खाद्यतेलाच्या किंमती ३० टक्क्यांपर्यंत वाढल्या, 'या' कारणामुळे वाढल्या किंमती

काम-धंदा
Updated Nov 20, 2020 | 13:09 IST | टाइम्स नाऊ मराठी

वाढत्या खाद्यतेलाच्या किमती सरकारच्या चिंतेचे कारण बनले आहे. शेंगदाणा, मोहरी, डालडा, सोयाबीन, सूर्यफूल आणि पामतेल या सर्व खाद्यतेलांच्या सरासरी किमती वाढल्या आहेत.

Edible oil prices
खाद्यतेलाच्या किंमती  |  फोटो सौजन्य: Times of India

थोडं पण कामाचं

  • वाढत्या खाद्यतेलाच्या किमती सरकारच्या चिंतेचे कारण बनले आहे.
  • मागील एका वर्षात २०-३०% पर्यंत वाढ झाली आहे. 
  • मलेशियात मागील सहा महिन्यात पाम ऑईलच्या उत्पादनातील घट हे खाद्य तेलांच्या वाढत्या किमतींमागील मुख्य कारण असल्याचे मानले जात आहे.

नवी दिल्ली :  वाढत्या खाद्यतेलाच्या किमती सरकारच्या चिंतेचे कारण बनले आहे. शेंगदाणा, मोहरी, डालडा, सोयाबीन, सूर्यफूल आणि पामतेल या सर्व खाद्यतेलांच्या सरासरी किमती वाढल्या आहेत. पाम, सोयाबीन आणि सूर्यफूल तेलाच्या बाबतीत मागील एका वर्षात २०-३०% पर्यंत वाढ झाली आहे. 

खाद्यतेलाच्या किमतींमध्ये सातत्याने वाढ होत आहे

हाती आलेल्या बातमीनुसार हा मुद्दा या आठवड्याच्या प्रारंभी गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या मंत्र्यांच्या गटासमोर एका सादरीकरणात मुख्य अजेंड्यावर होता. ३०,००० टन कांद्याच्या आयातीमुळे कांद्याचा भाव उतरला आहे, तर बटाट्या भाव स्थिरावला आहे. पण खाद्यतेलाच्या किमतींमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे या सादरीकरणात म्हटले आहे. 


ग्राहक व्यवहार मंत्रालयाकडून प्रदर्शित केलेल्या डेटानुसार गुरुवारी मस्टर्ड ऑईलचा सरासरी भाव हा १२० रुपये प्रति लिटर एवढा होता. गुरुवारी मोहरीच्या तेलाची सरासरी किंमत १२० रुपये प्रतिलिटर होती. डालडाची किंमत १०२.५ प्रति किलो पर्यंत वाढली आहे, जी मागच्या वर्षी ७५.२५ प्रति किलो एवढी होती. सोयाबीन तेलाची साधारण किंमत ११० रुपये प्रति लीटर होती, तर २०१९ मध्ये १८ऑक्टोबरला सरासरी किंमत ९० होती. सूर्यफूल आणि पामच्या बाबतीतही असाच ट्रेंड आहे.

ग्राफिक्स सौजन्य - टाइम्स ऑफ इंडिया 

 मलेशियात पाम ऑईलच्या उत्पादनातील घट हे मुख्य कारण

सूत्रांच्या माहितीनुसार मलेशियात मागील सहा महिन्यात पाम ऑईलच्या उत्पादनातील घट हे खाद्य तेलांच्या वाढत्या किंमती मागील मुख्य कारण असल्याचे मानले जात आहे. देशातील पाम तेलापैकी जवळजवळ ७०% तेल प्रोसेस्ड फूड उद्योगाद्वारे वापरले जाते. पाम तेलाच्या किंमतीवरील आयात शुल्क कमी करायचे की नाही याचा निर्णय आता सरकारचा आहे. पाम तेलाच्या किंमतींचा अन्य खाद्यतेलांच्या किंमतींवर थेट परिणाम होतो. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी