Earn money from YouTube:नवी दिल्ली: स्मार्टफोन वापरणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या खिशात युट्युब (YouTube)असतं. युट्युब हे आज एक असे व्यासपीठ बनले आहे जिथून कमाईचे अनेक मार्ग आहेत. बर्याच लोकांसोबत असे घडते की त्यांचे YouTube चॅनल देखील चांगली कामगिरी करतेआहे, परंतु कोणतीही कमाई होत नाही. वास्तविक यामागे युट्युबचे धोरण आहे. तुम्हाला फक्त या पॉलिसी अंतर्गत काम करावे लागेल, नाहीतर तुमचा व्हिडिओ जास्त लोकांपर्यत पोचू शकणार नाही, तुम्ही त्यातून कमाई करणे तर दूरच राहिले. (Earn Rs 2 Lakh from YouTube, Only avoid these mistakes)
अधिक वाचा : ६५० महिलांनी स्थापन केली बटाट्याचे चिप्स तयार करणारी कंपनी, शेअर होल्डर्स आणि डायरेक्टर्स पण महिला
प्रथम काही मूलभूत गोष्टींबद्दल जाणून घेऊया. पैसे कमवण्यासाठी तुम्हाला युट्युब पार्टनर प्रोग्राम (YPP) साठी अर्ज करावा लागेल. या कार्यक्रमाचा भाग होण्यासाठी तुमच्या चॅनेलचे 1,000 सदस्य असणे आवश्यक आहे. गेल्या 12 महिन्यांत 4,000 योग्य पब्लिक वॉच असली पाहिजेत म्हणजे इतक्या लोकांनी किंवा इतक्या वेळा तुमचा व्हिडिओ पाहण्यात आला असला पाहिजे. तुम्ही Youtube स्टुडिओला भेट देऊन या भागीदारी कार्यक्रमाचा भाग होण्यासाठी पात्र आहात की नाही हे देखील तपासू शकता.
अधिक वाचा : Mother's Day 2022: या 'मदर्स डे' ला, आईला द्या या 5 'अर्थ'पूर्ण भेट, तिचे म्हातारपण होईल सुखाचे...
एकदा तुम्ही अर्ज केल्यानंतर, Youtube टीम एका महिन्याच्या आत तुमच्या चॅनेलचे पुनरावलोकन करते. आपल्या चॅनलवर सतत अपलोड होणारे व्हिडिओ पाहिले जातात. आता सुरुवातीलाच एक सर्वात महत्वाची गोष्ट, इथे जर तुमची चूक झाली असेल तर महिन्याभरात भरपूर पैसे कमवण्याचे स्वप्न थोडे पुढे ढकलले जाऊ शकते. तुमच्या चॅनेलवर समान कॉन्टेन्टची पुनरावृत्ती होऊ नये. म्हणजेच तुम्ही आधी अपलोड केलेला व्हिडिओ असू नये. आधी अपलोड केलेला व्हिडिओच व्ह्यूज वाढवण्यासाठी पुन्हा अपलोड केला. अशा परिस्थितीत तुम्हाला सध्या YPP चे सदस्यत्व दिले जाणार नाही.
अधिक वाचा : Cheapest Home Loan | कमी व्याजदरात होम लोन हवंय? मग या बँका देतायेत सर्वात कमी व्याजदरात होम लोन
Youtube आणि तुमचा कमाईचा एकमेव मार्ग म्हणजे जाहिराती. एकदा तुम्ही YPP चे सदस्य झाल्यावर, तुम्हाला चॅनलवरील जाहिराती देखील चालू कराव्या लागतील. ते चालू केल्यानंतर, तुमच्या व्हिडिओवर मिळालेल्या जाहिरातीचे पैसे तुम्हाला थेट दिले जातील. परंतु यामध्येही प्रत्येक व्ह्यूनुसार पैसे दिले जातात. म्हणजेच, तुमचा व्हिडिओ जितका जास्त पाहिला जाईल, तितके तुम्हाला पैसे दिले जातील. औषधे, लैंगिक विषय यासंदर्भातील कॉन्टेन्ट असताना जाहिराती दिल्या जाणार नाहीत. या गोष्टींची काळजी घेतल्यास Youtube वरून भरपूर कमाई होऊ शकते.
सोशल मीडिया किंवा युट्युबसारख्या व्यासपीठांचा वापर हल्ली अनेक पद्धतीने केला जातो. सुरूवातीला फक्त मनोरंजन किंवा लोकांशी जोडून घेण्यासाठी असलेली ही व्यासपीठे आता कमाईचे साधन झाले आहेत. लाखो लोक यातून दणदणीत कमाई करत आहेत. तुम्हालाही यात रस असल्यास आणि सातत्याने काम करायची तयारी असल्यास तुम्हीदेखील मोठी कमाई करू शकता.