Online Festive Sale: ई-कॉमर्समधील सेलमध्ये दर तासाला ६८ कोटींच्या स्मार्टफोनची विक्री, Flipkart ने अॅमेझॉनला टाकले मागे

ईएमआयचा पर्याय, नव्या उत्पादनांची लॉंचिंग, डिस्काउंट ऑफर्स आणि इतर आकर्षक सवलतींमुळे या सणासुदीच्या हंगामात ई-कॉमर्स कंपन्या दर तासाला ६८ कोटी रुपयांच्या किंमतीचे स्मार्टफोन विकत आहेत. या सिझनमध्ये अॅमेझॉनच्या (Amazon)तुलनेत फ्लिपकार्टने (Flipkart)सर्वाधिक ग्राहक आकर्षित केले आहेत.

Flipkart & Amazon sale
फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉनचे सेल 
थोडं पण कामाचं
  • ई-कॉमर्स कंपन्यांचे मेगासेल (e-commerce sale)सुरू
  • पहिल्याच आठवड्यात ई-कॉमर्स कंपन्यांनी ४.६ अब्ज डॉलर म्हणजे ३२,००० कोटी रुपयांची विक्री
  • या सिझनमध्ये अॅमेझॉनच्या (Amazon)तुलनेत फ्लिपकार्टने (Flipkart)सर्वाधिक ग्राहक आकर्षित केले

नवी दिल्ली: सध्या सणासुदीच्या हंगामात ई-कॉमर्स कंपन्यांचे मेगासेल (e-commerce sale)सुरू आहेत. या हंगामात पहिल्याच आठवड्यात ई-कॉमर्स कंपन्यांनी ४.६ अब्ज डॉलर म्हणजे ३२,००० कोटी रुपयांच्या मूल्याच्या वस्तूंची विक्री केली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा यात ३२ टक्क्यांची जबरदस्त वाढ झाली आहे. तर सरासरी ग्राहकांच्या संख्येतदेखील २० टक्क्यांची वाढ झाली आहे. ईएमआयचा पर्याय, नव्या उत्पादनांची लॉंचिंग, डिस्काउंट ऑफर्स आणि इतर आकर्षक सवलतींमुळे या सणासुदीच्या हंगामात ई-कॉमर्स कंपन्या दर तासाला ६८ कोटी रुपयांच्या किंमतीचे स्मार्टफोन विकत आहेत. या सिझनमध्ये अॅमेझॉनच्या (Amazon)तुलनेत फ्लिपकार्टने (Flipkart)सर्वाधिक ग्राहक आकर्षित केले आहेत. या सिझनमधील सेलमध्ये फ्लिपकार्टचा बाजारातील हिस्सा ६४ टक्के इतका होता. पहिल्या आठवड्यात ई-कॉमर्स कंपन्यांनी ३२,००० कोटी रुपयांची विक्री केली आहे. (Online Festive Sale: This festive season e-commerce platforms sold smartphones worth Rs 68 crore, Flipkart overtakes Amazon)

सेलमध्ये छोट्या शहरांचा धमाका

टियर-२ आणि टियर-३ शहरांमधून मोठ्या संख्येने ग्राहक ई-कॉमर्स कंपन्यांशी जोडले गेले आहेत. एकूण ग्राहकांपैकी ६१ टक्के ग्राहक छोट्या शहरांमधील आहेत. २०२० मध्ये प्रति ग्राहक खरेदी ४,९८० रुपये होती ती २०२१ मध्ये वाढून ५,०३४ रुपये झाली आहे.

फ्लिपकार्ट बिग दिवाली सेल

सणासुदीच्या हंगामाच्या पार्श्वभूमीवर ई-कॉमर्स कंपन्या मोठ्या तयारीनिशी बाजारात उतरल्या आहेत. फ्लिपकार्ट (Flipkart) आणि अॅमेझॉनसारख्या (Amazon)ई-कॉमर्स कंपन्या मोठे सेल ग्राहकांसाठी बाजारात आणत आहेत. फ्लिपकार्ट आता १७ ऑक्टोबरपासून बिग दिवाली सेल (Flipkart Big Diwali sale) सुरू करणार आहे. हा सेल २३ ऑक्टोबरपर्यत असणार आहे. फ्लिपकार्टचा बिग बिलियन डेज हा सेल काही दिवसांपूर्वीच संपला आहे. अॅमेझॉनचा 'ग्रेट इंडियन फेस्टिवल' महिनाभर सुरू राहणार आहे. 

अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टचा सेल

फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉनचा आधीचा सेल एकाच दिवशी सुरू झाला होता. फ्लिपकार्टचा 'द बिग बिलियन डेज' हा सेल ३ ऑक्टोबर २०२१ला सुरू होता तर अॅमेझॉनने मात्र म्हटले आहे की त्यांचा 'ग्रेट इंडियन फेस्टिवल' हा सेल ३ ऑक्टोबरपासून सुरू होऊन दिवाळीपर्यत संपूर्ण महिनाभर सुरू राहणार आहे. अॅमेझॉनने म्हटले आहे की 'ग्रेट इंडियन फेस्टिवल'मध्ये १,००० पेक्षा जास्त नव्या उत्पादनांना लॉंच केले जाणार आहे. त्याशिवाय विविध श्रेणीतील ग्रॉसरी, फॅशन आणि ब्युटी, स्मार्टफोन, अप्लायन्सेस, टीव्ही आणि इलेक्ट्रॉनिक्स उत्पादने या सेलमध्ये विक्रीसाठी असणार आहे.

छोट्या शहरात विस्तार

ई-कॉमर्सला आता छोट्या शहरांमधून मोठी मागणी आहे. अॅमेझॉनने दिलेल्या माहितीनुसार यंदा अॅमेझॉनच्या एकाच दिवसातील विक्रीमध्ये ६० टक्के वाढ झाली आहे. 'ग्रेट इंडियन फेस्टिवल'ची सुरूवात दणक्यात झाली आहे. यामध्ये लाखो ग्राहक अॅमेझॉनवरील छोट्या विक्रेत्यांकडून वस्तू विकत घेत आहेत. यंदा स्थानिक दुकानदारांची संख्या दुप्पटपेक्षा अधिक झाली आहे. अॅमेझॉन प्राइम सबस्क्रिप्शनला संपूर्ण भारतातून मागणी आहे. छोट्या शहरांमधील मागणी वाढली असून तीनपैकी दोन नवे प्राइम ग्राहक टिअर-२ आणि  टिअर-३ शहरांमधील आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी