एक जुलैपासून लागू होणार ड्रायव्हिंगशी संबंधित नवा नियम, टेस्टविनाच मिळेल लायसन्स

नव्या नियमानुसार ड्रायव्हिंग लायसन्स ( Driving License)साठी टेस्ट द्यावी लागणार नाही. ड्रायव्हिंग टेस्ट (Driving Test) न देण्याची सूट नागरिकांना मिळणार आहे. नियमात झाला बदल.

New Driving License rule
टेस्टविनाच मिळणार ड्रायव्हिंग लायसन्स 

थोडं पण कामाचं

  • ड्रायव्हिंग टेस्टशिवायच मिळणार ड्रायव्हिंग लायसन्स
  • १ जुलैपासून लागू होणार नवा नियम
  • ड्रायव्हिंग ट्रेनिंग सेंटर्ससाठीचे मुद्दे

नवी दिल्ली : पुढील महिन्यापासून ड्रायव्हिंगशी संबंधित नियमामध्ये मोठा बदल होतो आहे. नव्या नियमानुसार ड्रायव्हिंग लायसन्स ( Driving License)साठी टेस्ट द्यावी लागणार नाही. ड्रायव्हिंग टेस्ट (Driving Test) न देण्याची सूट नागरिकांना मिळणार आहे. रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाने (MoRTH)मान्यता प्राप्त ड्रायव्हिंग ट्रेनिंग सेंटर्ससाठीच्या नियमांमध्ये (Rules for Driving training centers) बदल केले आहेत. नवे नियम १ जुलै २०२१ पासून लागू होणार आहे. ड्रायव्हिंग सेंटरवर नोंदणी करणाऱ्या उमेदवारांना योग्य प्रशिक्षण आणि माहिती मिळवण्यासाठी मदत मिळणार आहे. सद्य परिस्थितीत रिजनल ट्रान्सपोर्ट ऑफिसकडून (RTO)ड्रायव्हिंग टेस्ट घेतली जाते. ड्रायव्हरांनी मान्यता प्राप्त ड्रायव्हिंग प्रशिक्षण केंद्रामधून प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर ड्रायव्हिंग लायसन्स मिळण्यास मदत होणार आहे. (New Driving License rule to be implemented from 1st July 2021)

असा असेल नियम-

  1. १ जुलै, २०२१ पासून ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज करणाऱ्यांना मान्यता प्राप्त ड्रायव्हिंग ट्रेनिंग सेंटर्सकडून (Accredited Driver Training Centers)प्रशिक्षण घ्यावे लागणार आहे. ड्रायव्हरांना अशा मान्यता प्राप्त ड्रायव्हिंग ट्रेनिंग सेंटर्सकडून प्रशिक्षण घेतल्यास लायसन्स मिळणे सोपे होणार आहे.
  2. ड्रायव्हिंग ट्रेनिंग सेंटर्ससाठीचे मुद्दे -
  3. उमेदवारांना हाय क्वालिटी ट्रेनिंग देण्यासाठी प्रशिक्षण केंद्र सिम्युलेटर आणि खास ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅकने युक्त असेल.
  4. या सेंटर्सवर मोटर वाहन अधिनियम, १९८८ अंतर्गत आवश्यकतेनुसार रेमिडियल आणि रिफ्रेशर कोर्सचा फायदा घेता येतो
  5. या केंद्रांवर यशस्वीरित्या परीक्षा पास करणाऱ्या उमेदवारांना ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज करताना ड्रायव्हिंग टेस्टमधून सूट मिळेल. सध्या रिजनल ट्रान्सपोर्ट ऑफिसकडून ड्रायव्हिंगसाठीची टेस्ट घेतली जाते.
  6. मान्यताप्राप्त ड्रायव्हिंग ट्रेनिंग सेंटर्सकडून प्रशिक्षण घेतल्यानंतर ड्रायव्हिंग लायसन्स मिळणे सोपे होणार आहे.
  7. या केंद्रांना उद्योगांच्या गरजेनुसार विशिष्ट ट्रेनिंग देण्याचीदेखील परवानगी आहे.

नियमांच्या माहितीचा अभाव

कुशल ड्रायव्हरची कमतरता ही भारतीय रस्ते आणि महामार्गांच्या क्षेत्रातील एक प्रमुख समस्यापैंकी एक आहे. रस्ते आणि महामार्गांशी निगडीत नियमांच्या माहितीची कमतरता हे रस्त्यावरील अपघातांचे एक प्रमुख कारण असते. मोटरवाहन अधिनियम २०१९च्या कलम ८नुसार केंद्र सरकारला ड्रायव्हर ट्रेनिंग सेंटर्सच्या मान्यतेसंदर्भातील नियम बनवण्याचे अधिकार आहेत. 

रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाने मागील काही वर्षात नियमांमध्ये अनेक बदल करून चालक आणि वाहनांच्या सद्य परिस्थितीनुसार त्यात बदल केले आहेत. अनेक सुविधा आता ऑनलाईन स्वरुपात मंत्रालयाने उडपलब्ध करून दिल्या आहेत. फास्टॅगच्या रुपाने आता टोलनाक्यांवर ट्रॅफिक जॅम टाळले जाते आहे. कारण फास्टॅगमुळे आपोआपच टोल वाहनचालकांच्या खात्यातून कापून घेण्यात येतो आहे. याशिवाय रस्ते आणि महामार्गांवरील ट्रॅफिक कमी करण्यासाठी आणि अपघात कमी करण्यासाठी मंत्रालयाने नियमांमध्ये बदल केले आहेत. ड्रायव्हिंग लायसन्सच्या नियमांतील बदल हे त्यातीलच पुढील  पाऊल आहे. यामुळे नागरिकांना सहजरित्या ड्रायव्हिंग लायसन्स उपलब्ध होईल आणि वेळेचीही बचत होणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी