Passport Application | पासपोर्ट बनवणार असाल तर हे काम नक्की करा, नाहीतर अर्ज येईल परत...

Passport update : जर तुम्ही पासपोर्ट (Passport) बनवण्याचा विचार करत असाल किंवा त्यासाठी अर्ज करणार असाल तर हे काम नक्की करा, अन्यथा अर्ज केल्यानंतर तुमचा पासपोर्ट परत येऊ शकतो. त्यानंतर तुम्हाला पुन्हा अर्ज करावा लागेल. पश्चिम उत्तर प्रदेशातील 13 जिल्ह्यांतील गाझियाबाद पासपोर्ट केंद्राकडे असे अनेक अर्ज येत आहेत, त्यामुळे ते थांबवण्यात आले आहेत. दुसरीकडे अर्जदार नाराज झाले आहेत. सरकारने अलीकडच्या काळात पासपोर्टची प्रक्रिया अधिक सुलभ आणि अद्ययावत केली आहे.

Passport Procedure
पासपोर्ट बनवताना घ्यावयाची काळजी 
थोडं पण कामाचं
  • पासपोर्ट बनवण्यापूर्वी जाणून घ्या नियम
  • पासपोर्टसाठी अर्ज करण्यापूर्वी आधार कार्डचा फोटो करा अपडेट
  • ताजा फोटो अपडेट नसल्यास तुमचा पासपोर्ट अर्ज परत येईल

Passport Application : नवी दिल्ली : जर तुम्ही पासपोर्ट (Passport) बनवण्याचा विचार करत असाल किंवा त्यासाठी अर्ज करणार असाल तर हे काम नक्की करा, अन्यथा अर्ज केल्यानंतर तुमचा पासपोर्ट परत येऊ शकतो. त्यानंतर तुम्हाला पुन्हा अर्ज करावा लागेल. पश्चिम उत्तर प्रदेशातील 13 जिल्ह्यांतील गाझियाबाद पासपोर्ट केंद्राकडे असे अनेक अर्ज येत आहेत, त्यामुळे ते थांबवण्यात आले आहेत. दुसरीकडे अर्जदार नाराज झाले आहेत. सरकारने अलीकडच्या काळात पासपोर्टची प्रक्रिया अधिक सुलभ आणि अद्ययावत केली आहे. त्याचबरोबर जिल्हापातळीवर पासपोर्ट उपलब्ध करून देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. इतर सेवांप्रमाणेच या सेवेतदेखील डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर केला जातो आहे. (Do this important thing before apllying for passport)

अधिक वाचा : Indian Post Vacancy : महाराष्ट्रात पोस्टात आहे नोकरी, अर्ज करण्याची आहे ही अखेरची तारीख, वाचा सविस्तर

पासपोर्ट अर्ज करतानाच्या समस्या

गाझियाबादमधील प्रादेशिक पासपोर्ट अधिकारी सुब्रतो हाजरा यांनी सांगितले की, पासपोर्टसाठी अर्ज करण्यापूर्वी लोकांनी आवश्यक कागदपत्रे अपडेट करणे आवश्यक आहे, जेणेकरून त्यांचे पासपोर्ट वेळेवर बनवता येतील, त्यांना कोणत्याही प्रकारच्या समस्येचा सामना करावा लागणार नाही. अनेक लोक आधार कार्डचा फोटो अपडेट करून अर्ज करत नाहीत.

प्रत्येक तिसरा अर्जदार गाझियाबादमधील साहिबााबाद पासपोर्ट सेवा केंद्र आणि 13 जिल्ह्यांमध्ये सुरू असलेल्या पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्रांमध्ये आधारमध्ये फोटो अपडेट न करता पोहोचत आहे. त्यामुळे पासपोर्ट कार्यालयात प्रलंबित राहण्याचे प्रमाण वाढत असून, त्यामुळे अर्जदारांची अडचण होत आहे. आधार कार्डमध्ये जुना फोटो असल्यास, अर्जदारांची फाईल धरून ठेवताना तो परत केला जातो. त्यानंतर अर्जदारांना पुन्हा प्रक्रियेतून जावे लागेल.

अधिक वाचा : PAN-Aadhar Mandatory: सरकारने बँक-पोस्ट ऑफिसचे बदलले नियम, आता या रकमेच्या व्यवहारासाठी पॅन-आधार तपशील आवश्यक

पासपोर्टसाठी ही कागदपत्रे अपडेट करणे आवश्यक

जिल्हा पासपोर्ट अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, पासपोर्ट बनवण्यासाठी आधार कार्डमधील ( Aadhar Card) फोटो अपडेट केल्यानंतरच तिथे पोहोचा. बँक खात्याचे पासबुक, ज्यावर अर्ज केल्याच्या तारखेपासून शेवटच्या तीन महिन्यांची नोंद केली जाते आणि ज्यामध्ये अर्जदाराचे अलीकडील छायाचित्र चिकटवले जाते. तो लावावा. अशाप्रकारे अर्ज भरून पासपोर्ट मिळण्यास होणाऱ्या विलंबापासून तुमची सुटका होऊ शकते.

देशातील सर्व राज्यात प्रत्येक जिल्ह्यातून पासपोर्ट प्रक्रिया पूर्ण केली जाते. त्यासाठी पासपोर्ट सेवा केंद्र सुरू करण्यात आले आहेत.

अधिक वाचा : मुंबई-पुण्यासह पाच शहरात Swiggy नाही देणार किराणा, बंद केली ही महत्त्वाची सर्विस, जाणून घ्या कारण

लवकरच ई-पासपोर्ट

टेक्नोलॉजीमुळे (Technology) अनेक गोष्टी खूपच सोप्या झाल्या आहेत. अनेक वस्तू आणि ठिकाणांची माहिती आपल्याला घरी बसून मिळवता येते. तंत्रज्ञानाचा नागरिकांना अजून जास्त फायदा व्हावा याासाठी सरकार नियमित पासपोर्टच्या (Passport) जागी ई-पासपोर्ट (E-passport) जारी करणार आहे. नागरिकांना  २०२२-२३ च्या सुरुवातीला ई-पासपोर्ट जारी करण्यात येणार असल्याची योजना आहे. रराष्ट्र मंत्रालयाने नॅशनल इंफॉर्मेटिक्स सेंटरला (NIC) ई-पासपोर्ट जारी करण्यासाठी तांत्रिक जबाबदारी सोपवली आहे. ते म्हणाले की, ई-पासपोर्टला इंडिया सिक्योरिटी प्रेस, नाशिकद्वारे तयार केले जाईल. प्रेसने ऑपरेटिंग सिस्टमसोबत ४.५ कोटी ICAO-कंप्लाइंट इलेक्ट्रॉनिक चिप्स खरेदी करण्यासाठी पत्र देखील जारी केले आहे. सध्या ई-पासपोर्टच्या सँपलचे टेस्टिंग सुरू आहे. पूर्णपणे उत्पादन आणि वितरण टेक्निकल इको-सिस्टम आणि इंफ्रास्ट्रक्चर पूर्ण झाल्यावर सुरू होईल. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी