ED Action on Xiaomi India | ईडीचा हातोडा आता चीनी शाओमीवर, जप्त झाले कंपनीचे 5,551 कोटी रुपये

Xiaomi India : सक्तवसूली संचालनालय म्हणजे ईडीचा (ED)दणका आता चीनी कंपन्यांनाही बसणार आहे. स्मार्टफोन उत्पादनातील आघाडीची कंपनी असलेल्या शाओमीच्या (Xiaomi) भारतातील कार्यालयांवर ईडीने कारवाई केली आहे. कंपनीने कथित विदेशी चलन उल्लंघन केल्याबद्दल चिनी मोबाइल निर्माती कंपनी असलेल्या शाओमीच्या जागतिक उपाध्यक्षाची चौकशी केल्यानंतर, ईडीने परकी चलन व्यवस्थापन कायदा, 1999 च्या तरतुदींनुसार कंपनीचे ​​5,551.27 कोटी रुपये जप्त केले आहेत.

ED seizes Rs 5,551 crore of Xiaomi
ईडीची शाओमी इंडियावर मोठी कारवाई 
थोडं पण कामाचं
  • ईडीची शाओमी इंडियावर फेमा कायद्याअंतर्गत मोठी कारवाई, 5,551.27 कोटी रुपये जप्त
  • शाओमी इंडिया ही स्मार्टफोनचे उत्पादन करणारी चीनी कंपनी
  • रॉयल्टीच्या नावाखाली कंपनीने हजारो कोटी परदेशात पाठवल्याचा आरोप

ED seizes Rs 5,551 crore of Xiaomi : नवी दिल्ली : सक्तवसूली संचालनालय म्हणजे ईडीचा (ED)दणका आता चीनी कंपन्यांनाही बसणार आहे. स्मार्टफोन उत्पादनातील आघाडीची कंपनी असलेल्या शाओमीच्या (Xiaomi) भारतातील कार्यालयांवर ईडीने कारवाई केली आहे. ईडीने शाओमीची मोठी संपत्ती जप्त केली आहे. कंपनीने कथित विदेशी चलन उल्लंघन केल्याबद्दल चिनी मोबाइल निर्माती कंपनी असलेल्या शाओमीच्या जागतिक उपाध्यक्षाची चौकशी केल्यानंतर, सक्तवसूली संचालनालयाने (ED) शनिवारी परकी चलन व्यवस्थापन कायदा, 1999 च्या तरतुदींनुसार शाओमी टेक्नॉलॉजी इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे ​​5,551.27 कोटी रुपये,  (FEMA law) जप्त केले आहेत. (ED took action on Xiaomi India & seized Rs 5,551 crores under FEMA law) 

अधिक वाचा : Bank holidays in May 2022 | मे महिन्यात बँका 11 दिवस बंद राहणार...पाहा संपूर्ण यादी

शाओमी समूहाचीच सहाय्यक कंपनी

Xiaomi India ही चीन मधील Xiaomi समूहाची पूर्ण मालकीची साहाय्यक कंपनी आहे. ईडीच्या म्हणण्यानुसार जप्त केलेली रक्कम कंपनीच्या बँक खात्यांमध्ये पडून होती. ईडीने या वर्षी फेब्रुवारी महिन्यात कंपनीने केलेल्या बेकायदेशीर रेमिटन्सच्या संदर्भात तपास सुरू केला होता. या महिन्याच्या सुरुवातीला, ईडीने या प्रकरणाच्या संदर्भात Xiaomi चे जागतिक उपाध्यक्ष मनु कुमार जैन यांची चौकशी केली होती.

अधिक वाचा : PhonePe Gold Offer | अक्षय्य तृतियेला स्वस्तात सोने खरेदी कराचंय? फक्त 4 दिवसांसाठी इथे मिळतेय बंपर ऑफर...

रॉयल्टीच्या नावाखाली परदेशात पाठवले हजारो कोटी

एका निवेदनात, ईडीने म्हटले आहे की, “कंपनीने 2014 मध्ये भारतात आपले कार्य सुरू केले आणि 2015 पासून पैसे पाठवण्यास सुरुवात केली. कंपनीने 5551.27 कोटी रुपयांचे परकी चलन तीन परकी संस्थांना रॉयल्टीच्या रुपात पाठवले आहे ज्यात एक Xiaomi समूह समाविष्ट आहे. रॉयल्टीच्या नावावर एवढ्या मोठ्या रकमा त्यांच्या चिनी मूळ समूह संस्थांच्या सूचनेनुसार पाठवण्यात आल्या. इतर दोन यूएस स्थित असंबंधित संस्थांना पाठवलेली रक्कम देखील Xiaomi समूह घटकांच्या अंतिम फायद्यासाठी होती.”

अधिक वाचा : Changes from 1st May | 1 मे पासून महागड्या सिलिंडरपासून बँकांच्या सुट्ट्यांमधील बदल; जाणून घ्या महिना कसा सुरू होईल

कंपनीकडून कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप

ईडीनुसार शाओमी इंडियाय ही MI च्या ब्रँड नावाने भारतात मोबाईल फोनची व्यापारी आणि वितरक आहे.“Xiaomi India भारतातील निर्मात्यांकडून पूर्णपणे उत्पादित मोबाईल संच आणि इतर उत्पादने खरेदी करते. Xiaomi India ने अशा तीन परदेशी संस्थांकडून कोणतीही सेवा घेतलेली नाही ज्यांना अशा रकमा हस्तांतरित केल्या गेल्या आहेत. समूह घटकांमध्ये तयार केलेल्या विविध असंबंधित माहितीपटाच्या आवरणाखाली, कंपनीने रॉयल्टीच्या वेषात ही रक्कम परदेशात पाठवली जी FEMA च्या(Foreign Exchange Management Act,1999) कलम 4 चे उल्लंघन करते. परदेशात पैसे पाठवताना कंपनीने बँकांना दिशाभूल करणारी माहिती देखील दिली, ” असेही ईडीच्या निवेदनात म्हटले आहे.

शाओमी हा चीनमधील आघाडीचा ब्रॅंड आहे. शाओमी समूहाने मागील काही वर्षात चांगलीच मुसंडी मारली आहे. शाओमी जगातील आघाडीची स्मार्टफोन उत्पादक कंपनी बनली आहे. कंपनी वरच्या श्रेणीतील स्मार्टफोन शाओमी किंवा MI या ब्रॅंडने तर मध्यम  आणि खालच्या श्रेणीतील मोबाईल रेडमी या नावाने बाजारात विकते. रेडमी ही शाओमीचीच एक सहाय्यक कंपनी आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी