थसंकल्पात त्यातून होणाऱ्या नफ्यावर 30 टक्के कर लावण्यात आला आहे. जाणकार म्हणतात, 'आम्ही आमच्या ग्राहकांना सल्ला देऊ इच्छितो की जर तुमचा पैसा इतका पैसा असेल की तुम्हाला तो गमावल्याबद्दल दुःख होणार नाही, तर तुम्ही ते क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवू शकता.' ते म्हणाले की ही खूपच जोखमीची गुंतवणूक आहे. त्यामुळे तुमचा पोर्टफोलिओमध्ये थोडासा भाग असू शकतो. 30 टक्के करानंतर त्याचा परतावा सारखा राहणार नाही.

अधिक वाचा : PAN-Aadhaar Linking | तुमचे आधार कार्ड, पॅन कार्डशी लिंक आहे की नाही कसे चेक कराल? पाहा सोपी पद्धत

गुंतवणुकीच्या पोर्टफोलिओचा आढावा

तुमची आर्थिक योजना लागू झाल्यानंतरही तुम्ही त्याच्या पोर्टफोलिओच्या कामगिरीवर लक्ष ठेवावे. वास्तविक, बहुतेक लोक त्यांच्या योजनेकडे लक्ष न देऊन चुका करतात, ज्याचा फटका त्यांना सहन करावा लागतो. जर, तुम्ही कुठेतरी गुंतवणूक केली असेल आणि ती तुमच्या टार्गेटनुसार कामगिरी करत नसेल, तर तुम्ही त्याचे मूल्यमापन करून इतर गुंतवणुकीच्या मार्गावर गुंतवणूक करावी. मूल्यांकन केल्यामुळे तुमची आर्थिक योजना अधिक धारदार होण्यास मदत होईल.

रिटायरमेंट प्लॅनिंग

गुंतवणूक करताना अल्पकालीन आणि दीर्घकालीन गुंतवणूक असे दोन भाग करा. लक्षात ठेवा दीर्घकालीन गुंतवणुकच तुमच्यासाठी संपत्ती निर्मितीचे काम करते. सातत्यपूर्णरित्या दीर्घकालावधीसाठी केलेली गुंतवणूक तुमच्यासाठी मोठी रक्कम कमावून देते. आर्थिक नियोजन करताना रिटायरमेंट प्लॅनिंगदेखील हमखास केले पाहिजे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी