नवी दिल्ली : सीएनजीच्या (CNG) दरात (rate) 2.50 रुपयांची वाढ झाली असून, या दरवाढीमुळे दिल्लीत लोकांना एक किलो सीएनजीसाठी 66.61 रुपये मोजावे लागणार आहेत. तर महाराष्ट्रातील सीएनजी वापऱ्यांना सीएनजी 68 रुपयांना मिळणार आहे. या वाढत्या इंधन दराचा परिणाम आता वाहनधारकांसह कॅब चालक कंपनींवर पडत आहे. ओला आणि उबर कॅब चालकांच्या कमाईवरही याचा परिणाम झाला असून त्यांची कमाई कमी झाली आहे. याचा परिणाम असा झाला आहे की काही कॅब चालकांनी त्यांच्या कारमध्ये एसी चालवण्यासाठी वेगळे पैसे आकारण्यास सुरुवात केली आहे.
तर काही कॅबधारकांनी कारवर बोर्ड लावून एसी चालवण्याचे शुल्क वेगळे आकारले जातील असं देखील लिहिले आहेत. कॅबवर बोर्ड लावलेल्या अनेक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. कॅब चालक मुख्तार अली म्हणतात की "कमाईचा खर्च भागत नाही, ओलाकडून भाडेही वाढवले जात नाही. आमची इच्छा आहे की ओलाने भाडेही वाढवले पाहिजे जेणेकरून आमचा खर्च भागेल. आजकाल उन्हाळ्यात जेवढा सीएनजी वापरला जातो, तो एसी चालवण्याने संपून जात आहे. त्यामुळे खर्च खूपच कमी होत आहे. " आम्ही रोजचे कमाई करणारे ड्रायव्हर आहोत. सीएनजी महागडी होत आहे, यामुळे बचत होत नाहीये. घरात इतर खर्चही असतात तेच काढू शकत आहोत''.
ओला कॅब ड्रायव्हर मोहम्मद फरमान म्हणतात की, "सीएनजीच्या किमती वाढल्याने आमची कमाई पूर्णपणे संपली आहे. भाडे वाढलेले नाहीत, ओलाच्या लोकांनीही भाडे वाढवलेले नाही, मग कमावणार कुठून. सीएनजीच्या दरात वाढ झाल्यामुळे काही वाहनचालकांची कमाई होत नसल्यामुळे एसी चालविण्याचे जादा शुल्क घेत आहेत. या मार्गाने पैसे कमावून ते आपले घरातील इतर खर्च काढण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे गरिबांच्या खिशातच फरक पडला आहे. पूर्वी जेव्हा सीएनजीचे दर स्थिर होते, तेव्हा घराचा खर्च भागवण्याइतकी बचत होत होती, आता ते सर्व संपले आहे.
कंपन्यांनी भाडे वाढवले, तर येणार्या ग्राहकांची संख्या कमी होईल, त्यामुळे कमी राइड उपलब्ध होईल, हे एक कारण आहे, ज्यामुळे भाडे वाढवले जात नाही. गेल्या 3 महिन्यांत सीएनजीच्या दरात 14 रुपयांनी वाढ झाली आहे. 1 जानेवारी रोजी सीएनजीची किंमत 52 रुपये प्रति किलोच्या जवळपास होती, ती आता 66.61 रुपये प्रति किलो झाली आहे.