Edible oil price | महत्त्वाची बातमी! देशातील खाद्यतेल महागणार...इंडोनेशियाची 28 एप्रिलपासून पाम तेलाच्या निर्यातीवर बंदी, भारतीय बाजारपेठेत खळबळ

Palm oil : भारतातील खाद्यतेलाच्या किंमतीत (Edible Oil)मोठा भडका उडू शकतो. देशातील खाद्यतेलाच्या किंमती आणि पुरवठ्यावर घातक परिणाम होऊ शकतो. कारण इंडोनेशियाने (Indonesia)28 एप्रिलपासून पामतेलाच्या निर्यातीवर (palm oil) बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. इंडोनेशिया हा जगातील सर्वात मोठा पामतेल उत्पादक आहे. भारतात दरवर्षी पुरवल्या जाणार्‍या एकूण पाम तेलाच्या जवळपास 45 टक्के तेल इंडोनेशियातून येते.

Edible oil prices to surge
देशातील खाद्यतेलाच्या किंमती वाढणार 
थोडं पण कामाचं
  • भारतात खाद्यतेलाच्या किंमतीत जबरदस्त वाढ होण्याची शक्यता
  • इंडोनेशियाने (Indonesia)28 एप्रिलपासून पामतेलाच्या निर्यातीवर (palm oil) बंदी घालण्याचा निर्णय घेतला
  • खाद्यतेलांना आधीच युक्रेन युद्धाचा फटका बसला आहे

Indonesia to ban palm oil exports : नवी दिल्ली : भारतातील खाद्यतेलाच्या किंमतीत (Edible Oil)मोठा भडका उडू शकतो. देशातील खाद्यतेलाच्या किंमती आणि पुरवठ्यावर घातक परिणाम होऊ शकतो. कारण इंडोनेशियाने (Indonesia)28 एप्रिलपासून पामतेलाच्या निर्यातीवर (palm oil) बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. इंडोनेशिया हा जगातील सर्वात मोठा पामतेल उत्पादक आहे. भारतात दरवर्षी पुरवल्या जाणार्‍या एकूण पाम तेलाच्या जवळपास 45 टक्के तेल इंडोनेशियातून येते. पाम तेलाचा जगातील सर्वात मोठा उत्पादक इंडोनेशिया 28 एप्रिलपासून निर्यातीवर बंदी घालणार असल्याने देशांतर्गत खाद्यतेलाच्या किमती आधीच वाढल्या आहेत. इंडोनेशिया देखील देशांतर्गत टंचाई आणि वाढत्या किंमतींमध्ये खाद्यतेलाच्या वाढलेल्या किंमतींचा सामना करत आहे. (Edible oil may get costlier in India, as Indonesia to ban palm oil exports from 28 April)

अधिक वाचा : 7th Pay Commission | केंद्रीय कर्मचाऱ्यांना धक्का! डीए दरवाढीला लागू शकतो ब्रेक, जाणून घ्या संपूर्ण कारण

पामतेलाचा वापर कशात होतो

चीन आणि भारत हे इंडोनेशियामधून पाम तेलाची सर्वाधिक आयात करतात. जगातील निम्म्याहून अधिक पुरवठा याच देशांना होतो. पाम तेलाचा वापर स्वयंपाकाच्या तेलापासून ते प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ, सौंदर्यप्रसाधने आणि जैवइंधन या उत्पादनांमध्ये केला जातो. पाम तेल हे जगातील सर्वात जास्त वापरले जाणारे वनस्पती तेल आहे. पामतेलाचा वापर बिस्किटे, मार्जरीन, लॉन्ड्री डिटर्जंट आणि चॉकलेटसह अनेक उत्पादनांच्या निर्मितीमध्ये केला जातो. 

अधिक वाचा : TCS Recruitment 2022 | टीसीएसच्या नव्या नोकरभरतीत पदवीधरांना संधी, अर्जाची शेवटची तारीख, नोंदणी तपशील जाणून घ्या

आधीच युक्रेन युद्धाचा फटका

रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणानंतर (Russia Ukraine War)या वर्षी जागतिक खाद्यतेलाच्या किंमती वाढल्या आहेत. युक्रेन युद्धामुळे या प्रदेशातून सूर्यफूल तेलाच्या निर्यातीला फटका बसला आहे. जगातील सूर्यफूल तेलाच्या निर्यातीपैकी 76% वाटा काळ्या समुद्राचा आहे. तज्ज्ञांनी सांगितले की युक्रेन युद्धानंतर भारताचा सूर्यफूल तेलाचा पुरवठा दर महिन्याला सुमारे 100,000 टन इतका कमी झाला आहे आणि यामुळे सर्वसामान्यांसाठी परिस्थिती आणखी वाईट होऊ शकते.

अधिक वाचा : IEC 2022 | पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी इंधन दरवाढीबाबत केंद्राचा केला बचाव, म्हणाले राज्यांनी कमी करावा व्हॅट

काय आहे खाद्यतेलाचे गणित

भारत दरवर्षी सुमारे 13-13.5 दशलक्ष टन खाद्यतेल आयात करतो, त्यापैकी सुमारे 8-8.5 दशलक्ष टन (सुमारे 63 टक्के) पाम तेल आहे. यापैकी 8-8.5 दशलक्ष टन पाम तेल, जवळपास 45 टक्के इंडोनेशिया आणि उर्वरित मलेशिया शेजारील देशातून येते. व्यापार सूत्रांनी सांगितले की, जर अचानक, मे महिन्यापासून सुमारे 300,000-325,000 टन पाम तेलाचा मासिक पुरवठा थांबला तर त्यामुळे रशिया-युक्रेनमधील सध्याच्या संकटामुळे आधीच वाढलेल्या खाद्यतेलाच्या किंमतीत मोठी वाढ होईल. “रशिया-युक्रेन संकटापासून, भारताचा सूर्यफूल तेलाचा पुरवठा दरमहा 200,00-250,000 वरून दरमहा 100,000 टनांपेक्षा कमी झाला आहे. यामुळे किमतीत मोठी वाढ झाली आहे. या वर, आता जर इंडोनेशियाने पाम तेलाची निर्यात थांबवण्याचा निर्णय घेतला, तर ते आपल्यासाठी गंभीर समस्या निर्माण करेल,” असा इशारा भारतीय सॉल्व्हेंट एक्स्ट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ इंडिया (SEA) चे महासंचालक बीव्ही मेहता यांनी दिला.

दरम्यान, युक्रेनवरील रशियन आक्रमणानंतर वस्तूंच्या किंमतीत झालेल्या सततच्या वाढीदरम्यान, भारतातील घाऊक महागाई, मार्चमध्ये चार महिन्यांच्या उच्चांकावर गेली. ती आता वर्षभरापासून दुहेरी अंकात आहे. घाऊक किंमत निर्देशांक (WPI) फेब्रुवारीमध्ये 13.11% वरून मार्चमध्ये 14.55% वाढला. या वर्षाच्या सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय कंपन्यांना आयात रोखण्याचे आणि देशात उत्पादित तेलबियांची खरेदी सुरू करण्याचे आवाहन केले होते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी