Nirav Modi Update : फरार नीरव मोदीवर ईडीची मोठी कारवाई, हाँगकाँगमधील 253 कोटींची मालमत्ता जप्त

ED action on Nirav Modi : बँकांची फसवणूक करून पळून गेलेल्या हिरे व्यापारी नीरव मोदीवर (Nirav Modi) सक्तवसूली संचालनालयाने म्हणजे ईडीने (Enforcement Directorate) मोठी कारवाई केली आहे. सक्तवसूली संचालनालयाने नीरव मोदीची हाँगकाँगमधील (Hong Kong) 253.62 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. यामध्ये हिरे, दागिने आणि बँक ठेवींचा समावेश आहे. सक्तवसूली संचालनालयाचे म्हणणे आहे की नीरव मोदी मुख्य आरोपी असलेल्या फसवणुकीच्या प्रकरणात आतापर्यंत 2650.07 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.

Nirav Modi Case
नीरव मोदी प्रकरण 
थोडं पण कामाचं
  • सक्तवसूली संचालनालयाने नीरव मोदीची हाँगकाँगमधील (Hong Kong) 253.62 कोटी रुपयांची मालमत्ता जप्
  • नीरव मोदी मुख्य आरोपी असलेल्या फसवणुकीच्या प्रकरणात आतापर्यंत 2650.07 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली
  • पंजाब नॅशनल बँकेसह अनेक बॅंकांची फसवणूक करणारा नीरव मोदी सध्या इंग्लंडमध्ये वास्तव्यास

ED action on Nirav Modi : नवी दिल्ली : बँकांची फसवणूक करून पळून गेलेल्या हिरे व्यापारी नीरव मोदीवर (Nirav Modi) सक्तवसूली संचालनालयाने म्हणजे ईडीने (Enforcement Directorate) मोठी कारवाई केली आहे. सक्तवसूली संचालनालयाने नीरव मोदीची हाँगकाँगमधील (Hong Kong) 253.62 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. यामध्ये हिरे, दागिने आणि बँक ठेवींचा समावेश आहे. सक्तवसूली संचालनालयाचे म्हणणे आहे की नीरव मोदी मुख्य आरोपी असलेल्या फसवणुकीच्या प्रकरणात आतापर्यंत 2650.07 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. पंजाब नॅशनल बँकेसह (PNB) अनेक वित्तीय संस्थांची फसवणूक करणारा नीरव मोदी सध्या इंग्लंडमध्ये वास्तव्यास आहे. त्याच्या प्रत्यार्पणासाठी भारत सरकारकडूनही प्रयत्न करण्यात येत आहेत. मात्र अद्यापपर्यंत त्यात ठोस यश मिळालेले नाही. (ED seized wealth of Rs 253 of Nirav Modi in Hong Cong)

अधिक वाचा : Demat Account Update : शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी मोठी बातमी! सेबीने केली मोठी घोषणा

नीरव मोदीच्या प्रत्यार्पणाचा प्रश्न

जूनच्या शेवटच्या आठवड्यातच नीरव मोदीच्या प्रत्यार्पणाबाबत आणखी एक आक्षेप नोंदवण्यात आला आहे. न्यायालयाने आता या प्रकरणाची सुनावणी ऑक्टोबरमध्ये घेण्याचे ठरवले आहे. यावरून नीरव मोदीच्या प्रत्यार्पणाचा प्रश्न अधिक गुंतागुंतीचा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. नीरव मोदीचे प्रत्यार्पण झाल्यास तो आत्महत्या करू शकतो, असे नीरव मोदीच्या वकिलाने न्यायालयाला सांगितले. अशा स्थितीत त्याचे प्रत्यार्पण करणे चुकीचे ठरेल.

इतकंच नाही तर नीरव मोदीचं म्हणणं आहे की, त्याला भारताच्या तुरुंगात अत्यंत वाईट स्थितीत राहावं लागेल. दरम्यान, ईडीच्या या कारवाईमुळे नीरव मोदीला निश्चितच दणका बसला आहे. मद्यसम्राट विजय मल्ल्या, हीरा व्यापारी मेहुल चोक्सी आणि नीरव मोदी यांनी फसवणूक करून देशातून पलायन केल्याप्रकरणी सरकारला अनेकदा विरोधकांच्या टीकेला सामोरे जावे लागले आहे.

अधिक वाचा : ITR Filing : 31 जुलैपूर्वी भरा प्राप्तिकर विवरणपत्र...सरकार म्हणतंय मुदत वाढणार नाही

विजय मल्ल्या, नीरव मोदी आणि मेहुल चोक्सीकडूनची वसूली

बँकेचे कर्ज न फेडता परदेशात पळून गेलेले उद्योगपती विजय मल्ल्या (Vijay Mallya), नीरव मोदी (Nirav Modi) आणि मेहुल चोक्सी (Mehul Choksi) यांची १९,१११.२० कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे, अशी माहिती याआधीच सरकारने दिली आहे. 19111.20 कोटी रुपये किंमतीची मालमत्ता मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याच्या तरतुदींनुसार संलग्न करण्यात आली आहे. यापैकी 15,113.91 कोटी रुपयांची मालमत्ता सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना परत करण्यात आली आहे. यासोबतच 335.06 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करून भारत सरकारला देण्यात आली आहे, अशीही माहिती देण्यात आली.

अधिक वाचा : Gold-Silver Rate Today, 22 July 2022: सोन्याच्या भावात मोठी घसरण, सोन्याने गाठली नीचांकी, पाहा ताजा भाव

सरकारकडून पुढे सांगण्यात आले की, 15 मार्च 2022 पर्यंत, या प्रकरणांमध्ये फसव्या पद्धतीने काढण्यात आलेल्या निधीपैकी 84.61 टक्के रक्कम जप्त करण्यात आली आहे आणि बँकांना झालेल्या एकूण नुकसानापैकी 66.91 टक्के रक्कम बँकांना परत करण्यात आली आहे, अशीही माहिती सरकारने याआधी दिली आहे. विजय मल्ल्या (Vijay Mallya), नीरव मोदी (Nirav Modi) आणि मेहुल चोक्सी (Mehul Choksi) या तीन फरारी गुन्हेगारांनी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची त्यांच्या कंपन्यांद्वारे निधी काढून फसवणूक केली आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी