Edible Oil Price : खूशखबर! खाद्यतेल होणार स्वस्त! इंडोनेशियाचा मोठा निर्णय

Indonesia's decision on Palm oil : महागाईने त्रस्त झालेल्या सर्वसामान्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. खाद्यतेल (Edible oil price) लवकरच स्वस्त होणार आहे. खाद्य तेलावरील खर्च हा सर्वसामान्यांच्या दर महिन्याच्या घरगुती खर्चातील मोठा हिस्सा असतो. आता इंडोनेशियाने (Indonesia) निर्यातीला चालना देण्यासाठी आणि मोठा साठा कमी करण्यासाठी 31 ऑगस्टपर्यंत सर्व पाम तेल उत्पादनांवरील निर्यात शुल्क रद्द केले आहे, अशी माहिती अर्थ मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी दिली आहे.

Edible Oil Price update
खाद्यतेलाचे भाव घटणार 
थोडं पण कामाचं
  • खाद्यतेलाच्या आघाडीवर सर्वसामान्यांना मिळणार मोठा दिलासा
  • खाद्यतेल होणार स्वस्त
  • इंडोनेशियाने पामतेलाच्या संदर्भात निर्णय घेतल्याचा परिणाम

Edible Oil Price update : नवी दिल्ली : महागाईने त्रस्त झालेल्या सर्वसामान्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. खाद्यतेल (Edible oil price) लवकरच स्वस्त होणार आहे. खाद्य तेलावरील खर्च हा सर्वसामान्यांच्या दर महिन्याच्या घरगुती खर्चातील मोठा हिस्सा असतो. आता इंडोनेशियाने (Indonesia) निर्यातीला चालना देण्यासाठी आणि मोठा साठा कमी करण्यासाठी 31 ऑगस्टपर्यंत सर्व पाम तेल उत्पादनांवरील निर्यात शुल्क रद्द केले आहे, अशी माहिती अर्थ मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी दिली आहे. इंडोनेशिया हा पाम तेलाचा (Palm Oil)जगातील सर्वात मोठा निर्यातदार देश आहे आणि या निर्णयामुळे पाम तेलाच्या किंमती आणखी घसरण्याची शक्यता आहे. तुमच्या माहितीसाठी एप्रिलच्या अखेरीपासून एका वर्षात त्याची किंमत सुमारे 50% कमी झाली आहे. (Edible oil to get cheaper as Indonesia took this decision)

अधिक वाचा : GST Rate Hike :18 जुलैपासून महागाईचा मोठा झटका, अनेक वस्तूंवरील जीएसटी करात वाढ...पाहा कोणत्या वस्तू महागणार?

तेलबियांचे भाव पडले

येथे, देशांतर्गत बाजारातील खाद्यतेलाच्या किंमतीत घसरण होत असताना, गेल्या आठवड्यात देशभरातील तेल-तेलबिया बाजारात मोहरी, सोयाबीन तेल-तेलबिया आणि पामोलिन तेलाच्या किंमतीत घसरण झाली. दुसरीकडे, शेंगदाणे आणि क्रूड पामतेल (सीपीओ) च्या किंमतीत घसरण झाली आहे. उर्वरित तेल आणि तेलबियांचे भाव कायम आहेत. परदेशात खाद्यतेलाची बाजारपेठ मोडकळीस आली असून, हेच या घसरणीचे प्रमुख कारण असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. या घसरणीमुळे देशातील आयातदारांना त्यांनी खरेदी केलेल्या किंमतीपेक्षा कमी किंमतीत सौदे विकावे लागत असल्याने त्यांचा मोठा फटका बसत आहे. ऑगस्टमध्ये सीपीओची खेप व्यापाऱ्यांनी 2,040 डॉलर प्रति टन आयात केली होती. तीच सध्याच्या किंमतीनुसार सुमारे 1,000 डॉलर प्रति टनवर आली आहे. म्हणजेच, घाऊक बाजारात CPO (सर्व खर्च आणि शुल्कांसह) 86.50 रुपये प्रति किलो असेल.

अधिक वाचा : Indian Railways: रेल्वेने आज रद्द केल्या 200 हून अधिक गाड्या...रेल्वे स्टेशनवर जाण्यापूर्वी पाहा ही यादी

किती आहे किंमत

सोयाबीनच्या घसरणीमुळे पामोलिन तेलाचे दरही घसरल्याचे सूत्रांनी सांगितले. सीपीओच्या व्यवसायात फक्त किंमत आहे, कोणतेही सौदे केले जात नाहीत. कारण किंमत आयातदारांच्या खरेदी किंमतीच्या निम्म्याहून कमी आहे. सूत्रांनी सांगितले की, गेल्या आठवड्याच्या शेवटी मोहरीचे भाव 125 रुपयांनी घसरून 7,170-7,220 रुपये प्रति क्विंटल झाले. मोहरी दादरी तेल आठवड्याच्या शेवटी 250 रुपयांच्या घसरणीसह 14,400 रुपये प्रति क्विंटलवर बंद झाले. दुसरीकडे, मोहरी पक्की घणी आणि कच्ची घणी तेलाचे दरही प्रत्येकी 35 रुपयांनी घसरून अनुक्रमे 2,280-2,360 रुपये आणि 2,320-2,425 रुपये प्रति टिन (15 किलो) झाले. कच्च्या पाम तेलाच्या (सीपीओ) किंमती  आठवड्यात 50 रुपयांनी वाढून 10,950 रुपये प्रति क्विंटलवर पोहोचल्या. तर पामोलिन दिल्लीचे भाव 400 रुपयांनी घसरून 12,400 रुपये आणि पामोलिन कांडला 250 रुपयांनी घसरून 11,300 रुपये प्रति क्विंटलवर बंद झाले.

अधिक वाचा : SBI Interest rates : स्टेट बॅंकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाचे...बॅंकेकडून व्याजदरात 10 बीपीएसची वाढ

याआधी खाद्यतेलाच्या किंमतींना आवर घालण्यासाठी सरकारने काही पावले उचलली होती. महागाई (Inflation)नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने आणखी एक मोठे पाऊल उचलले होते. सरकारने क्रूड सोयाबीन (Crude Soybean)आणि सूर्यफूल तेलाची (Sunflower Oil)आयात मार्च 2024 पर्यंत शुल्कमुक्त केली आहे. याशिवाय त्यांच्या आयातीवर कृषी उपकरही लागू होणार नाही. सरकारचा हा निर्णय २४ मेच्या मध्यरात्रीपासून लागू झाला आहे. अर्थ मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, 2022-23 आणि 2023-24 या आर्थिक वर्षांत दरवर्षी 2 दशलक्ष टन कच्चे सोयाबीन आणि सूर्यफूल तेलाच्या आयातीवर कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी