अनिल अंबानींच्या कंपनीचा 19 डिसेंबरला लिलाव

E-Auction For Anil Ambani Company Reliance Capital : रिलायन्स अनिल धीरुभाई अंबानी समुहाची कर्जात बुडलेली कंपनी 'रिलायन्स कॅपिटल'चा सोमवार 19 डिसेंबर 2022 रोजी ऑनलाइन लिलाव होणार आहे.

E-Auction For Anil Ambani Company Reliance Capital
अनिल अंबानींच्या कंपनीचा 19 डिसेंबरला लिलाव  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • अनिल अंबानींच्या कंपनीचा 19 डिसेंबरला लिलाव
  • कंपनीचा ई ऑक्शन अर्थात ऑनलाइन लिलाव होणार
  • ई ऑक्शनसाठी कंपनीची बेस प्राइज 5300 कोटी रुपये

E-Auction For Anil Ambani Company Reliance Capital : एकेकाळी स्टाइल स्टेटमेंट आणि फिटनेस फ्रिक म्हणून चर्चेत राहणारे व्यावसायिक अनिल अंबानी सध्या आर्थिकदृष्ट्या अनफिट असल्याचे चित्र आहे. रिलायन्स अनिल धीरुभाई अंबानी समुहाची (Reliance Anil Dhirubhai Ambani Group or Reliance ADA Group) कर्जात बुडलेली कंपनी 'रिलायन्स कॅपिटल'चा सोमवार 19 डिसेंबर 2022 रोजी ऑनलाइन लिलाव (Reliance Capital E-Auction) होणार आहे.

रिलायन्स कॅपिटल लिमिटेड (Reliance Capital Limited - RCL) कंपनीने दिवाळखोरी जाहीर केली आहे. यामुळेच कंपनीचा ई ऑक्शन अर्थात ऑनलाइन लिलाव होणार आहे. ई ऑक्शनसाठी कंपनीची बेस प्राइज 5300 कोटी रुपये ठरविण्यात आली आहे. कॉस्मिया और पिरामल यांनी संयुक्तपणे रिलायन्स कॅपिटल लिमिटेड या कंपनीसाठी 5300 कोटी रुपयांची बोली लावली आहे. या बोलीआधारे ई ऑक्शन सुरू होणार आहे. ई ऑक्शनमध्ये सहभागी होणाऱ्यांना बेस प्राइजपेक्षा जास्त बोली लावावी लागणार आहे.

भारतात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या कंपनीसाठी ई ऑक्शन होत आहे. भारतात दिवाळखोरीचा कायदा करण्यात आल्यानंतर एनबीएफसी (Non-Banking Financial Company) अंतर्गत लिलाव होत असलेली रिलायन्स कॅपिटल ही तिसरी कंपनी आहे. याआधी श्रेई ग्रुप आणि डीएचएफएलचा लिलाव झाला आहे.

रिलायन्स कॅपिटल या कंपनीत एलआयसी आणि ईपीएफओ यांची मिळून 35 टक्क्यांची गुंतवणूक आहे. या सरकारी कंपन्यांनी त्यांचे पैसे सुरक्षित राखण्यासाठी ई ऑक्शनची मागणी केली होती. ही मागणी मान्य झाली असून सोमवार 19 डिसेंबर 2022 रोजी 'रिलायन्स कॅपिटल'चा ई ऑक्शन होणार आहे. 

याआधी कर्जात बुडल्यामुळे एनबीएफसी अंतर्गत समावेश करून  रिझर्व्ह बँकेने रिलायन्स कॅपिटल या कंपनीचे संचालक मंडळ बरखास्त केले. यानंतर रिलायन्स कॅपिटल या कंपनीवर रिझर्व्ह बँकेने नागेश्वर राव वाय यांना प्रशासक म्हणून नियुक्त केले. 

तुमच्या खिशातील 500 रुपयांची नोट नकली तर नाहीये ना? अशी तपासा नोट खरी की खोटी

जगातील सर्वाधिक श्रीमंत 10 जणांमध्ये 2 भारतीय उद्योगपती

ई ऑक्शनची प्रक्रिया

रिलायन्स कॅपिटल या कंपनीचे ई ऑक्शन सोमवार 19 डिसेंबर 2022 ते गुरुवार 22 डिसेंबर 2022 या कालावधीत होईल. ई ऑक्शनमध्ये सहभागी होणाऱ्यांना 5300 कोटींच्या बेस प्राइजपेक्षा मोठी बोली लावावी लागेल. सर्वाधिक मोठी बोली लावणारी कंपनी व्यवहार पूर्ण करून रिलायन्स कॅपिटल या कंपनीचा ताबा घेईल. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी