मुंबई: संपूर्ण भारताचे ज्यावर लक्ष लागून राहिले आहे असे बजेट २०२२(Budget 2022) हे उद्या म्हणजेच १ फेब्रुवारीला सादर होणार आहे. उत्तर प्रदेशातील आगामी निवडणुका(election) पाहता संपूर्ण जनतेचे लक्ष या बजेटवर आहे. शेतकऱी तसेच शेतीला या बजेटमधून काय मिळणार. काय नवे सादर केले जाणार आहे असे अनेक प्रश्न साऱ्यांच्याच मनात आहेत. तुम्हाला माहीत आहे का गेल्या ७४ वर्षांपासून बजेट तुमच्यासाठी बनवले जात आहे. कसे बजेटचे रूप बदलत गेले. काय झाले बदल. जाणून घेऊया....Do You know the history of budget?
भारतात बजेट सादर करण्याची परंपरा ब्रिटीश काळापासून म्हणजेच १८६०पासून सुरू झाली होती. तत्काली अर्थ मंत्री आरके षणमुखाज शेट्टी यांनी स्वतंत्र भारताचे पहिले बजेट २६ नोव्हेंबर १९४७मध्ये सादर केले होते. पहिल्या बजेटमध्ये टॅक्सचा प्रस्ताव नव्हता. १५ ऑगस्ट १९४७ ते ३१ मार्च १९४८ पर्यंत साडे सात महिन्यांचा कालावधी या बजेटमध्ये सादर करण्यात आला होता.
भारताचे तिसरे अर्थमंत्री सीडी देशमुख यांना या बजेटमध्ये ऐतिहासिक बदल करण्याचे श्रेय दिले जाते. १९५१ ते १९५७ पर्यंत अर्थ कारभार सांभाळणारे देशमुख कार्यकाळात पहिल्यांदा बजेटची कॉपी इंग्रजी भाषेसह हिंदीतही छापण्यात आली होती. याआधी बजेटची कॉपी केवळ इंग्रजी भाषेतच छापली जात होती. त्यांच्याच कार्यकाळात देशात पंचवार्षिक योजना सुरू झाली.
पहिल्या महिला इंदिरा गांधी होत्या ज्यांनी भारताचे बजेट सादर केले होते. हे वर्ष होते १९६९. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधीने आपल्या सरकारच्या उपपंतप्रधान आणि अर्थ मंत्री मोरारजी देसाई यांच्याकडून अर्थ मंत्रालयाचा कारभार मागे घेतला होता. याचे वाईट वाटून मोरारजी देसाई यांनी राजीनामा दिला होता. पंतप्रधान असण्यासोबतच अर्थ मंत्रालय सांभाळणाऱ्या इंदिरा गांधी यांनी १९७०मध्ये बजेट सादर केले होते. त्या बजेट सादर करणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या होता. तसेच पंतप्रधान असताना संसदेत बजेट सादर करण्याचा रेकॉर्ड त्यांच्याआधी जवाहर लाल नेहरू यांनी १९५८ मध्ये आपल्या नावे केला हता. देशाच्या पूर्णवेळ महिला अर्थ मंत्री बनण्याचा रेकॉर्ड निर्मला सीतारमण यांच्या नावावर आहे.
अधिक वाचा - एडटेक कंपन्या चांगल्या कर धोरणांसाठी आशावादी
मोरारजी देसाई यांनी सर्वाधिक वेळा म्हणजे १० वेळा बजेट सादर केले. यात त्यांनी ८ वेळा सामान्य बजेट सादर केले आणि २ वेळा अंतरिम बजेट सादर केले.
१९९१मध्ये नरसिंहराव पंतप्रधान होते आणि मनमोहन सिंह अर्थमंत्री होते. १९९१मध्ये मनमोहन सिंह यांनी जे बजेट सादर केले ते पुढे जाऊन भारताच्या अर्थव्यवस्थेतील मैलाचा दगड ठरले. मनमोहन सिंह यांनी आर्थिक सुधारणांची सुरूवात केली. त्यांच्या कार्यकाळात भारत वेगाने उदारीकरणाच्या रूळावर धावताना दिसला.
भारतात बजेट सादर करण्याची सुरूवात ब्रिटीश काळात झाली होती. यामुळे त्यांनी भारतीय संसदेत बजेट सादर करण्याची वेळ आपल्या संसदेनुसार ठरवली होती. जेव्हा लंडनमध्ये ११ वाजत तेव्हा भारतात त्यावेळेस संध्याकाळचे ५ वाजलेले असतं. यासाठी ब्रिटीश सरकार आपल्या संसदेतील खासदरांना बजेट ऐकवण्यासाठी संध्याकाळी ५ वाजता सादर करत. मात्र तत्कालीन अर्थ मंत्री यशवंत सिन्हा यांनी बजेट सादर करण्याच्या वेळेत बदल केला. देशाच्या इतिहासात पहिल्यांदा १९९९मध्ये संध्याकाळी ५ वाजण्याऐवजी दिवसा बजेट सादर करण्यात आले.
अधिक वाचा - परीक्षा पुढे ढकल्यासाठी विद्यार्थी रस्त्यावर
२०१७मध्ये तत्कालीन अर्थ मंत्री अरूण जेटली यांनी फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या तारखेऐवजी पहिल्या तारखेला संसदेत सादर केले. त्यानंतर दरवर्षी १ फेब्रुवारीला बजेच सादर होऊ लागले. जेटली यांच्याच कार्यकाळात ९ दशकांपासून सुरू असलेली रेल्वे बजेट वेगळे सादर करण्याची परंपरा मोडीत निघाली आणि त्याचाही सामान्य बजेटमध्ये समावेश झाला.
निर्मला सीतारमण यांनी ब्रिटीश काळापासून सुरू असलेली एक परंपरा ज्यानुसार ब्रीफकेस अथवा सूटकेसमध्ये बजेट सादर करण्यात बदल केला. निर्मला सीतारमण यांनी २०१९मध्ये ब्रीफकेसऐवजी लाल कपड्यांच्या पोटलमीमध्ये बजेटची कागदपत्रे आणली होती.
कोरोना महामारी पाहता २०२१ध्ये पहिल्यांदा पूर्णपणे पेपरलेस डिजीटल बजेट संसदेत सादर करण्यात आले. या वर्षी बजेटची कॉपी छापण्याची परंपरा बंद झाली. यसोबतच निर्मला सीतारमण पहिल्या अर्थमंत्री ठरल्या ज्यांनी कागद, वहींऐजी टॅबच्या मदतीने बजेट सादर केले.
यावेळेसही अर्थमंत्री निर्मला सीतारमण पेपरलेस बजेट सादर करत आहेत. २०२२-२३ चे हे बजेटमद्ये हलवा समारंभ झाला नाही. बजेटच्या सुरूवातीला आतापर्यंत दरवर्षी अर्थ मंत्रालय पारंपारिक पद्धतीने हलवा समारंभ साजरा करत होते मात्र यावेळेस कोरोना आणि त्याच्या नव्या रूपामुळे ओमिक्रॉनमळे हलवा समारंभाचे आयोजन करण्यात आले नाही. यावेळेस हलव्या ऐवजी कर्मचाऱ्यांना मिठाई देण्यात आली.
सध्याच्या अर्थ मंत्री निर्मला सीतारमण यांच्या नावावर बजेट सादर करण्याच्या इतिहासात सर्वात दीर्घकाळ भाषण देण्याचा रेकॉर्ड नावावर आहे.