Arvind Sonkar Success Story: गरीब कुटुंबातील मुलगा झाला DSP, कारणं देणाऱ्यांसाठी अरविंद ठरला उत्तम उदाहरण

काम-धंदा
Updated Apr 17, 2023 | 12:00 IST | टाइम्स नाऊ मराठी

Arvind Sonkar Success Story: प्राथमिक शिक्षणापासूनच अधिकारी होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या अरविंदची डीएसपी पदासाठी निवड झाली आहे. अरविंदने शहरातील रामस्वरूप भारती इंटर कॉलेजमध्ये शिक्षण घेतले आहे. यानंतर त्याने पीसीएसची तयारी सुरू केली आणि पहिल्याच प्रयत्नात तो यशस्वी ठरला.

UPPCS Arvind Sonkar Success Story
Arvind Sonkar Success Story: गरीब कुटुंबातील मुलगा झाला DSP,  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • गरीब कुटुंबातील मुलगा अधिकारी झाला
  • अरविंद सोनकरच्या संघर्षाची कहाणी तुम्हाला भावूक करेल.
  • पीसीएसची तयारी सुरू केली आणि पहिल्याच प्रयत्नात तो यशस्वी ठरला.

UPPCS Arvind Sonkar Success Story:  UP PCS चा निकाल उत्तर प्रदेश लोकसेवा आयोगाने जाहीर केला आहे. आग्राच्या एतमादपूर तहसीलमधील रहिवासी दिव्या सिकरवार या परीक्षेत बसली होती. दिव्या सिकरवार या परिक्षेत अव्वल आली आहे. दुसऱ्या क्रमांकावर लखनऊची प्रतीक्षा पांडे आणि तिसऱ्या स्थानावर बुलंदशहरची नम्रता सिंग आहे. मढ येथील रहिवासी अरविंद सोनकर याने या परीक्षेत 86 वा क्रमांक पटकावला आहे. अरविंद सोनकरच्या संघर्षाची कहाणी तुम्हाला भावूक करेल. अरविंदने स्वत:सोबतच पालकांचे स्वप्न पूर्ण केले आहे.(DSP Arvind Sonkar Success Story in marathi)

अधिक वाचा: SBI Recruitment 2023: SBI मध्ये 1031 पदांची बंपर भरती, असा करा ऑनलाईन अर्ज

पहिल्याच प्रयत्नात यश


अरविंद मऊ जनपद जिल्ह्यातील परहदान ब्लॉकमधील नासोपूर गावचा रहिवासी आहे. प्राथमिक शिक्षणापासूनच अधिकारी होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या अरविंदची डीएसपी पदासाठी निवड झाली आहे. अरविंदने शहरातील रामस्वरूप भारती इंटर कॉलेजमध्ये शिक्षण घेतले आहे. त्याने अलाहाबाद विद्यापीठातून 2019 मध्ये बीए आणि 2021 मध्ये एमए केले आहे. यानंतर त्याने पीसीएसची तयारी सुरू केली आणि पहिल्याच प्रयत्नात तो यशस्वी ठरला.

अधिक वाचा: UPI Lite: आता तुम्ही इंटरनेटशिवाय ही करू शकता  UPI पेमेंट, जाणून घ्या काय आहे पद्धत?

गरीब कुटुंबातील मुलगा अधिकारी झाला

अत्यंत गरीब कुटुंबातून आलेला अरविंद सोनकर सात भावंडांमध्ये सर्वात लहान आहेत. अरविंदला 5 बहिणी आणि 2 भाऊ आहेत. अरविंदचे वडील गोरख सोनकर हे नगरमधील भिटी चौकात हातगाडीवर फळे विकतात. फळे विकून जे पैसे मिळतात त्याच पैशाने त्यांचे घर चालते. नुकतेच अरविंदच्या आईचे कर्करोगाने निधन झाले, त्यामुळे त्याच्या वडिलांनाही अर्धांगवायूचा झटका आली पण अरविंद डगमगला नाही. त्याने आपले प्रयत्न सुरू ठेवले आणि आज तो अधिकारी झाला. साधन नसल्यामुळे रडणाऱ्या, कारणं देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अरविंद हे एक उत्तम उदाहरण आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी