Demat Account Fraud : तुमच्या डिमॅट खात्यातही होऊ शकते फसवणूक, मोहात पडून करू नका हे काम

Demat Account : शेअर बाजारात खरेदी-विक्री करणारे शेअर्स त्यांच्या डीमॅट खात्यात (Demat Account) साठवले जातात. त्याचबरोबर डीमॅट खात्यातच तुमचे शेअर्स आणि पैसे जोडलेले असतात. डिमॅट खात्याची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन आहे. त्यामुळे यात फ्रॉड होण्याचा किंवा फसवणूक होण्याचाही धोका असतो. फसवणूक टाळण्यासाठी तुम्ही कोणत्या गोष्टींची खबरदारी घेतली पाहिजे ते पाहा.

Demat Account
डीमॅट खाते 
थोडं पण कामाचं
  • शेअर बाजारातील गुंतवणुकीसाठी डीमॅट खाते आवश्यक
  • डीमॅट खात्याचे व्यवहार ऑनलाइन असल्याने फसवणूक शक्य
  • कोणत्या गोष्टींची खबरदारी घ्याल

Share Market : नवी दिल्ली  : अलीकडच्या काळात मोठ्या संख्येने सर्वसामान्य गुंतवणुकदार शेअर बाजारात (Share Market) गुंतवणूक करत आहेत. त्यामुळे मोठ्या संख्येने नवीन डीमॅट खाती सुरू केली जात आहेत. शेअर बाजारात खरेदी-विक्री करणारे शेअर्स त्यांच्या डीमॅट खात्यात (Demat Account) साठवले जातात. त्याचबरोबर डीमॅट खात्यातच तुमचे शेअर्स आणि पैसे जोडलेले असतात. डिमॅट खात्याची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन आहे. त्यामुळे यात फ्रॉड होण्याचा किंवा फसवणूक होण्याचाही धोका असतो. फसवणूक टाळण्यासाठी तुम्ही काही गोष्टींची खबरदारी घ्यायला हवी. (Do these things to avoid fraud in your Demat account)

अधिक वाचा - Pimples Treatment: टोमॅटोच्या 'या' ब्युटी पॅकमुळे पिंपल्सपासून होईल सुटका

डीमॅट खात्याचा उपयोग आणि फायदे

शेअर बाजारात व्यवहार करण्यासाठी किंवा गुंतवणूक करण्यासाठी डीमॅट खाते आवश्यक आहे. त्यामुळे डीमॅट खात्याची हाताळणी करताना त्याचे फायदे आणि बारकावे जाणून घेणे देखील महत्त्वाचे आहे. डीमॅट खात्याद्वारे शेअर्स सहज आणि वेगाने हस्तांतरित केले जाऊ शकतात. शिवाय ट्रेडिंगचे व्यवहार सहजपणे केले जाऊ शकतात.  याशिवाय या खात्यात तुम्ही कधीही लॉगिन करू शकता. तुमच्या डीमॅट खात्यात बोनस स्टॉक, राइट्स इश्यू आणि स्प्लिट शेअर्स आपोआप जमा होतात.

अधिक वाचा - Blackheads Removal Tips: डेड स्किन-ब्लॅकहेड्सला म्हणा Bye-Bye, लावा हा फेस पॅक; चेहऱ्यावर येईल Glow

डिमॅट खात्याच्या फसवणुकीपासून वाचवण्यासाठी करा या गोष्टी -

लॉगिन डिटेल्स सुरक्षित ठेवा 

तुमच्याकडे मजबूत पासवर्ड असले पाहिजेत आणि ते काळजीपूर्वक ठेवले पाहिजेत. ते कुठेही लिहून ठेवू नये आणि लक्षात ठेवणे चांगले. तसेच ते नियमितपणे बदलणे देखील आवश्यक असते. 

तुमच्या अकाउंट स्टेटमेंटवर लक्ष असू द्या 

तुमचा फोन नंबर आणि ई-मेल नेहमी अपडेट ठेवा. त्याचबरोबर डिपॉझिटरीद्वारे तुम्हाला पाठवलेले सर्व स्टेटमेंट आणि एसएमएस काळजीपूर्वक वाचा. नेहमी त्यावर बारकाईने लक्ष ठेवा. तुम्ही तुमच्या डीमॅट खात्यातील सर्व व्यवहार तुमच्या ट्रेडिंग अॅक्टिव्हिटीशी जुळवून घ्या आणि कोणत्याही विसंगतीची तात्काळ डिपॉझिटरीला तक्रार करा.

पॉवर ऑफ अॅटर्नी

तुमचा डिपॉझिटरी पार्टिसिपंट (ब्रोकर) मालकीच्या व्यापारात गुंतलेला नाही आणि मुखत्यारपत्राला मर्यादित वाव आहे याची खातरजमा करा. यामुळे तुमच्या ब्रोकरद्वारे तुमच्या डिमॅट खात्याची फसवणूक होण्याची शक्यता कमी होईल.

तुमचे खाते गोठवा

तुम्ही जर तुमच्या डीमॅट खात्याचा वापरच करत नसाल तर तुमचे डिमॅट खाते फ्रीझ करा.

अधिक वाचा - आजपासून मुंबईत चारचाकी वाहनांमध्ये सीटबेल्ट सक्ती

शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी आधी तुम्ही तिथे खाते सुरू केले पाहिजे. जसे बॅंकेत व्यवहार करण्यासाठी तुम्हाला बॅंक खात्याची आवश्यकता असते तसेच शेअर बाजारात व्यवहार करण्यासाठी काही खात्याची आवश्यकता असते. शेअर मार्केटमध्‍ये गुंतवणूक सुरू करण्‍यासाठी, तुम्‍हाला तीन खात्‍यांची आवश्यकता असते. ही तीन खाती म्हणजे डिमॅट खाते, ट्रेडिंग खाते आणि अर्थातच बँक खाते.

 तुमचे शेअर्स ठेवण्यासाठी एका खात्याची आवश्यकता असते. त्यालाच डीमॅट खाते म्हणतात. जसे तुम्ही बॅंक खात्यातून पैसे काढता किंवा पैसे जमा करता तसेच डीमॅट खात्याचे असते. डीमॅट खाते किंवा डीमॅट खाते इलेक्ट्रॉनिक स्वरूपात शेअर्स किंवा सिक्युरिटीज ठेवण्याची परवानगी देते. ही खाती तुमचे शेअर्स सांभाळतात. तुमच्या शेअर्सचा सर्व लेखाजोखा तुम्हाला या डीमॅट खात्यात मिळतो. 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी