तुळशीच्या रोपट्याद्वारे घरबसल्या करा लाखोंची कमाई, बिझनेस सुरू कसा करायचा जाणून घ्या

काम-धंदा
Updated Apr 17, 2021 | 18:41 IST | टाइम्स नाऊ मराठी

औषधी गुणांमुळे तुळशीला बाजारात मोठी मागणी आहे. कोरोना काळात तुळशीच्या (Small Business Idea)व्यवसायाने चांगली कमाई केली जाऊ शकते. शिवाय यासाठी भांडवलही कमी लागते.

Earn good money from the Tulsi business
तुळशीच्या व्यवसायातून करा लाखोंची कमाई 

थोडं पण कामाचं

  • घरबसल्या करा लाखोंचे उत्पन्न
  • कमी भांडवलात व्यवसायाची सुरूवात
  • मोठ्या कंपन्यांही करत आहेत तुळशीची शेती

नवी दिल्ली : तुळशीमध्ये असलेल्या अॅंटीबॅक्टेरियल आणि इतर औषधी गुणांमुळे तुळशीला बाजारात मोठी मागणी आहे. कोरोना काळात तुळशीच्या (Small Business Idea)व्यवसायाने चांगली कमाई केली जाऊ शकते. शिवाय यासाठी भांडवलही कमी लागते.

आयुर्वेदिक औषध


भारतीय घरांमध्ये तुळशीच्या रोपाची पूजा केली जाते. तर आयुर्वेदात तुळशीला एक उत्तम औषध समजले जाते. कोरोना काळात आयुर्वेदिक वस्तूंची मागणी वाढते आहे. त्यामुळे तुळशीचा व्यवसाय खूपच फायदेशीर होऊ शकतो. तुम्ही तुळशीचे तेल आणि पाने विकून लाखोंची कमाई करू शकता. शिवाय तुळशीच्या व्यवसायासाठी खर्चही फारच कमी येतो. तुम्ही घरबसल्या हा व्यवसाय सुरू करू शकता.

फायदेशीर व्यवसाय


तुळशीचे रोप हे घरगुती उपायांबरोबरच आयुर्वेद, युनानी, होमियोपॅथी आणि अॅलोपथीमधील अनेक औषधांमध्ये वापरले जाते. तुळशीची मूळं, पाने, खोड सर्वकाही बहुगुणी असते. कोरोना महामारीमध्ये तुळसीचा वापर रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी करण्यात येतो आहे. त्यामुळे तुळशीच्या व्यवसायातून तुम्ही जबरदस्त कमाई करू शकता. हा व्यवसाय कसा सुरू करायचा हे विस्ताराने समजून घेऊया.

५ हजारांनी सुरू करा व्यवसाय


जर तुम्ही छोट्या स्तरावर हा व्यवसाय सुरू करू इच्छिता तर तुम्ही तुळशीच्या रोपांची नर्सरी सुरू करू शकता. याशिवाय तुम्ही घराच्या गच्चीत किंवा अंगणात तुळशीचे रोप लावून याची लागवड करू शकता. हे सर्व तुम्ही फक्त ५,००० रुपयांमध्ये करू शकता. जर तुम्ही थोडे अधिक पैसे गुंतवू शकत असाल तर १५,००० रुपये खर्चून तुम्ही याची शेतीदेखील करू शकता. त्यासाठी लागणारी जमीन तुम्ही भाड्याने किंवा कंत्राटी पद्धतीने मिळवू शकता. यासाठी जास्त जागेची आवश्यकता नसते. शिवाय इतर खर्चही नसतो. बी लावल्यानंतर तीन महिन्यांनी तुळशीची रोपे ३ लाख रुपयांपर्यत विकले जाऊ शकतात. डाबर, वैद्यनाथ, पतंजलि सारख्या अनेक आयुर्वेदिक कंपन्या तुळशीची कंत्राटी शेती करत आहेत.

रोपे केव्हा लावावीत


तुळशीचे रोप लावण्याची योग्य वेळ जुलै महिना ही असते. तुळशीची लागवड करताना ४५ X ४५ सेंटीमीटरच्या अंतरावर करावी. जर तुम्ही RRLOC 12 आणि  RRLOC 14 प्रकारच्या तुळशीचे रोप लावत असाल तर त्यांची लागवड ५० X ५० सेंटीमीटरच्या अंतरावर करावी. यामुळे त्यांची वाढ चांगली होते. रोपे लावल्यानंतर त्यांना थोडे पाणी देणे आवश्यक आहे. आठवड्यातून किमान एक वेळ तरी पाणी दिले पाहिजे. रोपांच्या कापणीआधी १० दिवस पाणी देणे बंद करावे.

तेल विकून कमवा नफा


तुळशीचे तेल रोगप्रतिकार क्षमता वाढते शिवाय विषाणूंशी निगडित रोगांशी लढण्यासदेखील मदत करते. याशिवाय हे इंफेक्शनपासून देखील वाचवते. त्यामुळे तुळशीच्या रोपांमधून तेल काढूनदेखील विकू शकता. यासाठी योग्यवेळी कापणी करणे गरजेचे आहे. जेव्हा रोपांवर फुले येण्यास सुरूवात होते त्याचवेळेस कापणी केली पाहिजे. यामुळे रोपांना नवीन फांद्या येतील आणि जास्त तेल काढता येईल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी