ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू करायचयं? RTO च्या चक्करा मारणं थांबवा, फॉलो करा या सोप्या प्रोसेस 

Driving License Rules: तुमच्या ड्रायव्हिंग लायसन्सची वैधता संपल्यानंतर तुम्हाला 30 दिवस मिळतात. या दरम्यान तुम्हाला नूतनीकरणासाठी अर्ज करावा लागेल.

Driving License Rules: No need to visit RTO for renewal of driving license, follow this easy process
ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू करायच? RTO च्या चक्करा मारणं थांबवा, फॉलो करा या सोप्या प्रोसेस ।   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • परिवहन मंत्रालयाने नियमात बदल करून ड्रायव्हिंग लायसन्स मिळण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी केली
  • ड्रायव्हिंग लायसन्स नुतनीकरणासाठी आऱटीओ ला जाण्याची गरज नाही
  • घरबसल्या ड्रायव्हिंग लायसन्सचे नूतनीकरण करा

Driving License Renew Rules: ड्रायव्हिंग लायसन्स बनवल्यानंतर त्याचे वेळोवेळी नूतनीकरण करावे लागते. एक वेळ अशी होती की ड्रायव्हिंग लायसन्सचे नूतनीकरण करण्यासाठी आरटीओ कार्यालयाच्या अनेक फेऱ्या माराव्या लागत होत्या. मात्र आता परिवहन मंत्रालयाने नियमात बदल करून ड्रायव्हिंग लायसन्स मिळण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी केली आहे. आता तुम्ही तुमच्या ड्रायव्हिंग लायसन्सचे ऑनलाइन नूतनीकरण घरी बसून करू शकता.

अधिक वाचा : 

IRCTC's new luggage rule: भारतीय रेल्वेने सामानावर घातली मर्यादा, पाहा मार्गदर्शक तत्त्वे आणि बुकिंग कसे करायचे...

आम्ही तुम्हाला सांगतो की, परिवहन मंत्रालयाच्या नवीन नियमांनुसार, तुम्ही आता RTO कार्यालयात न जाता https://parivahan.gov.in/parivahan या लिंकवर क्लिक करून ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज करू शकता. नियमांनुसार, तुमच्या ड्रायव्हिंग लायसन्सची वैधता संपल्यानंतर तुम्हाला 30 दिवस मिळतात. या दरम्यान तुम्हाला नूतनीकरणासाठी अर्ज करावा लागेल. चला तर मग आम्ही तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्सच्या नूतनीकरणासाठीची कागदपत्रे आणि त्याची प्रक्रिया सांगूया-

अधिक वाचा : 

Agnipath Scheme: डिसेंबरमध्ये लष्कराला मिळणार पहिला अग्निवीर; २४ जूनपासून हवाई दलात होणार भरती

ही कागदपत्रे लागतील-

कालबाह्य ड्रायव्हिंग लायसन्स
आधार कार्ड
पासपोर्ट आकाराचा फोटो

ड्रायव्हिंग लायसन्सच्या नूतनीकरणासाठी अशा प्रकारे अर्ज करा-

1. यासाठी प्रथम https://parivahan.gov.in/parivahan वरून फॉर्म डाउनलोड करा.
2. येथे तुम्हाला तुमच्या ड्रायव्हिंग लायसन्सचे ऑनलाइन नूतनीकरण करण्याचा पर्याय आहे, ड्रायव्हिंग लायसन्सवर सेवांवर क्लिक करा.
3. पुढे तुम्हाला एक अर्ज भरावा लागेल.
4. विनंती केलेली सर्व कागदपत्रे अपलोड करा.
5. यानंतर ड्रायव्हिंग लायसन्स तुमच्या पत्त्यावर पोहोचेल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी