LPG Price Hike : स्वयंपाक करणे महागणार, व्यावसायिक 350.50 आणि घरगुती LPG सिलेंडर 50 रुपयांनी महागला

Domestic and Commercial LPG prices hiked, check revised rates : स्वयंपाक करणे आजपासून महाग झाले. बुधवार 1 मार्च 2023 पासून 19 किलो वजनाचा व्यावसायिक एलपीजी सिलेंडर 350 रुपयांनी तर सबसिडी नसलेला घरगुती 14.2 किलो वजनाचा एलपीजी सिलेंडर 50 रुपयांनी महागला

Domestic and Commercial LPG prices hiked, check revised rates
स्वयंपाक करणे महागणार  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • स्वयंपाक करणे महागणार
  • सबसिडी नसलेला घरगुती 14.2 किलो वजनाचा LPG सिलेंडर 50 रुपयांनी महागला
  • व्यावसायिक एलपीजी सिलेंडर 350.50 रुपयांनी महागला

Domestic and Commercial LPG prices hiked, check revised rates : स्वयंपाक करणे आजपासून महाग झाले. बुधवार 1 मार्च 2023 पासून 19 किलो वजनाचा व्यावसायिक एलपीजी सिलेंडर 350.50 रुपयांनी तर सबसिडी नसलेला घरगुती 14.2 किलो वजनाचा एलपीजी सिलेंडर 50 रुपयांनी महागला आहे. प्रत्येक राज्यात स्थानिक करांनुसार सिलेंडरच्या दरांमध्ये बदल झाले आहेत. या निर्णयामुळे स्वयंपाक करण्यासाठी घरी तसेच रेस्टॉरंटमध्ये होणाऱ्या खर्चात वाढ झाली आहे. घरी स्वयंपाक करून जेवणे आणि रेस्टॉरंटमध्ये जाऊन जेवणे हे दोन्ही महाग झाले आहे.

नियमानुसार सबसिडी घेणाऱ्या घरगुती ग्राहकांना दरवर्षी 14.2 किलो वजनाचे 12 सिलेंडर सबसिडाइज्ड रेटमध्ये अर्थात सवलतीच्या दरात मिळतील. अतिरिक्त सिलेंडरसाठी घरगुती वापराच्या सिलेंडरचे नवे दर लागू होणार आहेत.

  1. दिल्लीत 14.2 किलो वजनाचा घरगुती एसपीजी सिलेंडर 1053 रुपयांऐवजी 1103 रुपयांत मिळेल
  2. मुंबईत 14.2 किलो वजनाचा घरगुती एसपीजी सिलेंडर 1052.50 रुपयांऐवजी 1102.50 रुपयांत मिळेल
  3. कोलकातामध्ये 14.2 किलो वजनाचा घरगुती एसपीजी सिलेंडर 1079 रुपयांऐवजी 1129 रुपयांत मिळेल
  4. चेन्नईत 14.2 किलो वजनाचा घरगुती एसपीजी सिलेंडर 1068.50 रुपयांऐवजी 1118.50 रुपयांत मिळेल
  5. दिल्लीत 19 किलो वजनाचा व्यावसायिक एलपीजी सिलेंडर  1769 रुपयांऐवजी 2119.50 रुपयांत मिळेल
  6. कोलकातामध्ये 19 किलो वजनाचा व्यावसायिक एलपीजी सिलेंडर 1870 रुपयांऐवजी 2221.50 रुपयांत मिळेल
  7. मुंबईत 19 किलो वजनाचा व्यावसायिक एलपीजी सिलेंडर 1721 रुपयांऐवजी 2071.50 रुपयांत मिळेल
  8. चेन्नईत 19 किलो वजनाचा व्यावसायिक एलपीजी सिलेंडर 1917 रुपयांऐवजी 2268 रुपयांत मिळेल

Holi : गोडधोड खाऊन पोट बिघडले तर करा हे उपाय ।  या लोकांना पपई खाल्ल्याने होईल नुकसान

कच्ची पपई खा आणि अनेक आजारांपासून लांब राहा । जास्त चिकन खाल तर तब्येत बिघडवाल

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी