Earn money from home: फक्त ५० हजारात सुरू करा Business, ५ लाखांपर्यत कमाई, सरकारची ४० टक्के सब्सिडी

मशरुम व्यवसाय (Mushroom business) हा खूपच नफा कमावून देणारा व्यवसाय आहे. मशरुमचा वापर आहारात, औषधांमध्ये केला जातो. याला देशात नव्हे तर आंतरराष्ट्रीय बाजारातदेखील मोठी मागणी आहे.

Mushroom business
मशरुमचा व्यवसाय 

थोडं पण कामाचं

  • कमी पैशात आणि तेही घरच्या घरी व्यवसाय सुरू करायचा असेल तर मशरुमचा व्यवसाय उत्तम पर्याय
  • मशरुमला दिवसेंदिवस वाढती मागणी, या व्यवसायात मोठी संधी
  • फक्त ५०,००० रुपयांनी सुरू करा आणि लाखो कमवा, सरकारची सब्सिडीदेखील

नवी दिल्ली: Earn money from home: स्वत:चा व्यवसाय (Business) सुरू करण्याची अनेकांची इच्छा असते. मात्र भांडवलाची कमतरता, विविध योजनांच्या माहितीचा अभाव यामुळे अनेकजण संधीपासून वंचित राहतात. जर तुम्हाला कमी पैशात आणि तेही घरच्या घरी व्यवसाय सुरू करायचा असेल तर मशरुमचा व्यवसाय (Mushroom cultivation)तुम्हाला लाखोंची कमाई करून देऊ शकतो. अलीकडच्या काळात सर्वत्र मशरुमला मोठी मागणी आहे. यासाठी तुम्हाला मोठे शेत किंवा खूप मोठ्या जागेची आवश्यकता असणार नाही. तुमच्या घरातदेखील तुम्ही हे काम (Earn money from home)करू शकता आणि त्यातून चांगली कमाई करू शकता. (Earn money from home: Start business of Mushroom cultivation in just Rs 50,000)

मशरुम व्यवसाय (Mushroom business) हा खूपच नफा कमावून देणारा व्यवसाय आहे. मशरुमचा वापर आहारात, औषधांमध्ये केला जातो. याला देशात नव्हे तर आंतरराष्ट्रीय बाजारातदेखील मोठी मागणी आहे. तुम्ही हा व्यवसाय फक्त ५०,००० रुपयांच्या भांडवलानिशी सुरू करू शकता. पाहूया कसा करायचा मशरुमचा व्यवसाय.

मशरुमची शेती कशी करायची

जर तुम्ही या व्यवसायातून कमाई करू इच्छिता तर तुम्हाला मशरुम शेतीच्या तांत्रिक बाबींवर लक्ष द्यावे लागेल. प्रति चौ. मीटर मध्ये १० किलो मशरुमचे उत्पादन सहजपणे घेतले जाऊ शकते. किमान ४० x३० फूट जागेत तीन तीन फूट रुंद रॅक बनवून त्यावर तुम्ही मशरुमचे उत्पादन घेऊ शकता. शिवाय या व्यवसाय तुम्ही सरकारच्या सब्सिडीची मदत घेऊन सुरू करू शकता.

कम्पोस्ट बनवण्याची प्रक्रिया

कम्पोस्ट बनवण्यासाठी धान्याच्या भुशाला भिजवायचे असते यानंतर एक दिवसानंतर यामध्ये डीएपी, युरिया, पोटॅश, गहू, जिप्सम आणि कार्बोफ्युडोरन मिसळून सडण्यासाठी काही दिवस ठेवले जाते. जवळपास दीड महिन्यानंतर कम्पोस्ट तयार होते. आता शेण आणि माती एकत्र करून जवळपास दीड इंट जाडीचा थर पसरून त्यावर कम्पोस्टच्या दोन - तीन इंच जाडीचा थर पसरला जातो. या थरात आद्रता राहावी यासाठी स्प्रेद्वारे मशरुमवर दिवसातून दोन ते तीन वेळा शिडकावा करायचा असतो. याच्यावर एक- दोन इंच कम्पोस्टचा थर आणखी चढवला जातो. या पद्धतीने मशरुमचे पीक घेता येते.

मशरुमच्या शेतीची ट्रेनिंग घेऊन करा सुरूवात

सर्व कृषी विद्यापीठांमध्ये आणि शेतकी संशोधन केंद्रात मशरुम उत्पादनाचे प्रशिक्षण दिले जाते. त्याचबरोबर अनेक केंद्र आहेत जी मशरुमचे उत्पादन कसे घ्यायचे याचे प्रशिक्षण देतात. जर तुम्हाला मोठ्या प्रमाणात हा व्यवसाय करायचा असेल तर योग्य प्रशिक्षणाने सुरूवात करणे योग्य ठरेल. 

फक्त ५० हजारांनी सुरूवात

मशरुमच्या व्यवसायासाठी लागणारे भांडवल अनेक गोष्टींवर अवलंबून असते. तुम्ही हा व्यवसाय ५०,००० हजार रुपयांपासून सुरू करू शकता. सरकारकडून या व्यवसायासाठी ४० टक्के सब्सिडी मिळते. सरकारने मशरुमच्या व्यवसायासाठी कर्जाची सुविधादेखील उपलब्ध करून दिली आहे. या व्यवसायात चांगली कमाई आहे. मशरुमचा व्यवसाय जगभर १२.९ टक्क्यांनी विस्तारतो आहे. जर तुम्ही हा व्यवसाय १०० चौ. फूट क्षेत्रात सुरू केला तर तुम्ही दरवर्षी १ लाख ते ५ लाख रुपये कमावू शकता.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी