PPF withdrawal rules | पीपीएफसंदर्भातील हे 5 नियम तुम्हाला माहित आहेत काय? जाणून घ्या नाहीतर होईल नुकसान

PPF Investment : पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (Public Provident Fund) ही सर्वात पसंतीची बचत आणि गुंतवणूक (Investment)योजनांपैकी एक आहे. सर्वसामान्य नागरिक मोठ्या प्रमाणात पीपीएफमध्ये (PPF) गुंतवणूक करत असतात. ही केंद्र सरकारद्वारे संचालित केल्या जाणाऱ्या अल्पबचत योजनांपैकी (Small savings scheme) एक आहे. दर तिमाहीत सरकार यावरील व्याजदराची घोषणा करत असते. पीपीएफचा मॅच्युरिटी कालावधी 15 वर्षांचा आहे. परंतु खातेदार मॅच्युरिटी कालावधीपूर्वी त्याचे खाते बंद करू शकतो.

PPF withdrawal rules
पीपीएफमधून पैसे काढण्याचे नियम 
थोडं पण कामाचं
  • पब्लिक प्रॉव्हिडंट फंड ही सर्वात पसंतीची बचत आणि गुंतवणूक योजना
  • दर तिमाहीत सरकार यावरील व्याजदराची घोषणा करते
  • पब्लिक प्रॉव्हिडंट फंड वर सध्या 7.1 टक्के इतका व्याजदर दिला जातो आहे

PPF Investment : नवी दिल्ली : पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (Public Provident Fund) ही सर्वात पसंतीची बचत आणि गुंतवणूक (Investment) योजनांपैकी एक आहे. सर्वसामान्य नागरिक मोठ्या प्रमाणात पीपीएफमध्ये (PPF) गुंतवणूक करत असतात. ही केंद्र सरकारद्वारे संचालित केल्या जाणाऱ्या अल्पबचत योजनांपैकी (Small savings scheme) एक आहे. दर तिमाहीत सरकार यावरील व्याजदराची घोषणा करत असते. या जबरदस्त योजनेत कोणीही गुंतवणूक करू शकते. पीपीएफमध्ये किमान 500 रुपये आणि कमाल 1,50,000 रुपयांच्या वार्षिक योगदानासह गुंतवणूक करता येते. 1968 मध्ये सुरू करण्यात आलेल्या पब्लिक प्रॉव्हिडंट फंड वर सध्या 7.1 टक्के इतका व्याजदर दिला जातो आहे.
(Do you know these 5 PPF withdrawal rules? check details)

अधिक वाचा : Real Estate update | जाणून घ्या, कोणती शहरे घर खरेदीसाठी आहेत सर्वात स्वस्त आणि महाग

सुरक्षित आणि दमदार गुंतवणूक पर्याय

ही गुंतवणूक योजना 100 टक्के जोखीममुक्त गुंतवणूक आहे, कारण तिचे संचालन केंद्र सरकारद्वारे केले आहे. शेअर बाजाराप्रमाणे त्यात अस्थिरता किंवा जोखीम नाही किंवा ती बाजारातील घटकांनुसार बदलत नाही. या योजनेत बचत आणि गुंतवणूक यांचा समन्वय घालण्यात आला आहे. पीपीएफचा मॅच्युरिटी कालावधी 15 वर्षांचा आहे. परंतु खातेदार मॅच्युरिटी कालावधीपूर्वी त्याचे खाते बंद करू शकतो.

पीपीएफमधून पैसे काढण्याच्या नियमांनुसार, या योजनेत खाते असलेली कोणतीही व्यक्ती काही अटी व शर्ती पूर्ण केल्या गेल्यामुळे तिचे/तिचे खाते बंद करू शकते. पीपीएफ खात्याची पाच वर्षे पूर्ण झाल्यावरच हे लागू होते.

अधिक वाचा :  Gold Prices Today | सलग चौथ्या दिवशी सोन्याची झळाली घटली, अमेरिकेतील जॉब डेटाचा सोन्यावर दबाव, आता गुंतवणूक करावी का?

पीपीएफमधून पैसे काढण्याबाबत हे पाच नियम जाणून घेऊय़ा आहेत:-

  1. - पीपीएफ खातेधारक केवळ योजनेच्या मॅच्युरिटीनंतर म्हणजेच 15 वर्षे पूर्ण झाल्यानंतर खात्यातील शिल्लक पूर्णपणे काढू शकतो.
  2. - आर्थिक आणीबाणीच्या परिस्थितीत, खाते उघडण्याच्या सातव्या वर्षापासून पीपीएफ खात्यातून आंशिकरित्या रक्कम काढण्याची परवानगी आहे.
  3. -  खातेदार मुदतीपूर्वी पैसे काढू शकतो परंतु पीपीएफ खाते उघडण्यास चार वर्षे पूर्ण झाल्यानंतरच तो असे करण्यास पात्र आहे.
  4. - जर एखाद्याला त्याचे/तिचे खाते बंद करायचे नसेल, तर तो किंवा ती आपले पीपीएफ खाते त्यात कोणतीही रक्कम जमा न करता सक्रिय ठेवू शकते. अशा परिस्थितीत, त्या खात्यामध्ये बंद होईपर्यंत व्याजदराची रक्कम जोडली जात राहते. खातेदार आर्थिक वर्षातून एकदा कितीही रक्कम काढू शकतो.
  5. -  पीपीएफ खातेधारकाला त्याचे/तिचे खाते योगदानासह सक्रिय ठेवायचे असल्यास, तो किंवा ती आपल्या पीपीएफ खात्याला मॅच्युरिटीनंतरदेखील पाच-पाच वर्षांची मुदतवाढ देऊ शकतात.

अधिक वाचा : Unemployment Allowance | 'हे' सरकार बेरोजगार तरुणांना दर महिन्याला देते 7,500 रुपये, असा करा अर्ज

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी