Edible Oil | पेट्रोल-डिझेलनंतर खाद्यतेलाच्या किंमतीत घसरण, पाहा कोणत्या तेलाचा किती आहे भाव

Edible Oil Prices | पामतेल, शेंगदाणा तेल, सोयाबीन तेल, सुर्यफूल तेल आणि सर्वच प्रमुख खाद्यतेलाच्या किंमतीत घसरण झाली आहे. सणासुदीच्या काळात खाद्यतेलाच्या किंमतीत झालेल्या घसरणीमुळे सर्वसामान्यांना थोडासा दिलासा मिळाला आहे.

Edible Oil Prices
खाद्यतेलाच्या किंमतीत घसरण 
थोडं पण कामाचं
  • पेट्रोल (Petrol price)आणि डिझेलच्या दरात (Diesel Price) घसरण झाल्यानंतर खाद्यतेलाच्या किंमतीत देखील घसरण
  • अनेक ठिकाणी खाद्यतेलाच्या किंमतीत २०,१८,१०, ७ रुपयांपर्यतची घसरण नोंदवण्यात आली
  • खाद्यतेलाच्या किंमतीत झालेल्या घसरणीमुळे सर्वसामान्यांना थोडासा दिलासा मिळाला

Edible Oil | नवी दिल्ली: पेट्रोल (Petrol price)आणि डिझेलच्या दरात (Diesel Price) घसरण झाल्यानंतर खाद्यतेलाच्या (Edible Oil) किंमतीतदेखील घसरण झाली आहे. खाद्य आणि सार्वजनिक वितरण विभागाचे सचिव सुधांशु पांडेय यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे. अनेक ठिकाणी खाद्यतेलाच्या किंमतीत २०,१८,१०, ७ रुपयांपर्यतची घसरण नोंदवण्यात आली आहे. पामतेल, शेंगदाणा तेल, सोयाबीन तेल, सुर्यफूल तेल आणि सर्वच प्रमुख खाद्यतेलाच्या किंमतीत घसरण झाली आहे. सणासुदीच्या काळात खाद्यतेलाच्या किंमतीत झालेल्या घसरणीमुळे सर्वसामान्यांना थोडासा दिलासा मिळाला आहे. दिवाळीच्या एक दिवस आधीच केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात करत दिलासा दिला होता. (Edible Oil | After Petrol-Diesel prices, Edible oil prices are reduced)

खाद्य तेलाच्या किंमतीत किती घसरण?

पामतेलाच्या (Palm oil) किंमतीतील घसरण -

दिल्ली - ६ रुपये प्रति लिटर
अलीगढ- १८ रुपये प्रति लिटर
मेघालय - १० रुपये प्रति लिटर
तामिळनाडू - ५ ते ७ रुपये प्रति लिटर

खोबरेल तेलाच्या (Coconut Oil) किंमतीत घसरण-

दिल्ली - ७ रुपये प्रति लिटर
मध्यप्रदेश - १० रुपये प्रति लिटर
मेघालय - १० रुपये प्रति लिटर
तामिळनाडू- १० रुपये प्रति लिटर
अलीगढ- ५ रुपये प्रति लिटर

सोया ऑइलच्या (Soybean Oil) भावात घसरण-

दिल्ली -  ५ रुपये प्रति लिटर
लुधियाना आणि अलीगढ - ५ रुपये प्रति लिटर
छत्तीसगढ- ११ रुपये प्रति लिटर
महाराष्ट्र- ५ ते ७ रुपये प्रति लिटर

सुर्यफुल तेलाच्या (Sunflower Oil) भावातील घसरण- 

दिल्ली- १० रुपये प्रति लिटर
ओडिशा - ५ रुपये प्रति लिटर
मेघालय - २० रुपये प्रति लिटर

खाद्यतेलाच्या किंमतीमधील ही घसरण ३१ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर या दरम्यान नोंदवण्यात आली आहे.

अर्थ मंत्रालयाने सांगितले की, भारत सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील केंद्रीय उत्पादन शुल्कातील कपात 4 नोव्हेंबर 2021 पासून लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होतील. उत्पादन शुल्कातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी कपात आहे. सरकारने पेट्रोलच्या दरात 5 रुपये आणि डिझेलच्या दरात 10 रुपये उत्पादन शुल्क कर (Petrol-Diesel Excise Duty Cut) कमी केला आहे.  सामान्यांना या निर्णयामुळे दिलासा मिळणार असला तरीही केंद्र सरकारच्या तिजोरीवर यामुळे मोठा भार पडणार आहे. दरमहा 8,700 कोटी रुपयांचे महसुलाचे नुकसान होणार एप्रिल-ऑक्टोबरमधील वापराच्या आकडेवारीवर आधारित, उत्पादन शुल्कात कपात केल्यामुळे सरकारच्या महसुलात दरमहा 8,700 कोटी रुपयांचे नुकसान होणार आहे. ऑइल इंडस्ट्रीशी संबंधित सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वार्षिक आधारावर साधारण 1 लाख कोटी रुपयांहून अधिकचा परिणाम होईल. पेट्रोलची किंमत सध्याच्या 110.04 रुपये प्रति लीटरवरून 105.04 रुपये प्रति लीटरवर खाली येईल, तर डिझेलची किंमत (Diesel Price Today) प्रति लीटर 98.42 रुपयांवरून 88.42 रुपये प्रति लीटरवर येईल.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी