PM Kisan Yojana: लगेचच करा हे काम नाहीतर अडकतील पैसे; ३१ तारखेला संपतेय मुदत

काम-धंदा
Updated May 28, 2022 | 15:01 IST | टाइम्स नाऊ मराठी

PM Kisan Samman Nidhi Yojana 11th Installment । प्रधानमंत्री किसान सम्मान योजनेचा ११ वा हफ्ता लवकरच जमा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे देशभरातील शेतकरी २,००० रूपयांची रक्कम त्यांच्या बॅंक खात्यापर्यंत पोहचण्याच्या प्रतिक्षेत आहेत.

E-KYC is required to get 11th Installment of Pradhan Mantri Kisan Samman Yojana
PM किसान योजनेचा हप्ता मिळवण्यासाठी करा हे काम नाहीतर...  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • प्रधानमंत्री किसान सम्मान योजनेचा ११ वा हफ्ता लवकरच जमा होण्याची शक्यता आहे.
  • ई-केवायसी केली नाही तर या योजनेचा हफ्ता अडकला जाईल.
  • e-KYC दोन प्रकारे करता येते.

PM Kisan Samman Nidhi Yojana 11th Installment । नवी दिल्ली : प्रधानमंत्री किसान सम्मान योजनेचा ११ वा हफ्ता लवकरच जमा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे देशभरातील शेतकरी २,००० रूपयांची रक्कम त्यांच्या बॅंक खात्यापर्यंत पोहचण्याच्या प्रतिक्षेत आहेत. मात्र या उत्सुकतेमध्ये एक चूक महागात पडू शकते. ती एक चूक म्हणजे शेतकऱ्यांनी ई-केवायसी (eKYC) न करणे. कारण यावेळी ई-केवायसी केली नाही तर या योजनेचा हफ्ता अडकला जाईल. (E-KYC is required to get 11th Installment of Pradhan Mantri Kisan Samman Yojana). 

अधिक वाचा : हॉलिवूड चित्रपट पाहून एका महिन्यात ४० वाहनांची केली चोरी

३१ मे आहे शेवटची तारीख 

पीएम किसान पोर्टवर दिलेल्या माहितीनुसार, नोंदणी केलेल्या सर्व शेतकऱ्यांनी ई-केवायसी करणे गरजेचे आहे. जर केवायसी केली नाही तर हफ्त्याची रक्कम म्हणजे २,००० रूपये अडकले जाऊ शकतात. अशा परिस्थितीत त्वरित eKYC करणे आवश्यक आहे. आणि ते पूर्ण करण्याची अंतिम तारीख ३१ मे २०२२ आहे.

अधिक वाचा : 'स्वातंत्र्यवीर सावरकर' चित्रपटाचे पहिले पोस्टर रिलीज

कशी करायची e-KYC

e-KYC दोन प्रकारे करता येते. पहिल्या पद्धतीनुसार लाभार्थ्याला PM किसान पोर्टलवर OTP द्वारे eKYC करावे लागेल. दुसऱ्या पद्धतीनुसार शेतकऱ्याला जवळच्या कोणत्याही कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये जाऊन बायोमेट्रिक पद्धतीने eKYC करून घ्यावी लागेल.

पीएम किसान पोर्टलद्वारे ई-केवायसी करण्यासाठी, पोर्टलच्या उजव्या बाजूला असलेल्या 'शेतकऱ्यांसाठीच्या' सेक्शनमध्ये जावे लागेल. जिथे eKYC चा कॉलम दिसेल. त्यावर क्लिक केल्यानंतर, OTP द्वारे eKYC करता येईल.

लाभार्थी यादी कशी तपासायची?

पीएम किसान लाभार्थी यादी पाहण्यासाठी पीएम किसान या वेबसाइटला (www.pmkisan.gov.in) भेट द्यावी लागेल. तिथे शेतकरी लिहलेल्या सेक्शनवर जा. या कॉलममध्ये असलेल्या 'लाभार्थी यादी' बटणावर क्लिक करा. त्यानंतर गावांची यादी, जिल्हा, तालुका, ब्लॉक आणि इतर तपशील टाका. शेवटी 'Get Report' बटणावर क्लिक करा. यानंतर शेतकऱ्याचा तपशील येईल.

चुकीची माहिती दिल्यास रक्कम होणार वसूल

योजनेंतर्गत नोंदणी करताना हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे की पात्र असलेल्या अटी पूर्ण करणाऱ्यांनीच त्यासाठी अर्ज करावा. जर एखादी व्यक्ती पात्रता अटी पूर्ण करत नसेल. तसेच चुकीची माहिती देऊन पैसे मिळवत असेल तर त्यामुळे त्याला जी काही रक्कम मिळाली आहे, ती सर्व वसूल केली जाईल. याशिवाय त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचीही तरतूद आहे.

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी