Economy | जीएसटी महसूल संकलनातील वाढ अर्थव्यवस्था रुळावर येत असल्याचे लक्षण

GST revenue collection | जीएसटी करप्रणाली लागू झाल्यापासून ऑक्टोबर महिन्यात आतापर्यतचे दुसरे मोठे करसंकलन झाले आहे. एप्रिल २०२१ मध्ये आतापर्यतचे सर्वाधिक उच्चांकी जीएसटी करसंकलन झाले होते.

GST revenue collection & Economy
जीएसटी करसंकलन आणि अर्थव्यवस्था 
थोडं पण कामाचं
  • ऑक्टोबर महिन्यात १,३०,१२७ कोटी रुपयांचे जीएसटी कर संकलन
  • जीएसटी लागू केल्यापासूनचे हे दुसरे सर्वाधिक कर संकलन
  • महसूलात २४ टक्क्यांची जबरदस्त वाढ

Economy | नवी दिल्ली : कोरोना महामारीमुळे अर्थव्यवस्थेला मोठाच फटका बसला होता. मात्र आता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर अर्थव्यवस्था पुन्हा गतीमान होताना दिसते आहे. उद्योगधंदे आणि व्यापाराला पुन्हा वेग येऊ लागल्याने जीएसटी करसंकलनातदेखील वाढ दिसून येते आहे. ऑक्टोबर महिन्यात जीएसटी महसूल (GST revenue collection)१,३०,१२७ कोटी रुपयांवर पोचला आहे. जीएसटी करप्रणाली (GST Tax System) लागू केल्यापासूनचे हे दुसरे सर्वाधिक कर संकलन आहे. मागील वर्षीच्या याच कालावधीशी तुलना करता ऑक्टोबर महिन्यात महसूलात २४ टक्क्यांची जबरदस्त वाढ झाली आहे. २०१९-२० च्या ऑक्टोबर महिन्याशी तुलना करता ही वाढ ३६ टक्के इतकी आहे. (GST revenue collection : In October, GST revenue collection crosses Rs 1.3 lakh cr.,  second highest in history)

जीएसटी करसंकलनाचा वाढता ट्रेंड

'जीएसटी करप्रणाली लागू झाल्यापासून ऑक्टोबर महिन्यात आतापर्यतचे दुसरे मोठे करसंकलन झाले आहे. एप्रिल २०२१ मध्ये आतापर्यतचे सर्वाधिक उच्चांकी जीएसटी करसंकलन झाले होते. अर्थव्यवस्था रुळावर येत असल्याचा परिणाम जीएसटी करसंकलनावरदेखील दिसून येतो आहे. करसंकलनात वाढ होते आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर प्रत्येक महिन्यात तयार होणाऱ्या ई-वे बिलांवरूनदेखील हाच ट्रेंड दिसून येतो आहे', असे मत अर्थमंत्रालयाने व्यक्त केले आहे.

जीएसटी करसंकलनातील विविध घटक

जीएसटी महसूलातील एकूण संकलनात सीजीएसटी करसंकलन २३,८६१ कोटी रुपये, एसजीएसटी करसंकलन ३०४२ कोटी रुपये, आयजीएसटी करसंकलन ६७,३६१ कोटी रुपये आणि सेजद्वारे ८,४८४ कोटी रुपयांचे करसंकलन झाले आहे. अर्थमंत्रालयाने म्हटले आहे की सरकारने २७,३१० कोटी रुपयांचे सीजीएसआर आणि २२,३९४ कोटी रुपयांचे एसजीएसटी कर सेटल केले आहेत. केंद्र सरकार आणि राज्य सरकारांसाठीच्या नेहमीच्या सेटलमेंटनुसार सीजीएसटी ५१,१७१ कोटी रुपये आणि एसजीएसटी ५२,८१५ कोटी रुपये आहे. आयातीतून मिळणाऱ्या जीएसटी करात ३९ टक्के वाढ झाली आहे तर देशांतर्गत व्यवहारातून मिळणाऱ्या करात मागील वर्षाच्या तुलनेत १९ टक्के वाढ झाली आहे.

कार विक्रीत घट झाली नसती तर अधिक करसंकलन

अर्थमंत्रालयाने पुढे म्हटले आहे की जर कार आणि इतर उत्पादनांच्या विक्रीवर जर चिपच्या तुटवड्याचा परिणाम झाला नसता तर करसंकलन आणखी अधिक झाले असते. अधिकाधिक लोकांकडून जीएसटी करप्रणालीनुसार कर भरल्यामुळे करसंकलनात वाढ झाली आहे. त्याचबरोबर एसएमएसद्वारे नील फायलिंग, क्वार्टरली रिटर्न मंथली पेमेंट सिस्टम आणि रिटर्नचे ऑटो-पॉप्युलेशन यामुळे करसंकलनात वाढ झाली आहे. शिवाय जीएसटी कौन्सिलने कर व्यवस्थेचे पालन न करणाऱ्यांविरुद्ध पावले उचलली आहेत. जे करदाते ओळीने सलग सहा रिटर्न भरण्यात अपयशी ठरले आहेत किंवा सिस्टमने ज्यांची नोंदणी नाकारली आहे अशा करदात्यांचे क्रेडिट ब्लॉक करण्यात आले आहे.

जीएसटी कौन्सिलने उचलली पावले

जीएसटी कौन्सिलने जुन्या रिटर्न फायलिंगवरील विलंब शुल्क माफ करण्याचे ठरवले आहे. जीएसटी कौन्सिल आणि सर्वच व्यवस्थेकडून उचलण्यात आलेल्या विविध पावलांमुळे जीएसटी भरण्याच्या संख्येत वाढ झाली आहे आणि करामुळे मिळणाऱ्या महसूलातदेखील वाढ झाली आहे. करचुकवेगिरी, बनवेगिरी यांना आळा घालण्यासाठी जीएसटी कौन्सिलकडून पावले उचलण्यात आली आहेत, असेही अर्थमंत्रालयाने म्हटले आहे.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी