31st March 2023: नवीन आर्थिक वर्ष 1 एप्रिलपासून सुरू होत आहे. मात्र, त्यापूर्वी म्हणजेच 31 मार्चपर्यंत अशा काही गोष्टी आहेत ज्या पूर्ण करणं गरजेचं आहे. कारण 1 एप्रिलपासून अनेक गोष्टींमध्ये बदल होणार आहेत. जे तुमच्या फायनान्शियल प्लानिंगपासून ते दैनंदिन आयुष्यातील गोष्टींपर्यंत अनेक गोष्टींवर प्रभाव टाकू शकतात. जाणून घ्या 31 मार्चपूर्वी कोणती कामे पूर्ण करणं अत्यावश्यक आहे.
जर तुम्ही आपलं पॅनकार्ड हे आधार कार्डसोबत लिंक केलं नाहीये तर तुमचं पॅन कार्ड रद्द होईल. या व्यतिरिक्त मार्च अखेरपर्यंत म्हणजेच चालू आर्थिक वर्ष संपत आहे. इतर अनेक आर्थिक कामे आहेत ज्यामध्ये आर्थिक वर्ष 2020-21 साठी अपडेटेड आयकर रिटर्न (ITR) दाखल करणे आणि टॅक्सची बचत करण्यासाठी गुंतवणूक या महिन्याच्या अखेरपर्यंत पूर्ण करावं लागणार आहे.
हे पण वाचा : गरोदरपणात तणाव दूर करण्यासाठी सोप्या टिप्स
आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करण्याची शेवटची तारीख आयकर विभागाने वारंवार वाढवून दिली आहे. आता या महत्त्वाच्या दोन डॉक्युमेंट्सला लिंक करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2023 देण्यात आली आहे. आयकर विभागानुसार, जर एखाद्या व्यक्तीने पॅन कार्ड 1 एप्रिल 2023 पर्यंत आधार कार्डसोबत लिंक केले नाही तर त्यांचे पॅन कार्ड रद्द होईल. म्हणजेच तुम्ही बँक अकाऊंट, गुंतवणूक किंवा इन्कम टॅक्स संदर्भातील कोणतेही काम करू शकणार नाहीत.
हे पण वाचा : हे शाकाहारी पदार्थ तुमचे मसल्स बनवतील बळकट
आर्थिक वर्ष 2019-20 किंवा मूल्यांकन वर्ष 2020-21 साठी अपडेटेड आयटीआर जमा करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2023 आहे. 31 मार्च 2023 नंतर तुम्ही हे काम करु शकणार नाहीत.
हे पण वाचा : उन्हाळ्यात फिरण्यासाठी बेस्ट हिल स्टेशन, एकदा पहाच
मार्च महिन्याच्या शेवटी म्हणजे 31 मार्च रोजी चालू आर्थिक वर्ष संपत आहे. नोकरी करणाऱ्या व्यक्तीला, ज्याचे वार्षिक उत्पन्न आयकर स्लॅब अंतर्गत येते त्याला गुंतवणूक करण्याच्या संदर्भातील कामे याच महिन्यात पूर्ण करावी लागतील. पीपीएफ, ईएलएसएस म्युच्युअल फंड, टॅक्स सेव्हिंग बँक एफडी यासारख्या गोष्टी गुंतवणुकीत समाविष्ट आहेत.
हे पण वाचा : हात-पाय सुन्न होणे गंभीर आजाराचे लक्षण?
गुंतवणूक करण्याच्या पर्यायांच्या व्यतिरिक्त एलआयसी पॉलिसी घेण्याचा सल्ला देण्यात येतो. कारण, तुमच्या कुटुंबीयांसाठी हे आवश्यक आहे. एलआयसी पॉलिसी ही गुंतवणुकीच्या पर्यायाच्या वेगळी असायला हवी. तसेच एलआयसी पॉलिसीवर तुम्हाला आयकरातून सुद्धा सूट मिळते.