Dollar-Rupee | डॉलरचा भाव १६ महिन्यांच्या उच्चांकीवर, पाहा तुमच्यावर होणारा परिणाम...

Dollar Rate | क्टोबर महिन्यात अमेरिकेतील महागाई दर (Inflation rate in America) मागील तीन दशकांतील सर्वाधिक होता. भारत मोठ्या प्रमाणात कच्चे तेल आणि वस्तूंची आयात करतो. भारत जगातील कच्च्या तेलाचा सर्वात मोठा आयातदार देश आहे. डॉलरच्या किंमतीत झालेल्या वाढीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ होणार आहे. कच्चे तेल महागल्यामुळे वाहतुकीचा खर्च वाढणार आहे आणि परिणामी किरकोळ बाजारात वस्तूंचे भाव वाढणार आहेत.

Dollar Rate & Inflation
डॉलरचे मूल्य आणि महागाई दर 
थोडं पण कामाचं
  • डॉलरचे (American Dollar) भारतीय रुपयाच्या तुलनेत (Indian Rupee) असलेले मूल्य वाढले
  • ऑक्टोबर महिन्यात अमेरिकेतील महागाई दर मागील तीन दशकांतील सर्वाधिक
  • आरबीआयकडून व्याजदर वाढीची शक्यता

Dollar Price | नवी दिल्ली: अमेरिकेच्या डॉलरचे (American Dollar) भारतीय रुपयाच्या तुलनेत (Indian Rupee) असलेले मूल्य जबरदस्त वाढले आहे. डॉलरची किंमत १६ महिन्यांच्या उच्चांकी पातळीवर पोचली आहे. रुपयाच्या तुलनेत डॉलरच्या किंमतीतवाढ होत डॉलरचे मूल्य ७४.४४ रुपये प्रति डॉलरवर पोचले आहे. याचा मोठा परिणाम देशातील अनेक वस्तूंच्या किंमतीवर होणार आहे. जपानमध्ये महागाईदर (Japan Inflation)हा चार दशकांच्या उच्चांकी पातळीवर पोचला आहे. त्यामुळे तिथेदेखील येन या चलनाचे डॉलरच्या तुलनेतील मूल्य मागील काही दशकातील नीचांकीवर आले आहे. ऑक्टोबर महिन्यात अमेरिकेतील महागाई दर (Inflation rate in America) मागील तीन दशकांतील सर्वाधिक होता. या सर्व परिस्थितीमुळे जाणकारांचे मत आहे की अमेरिकन फेडरल रिझर्व्ह (US Federal Reserve) व्याजदरात वेळेआधीच वाढ करू शकते. (Dollar rate : Price of Dollar is at 16 months high level, may cause inflation)

अमेरिकेतील वाढती महागाई

समोर आलेल्या माहितीनुसार गॅस आणि अन्नधान्याच्या महागाईमुळे अमेरिकेतील महागाई दर ३१ वर्षांमधील उच्चांकी पातळीवर पोचला आहे. २०२२मध्ये देखील महागाई दर वाढलेलाच राहण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. अमेरिकेत कामगारांचा तुटवडा भासत असल्याने वेतनात वाढ होते आहे. अमेरिकेत बेरोजगारी भत्ता क्लेम करणाऱ्यांची संख्या मागील २० महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आली आहे.

कच्च्या तेलामुळे महागाई वाढण्याची चिन्हे

डॉलरच्या किंमतीत झालेली वाढ आणि घसरण याचा जागतिक अर्थव्यवस्थेवर प्रत्यक्ष आणि मोठा परिणाम होत असतो. इंधन आणि अनेक वस्तूंचा व्यापार डॉलरमध्ये होत असतो. भारत मोठ्या प्रमाणात कच्चे तेल आणि वस्तूंची आयात करतो. भारत जगातील कच्च्या तेलाचा सर्वात मोठा आयातदार देश आहे. डॉलरच्या किंमतीत झालेल्या वाढीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ होणार आहे. कच्चे तेल महागल्यामुळे वाहतुकीचा खर्च वाढणार आहे आणि परिणामी किरकोळ बाजारात वस्तूंचे भाव वाढणार आहेत. त्यामुळे भारतात महागाई दर वाढण्याची शक्यता आहे. याशिवाय भारत सरकारची चालू खात्याची तूटदेखील वाढणार आहे.

रिझर्व्ह बॅंकेचा रेपो रेट वाढू शकतो

डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य ७४.४४ रुपये प्रति डॉलरच्या पातळीवर पोचले आहे. शेअर बाजारात आज परकी गुंतवणुकदारांनी मोठ्या प्रमाणात नफा वसूली करत शेअरची विक्री केली. त्यामुळे रुपयावरील दबाव आणखी वाढला आहे. जेव्हा डॉलर मजबूत होतो तेव्हा भारताचा रुपया कमजोर होतो. रुपया कमजोर झाल्याने देशातील महागाई वाढते. रिझर्व्ह बॅंकेने देशात ४ टक्के महागाई दर राखण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. याचाच अर्थ किमान २ टक्के आणि कमाल ६ टक्के महागाई दर ठेवण्याचा प्रयत्न असणार आहे. जर महागाई दर ६ टक्क्यांच्या वर केला तर आरबीआय पतधोरण समितीच्या बैठकीत व्याजदरात वाढ करू शकते. व्याजदर वाढल्यास बाजाराबरोबरच कर्जवितरणावर विपरित परिणाम होईल. 

शेअर बाजारात घसरणीची शक्यता

डॉलरची किंमत वाढल्याने परकी गुंतवणुकदारांना भारतीय शेअर बाजार तितका आकर्षक वाटत नाही. त्यामुळे ते इथून गुंतवणूक काढून घेतात. भारताच्या विकासात परकी गुंतवणुकीचाही मोठा वाटा असतो. अशा परिस्थितीत डॉलरची किंमत वाढल्याने भारतीय शेअर बाजारात घसरण पाहण्यास मिळू शकते. मागील दोन-तीन दिवस बाजारात घसरण झाली होती.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी