Earn money for sleeping | फक्त झोपण्यासाठी आणि नेटफ्लिक्स पाहण्यासाठी मिळतील २५ लाख, ही कंपनी देते आहे भन्नाट नोकरी

Earn money for sleeping | सध्या कंपनी यासाठी उमेदवारांची छाननी करते आहे. निवड झालेल्या उमेदवारांना फक्त झोपण्यासाठी आणि नेटफ्लिक पाहण्यासाठी पैसे मिळतील. ही मेट्रेस टेस्टरची पदे आहेत.

Earn money for sleeping
झोपण्यासाठी आणि नेटफ्लिक्स पाहण्यासाठी पैसे 
थोडं पण कामाचं
  • फक्त झोपण्याचे आणि नेटफ्लिक्स पाहण्याचे २५ लाख रुपये कमावण्याची संधी
  • लक्झरी बेड बनवणाऱ्या कंपनीतील जॉब
  • जी व्यक्ती या पदांसाठी निवडली जाईल त्याला एका आठवड्यात ३७.५ तास मेट्रेसवर घालवावे लागतील

Earn money for sleeping | नवी दिल्ली: पैसे कमावण्यासाठी (Earn money)प्रत्येकालाच भरपूर मेहनत करावी लागते. सर्वसामान्यांची दिवसरात्र उपजीविकेसाठीचे धावपळ सुरू असते. मात्र एवढे करूनही बहुतेकांना चांगली कमाई करता येत नाही. अशावेळी जर झोपण्यासाठीच (Earn money for sleeping) तुम्हाला पैसे मिळाले तर. तेही थोडेथोडके नव्हे तर २५ लाख रुपये. हे ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्काच बसेल, मात्र हे खरे आहे. लंडन येथील एक कंपनी लोकांना फक्त झोपण्याचे आणि नेटफ्लिक्स (Earn money for sleeping & watching Netflix) पाहण्याचे २५ लाख रुपये कमावण्याची संधी देते आहे. या कंपनीचे नाव आहे क्राफ्टेड बेड्स. (Earn money for sleeping : Get paid for sleeping & for watching Netflix)

नोकरीचे स्वरुप काय आहे

इंग्लंडमधील लक्झरी बेड बनवणारी कंपनी जिचे नाव क्राफ्टेड बेड्स असे आहे, या कंपनीने नेटफ्लिक्स पाहणे आणि झोपणे या गोष्टींना खूप महत्त्व दिले आहे. ही कंपनी इंग्लंडमध्ये राहणाऱ्या लोकांना झोपण्यासाठी आणि नेटफ्लिक्स पाहण्यासाठी २४,००० पौंड म्हणजेच २४,८२,३२२.४० रुपये म्हणजेच जवळपास २५ लाख रुपये कमावण्याची संधी देते आहे. सध्या कंपनी यासाठी उमेदवारांची छाननी करते आहे. निवड झालेल्या उमेदवारांना फक्त झोपण्यासाठी आणि नेटफ्लिक पाहण्यासाठी पैसे मिळतील. क्राफ्टेड बेड या कंपनीने म्हटले आहे की ही मेट्रेस टेस्टरची पदे आहेत. आपल्या ग्राहकांना सर्वोत्तम मेट्रेस उपलब्ध करून देण्यासाठी कंपनीने ही शक्कल लढवली आहे.

कामाचे स्वरुप

कंपनीने म्हटले आहे की जे कर्मचारी मेट्रेस टेस्टर म्हणून काम करतील त्यांना दर आठवड्याला नवे चांगल्या दर्जाचे मेट्रेसची टेस्टिंग करावी लागेल. याशिवाय काही इतर जबाबदाऱ्या देखील देण्यात येतील. या पदांसाठी कंपनीच्या इतर काही अटी आणि नियमदेखील असणार आहेत. जी व्यक्ती या पदांसाठी निवडली जाईल त्याला एका आठवड्यात ३७.५ तास मेट्रेसवर घालवावे लागतील. त्यानंतर त्या व्यक्तीला कंपनीला ही माहिती द्यावी लागेल की कंपनीचे मेट्रेस किती आरामदायी आहेत. कंपनी त्या व्यक्तीच्या घरी दर आठवड्याला एक नवीन मेट्रेस पाठवणार आहे. त्या व्यक्तीला मेट्रेसचे मूल्यांकन करावे लागणार आहे की त्या मेट्रेसवर किती आरामदायी वाटते. एका आठवड्यात ३७.५ तास या मेट्रेसवर झोपायचे आहे किंवा लोळून नेटफ्लिक्स पाहायचे आहे. 

कोणाला अर्ज करता येईल?

या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी त्या व्यक्तीचे वय १८ वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त असले पाहिजे. याचबरोबर ती व्यक्ती इंग्लंडमध्ये राहणारी हवी. त्या व्यक्तीला कोणत्याही अडथळ्याशिवाय एकट्यानेच मेट्रेसची चाचणी करायची आहे. याशिवाय रिव्ह्यू फॉर्म भरण्यासाठी त्या व्यक्तीचे लिखाण कौशल्य चांगले असले पाहिजे. कंपनीच्या या प्रकारच्या कामाच्या संधीमुळे सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. फक्त झोपण्यासाठी पैसे मिळण्याची कल्पना अनेकांना आकर्षक वाटते आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी