Edible Oil Price : आनंदाची बातमी! खाद्यतेलाच्या किंमतीत मोठी घसरण, 'या' कंपनीने एका झटक्यात कमी केले 30 रुपये...

Fortune Oil : खाद्यतेलाच्या किंमतीत (Edible oil Price)घट होताना दिसते आहे. सरकारने मागील काही दिवसांपासून खाद्यतेलाच्या किंमतींना आवर घालण्यासाठी पावले उचलली आहेत. तर गेल्या काही दिवसांत तेल कंपन्यांकडूनही दर कमी करण्याची घोषणा करण्यात आली होती. आता पुन्हा एकदा फॉर्च्युन ब्रँड (Fortune) अंतर्गत उत्पादन विकणारी खाद्य तेल कंपनी अदानी विल्मरने (Adani Wilmar)आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलाच्या किंमती कमी झाल्यानंतर दर कमी करणार असल्याचे सांगितले आहे.

Adani Wilmar cuts edible oil price
अदानींच्या फॉर्च्युनने खाद्यतेलाच्या किंमतीत केली कपात 
थोडं पण कामाचं
  • वाढत्या महागाईत सर्वसामान्यांना मोठा दिलासा
  • खाद्यतेलाच्या किंमतीत मोठी घसरण
  • अदानी विल्मरच्या फॉर्च्युनने खाद्यतेलाचे भाव 30 रुपयांनी घटवले

Edible Oil Price Cut : नवी दिल्ली: खाद्यतेलाच्या किंमतीत (Edible oil Price)घट होताना दिसते आहे. सरकारने मागील काही दिवसांपासून खाद्यतेलाच्या किंमतींना आवर घालण्यासाठी पावले उचलली आहेत. तर गेल्या काही दिवसांत तेल कंपन्यांकडूनही दर कमी करण्याची घोषणा करण्यात आली होती. आता पुन्हा एकदा फॉर्च्युन ब्रँड (Fortune) अंतर्गत उत्पादन विकणारी खाद्य तेल कंपनी अदानी विल्मरने (Adani Wilmar)आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलाच्या किंमती कमी झाल्यानंतर दर कमी करणार असल्याचे सांगितले आहे. खाद्यतेलाच्या दरात प्रतिलिटर 30 रुपयांनी कपात करण्याची घोषणा कंपनीकडून करण्यात आली होती. (Edible price drops, Adani Wilmar reduces price by Rs 30)

अधिक वाचा : जगणं महागलं! दही, दूध लोणी आणू कसं घरी? गृहिणींना पडला प्रश्न, 'या' वस्तू महागणार

सोयाबीन तेलातील सर्वात मोठी कपात

सोयाबीन तेलाच्या दरात सर्वात मोठी कपात करण्यात आली आहे. नवीन किंमतीसह माल लवकरच बाजारात येईल. यापूर्वी, धारा ब्रँड अंतर्गत खाद्यतेल विकणाऱ्या मदर डेअरीने सोयाबीन आणि राईस ब्रान ऑइलच्या किंमतीत 14 रुपयांनी कपात केली होती. खाद्यतेलाच्या किंमतींवर चर्चा करण्यासाठी अन्न मंत्रालयाने 6 जुलै रोजी बैठक बोलावली होती. यादरम्यान सर्व खाद्यतेल कंपन्यांना जागतिक स्तरावर दरात झालेल्या घसरणीचा फायदा ग्राहकांपर्यंत पोचवण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.

अधिक वाचा : Gold-Silver Rate Today, 18 July 2022: सोन्याच्या भावात पुन्हा तेजी, युरोपियन सेंट्रल बॅंकेच्या बैठकीपूर्वी डॉलरवर दबाव, पाहा ताजा भाव

कपातीचा लाभ ग्राहकांना मिळाला

एका निवेदनात कंपनीने म्हटले आहे की, "जागतिक दरात झालेली घट आणि खाद्यतेलाच्या किंमतीतील कपातीचे फायदे ग्राहकांपर्यंत पोचवण्याचे सरकारचे प्रयत्न पाहता, अदानी विल्मरने खाद्यतेलाच्या किंमती आणखी कमी केल्या आहेत." गेल्या महिन्यातही दर कमी करण्यात आले होते.

अधिक वाचा : LIC Plan : एलआयसीच्या या प्लॅनमध्ये दररोज 238 रुपये जमा करा आणि मिळवा 54 लाख, पाहा विस्ताराने

सोयाबीन तेल 165 रुपये प्रति लिटर

फॉर्च्युन सोयाबीन तेलाची किंमत 195 रुपये प्रति लिटरवरून 165 रुपये प्रति लीटर झाली आहे. सूर्यफूल तेलाची किंमत 210 रुपये प्रति लीटरवरून 199 रुपये प्रति लीटर झाली आहे. मोहरीच्या तेलाची कमाल किरकोळ किंमत 195 रुपये प्रति लिटरवरून 190 रुपये प्रति लीटर इतकी कमी करण्यात आली आहे. फॉर्च्युन राईस ब्रान ऑइलची किंमत 225 रुपये प्रति लीटरवरून 210 रुपये प्रति लीटर करण्यात आली आहे. अदानी विल्मरचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ अंगशु मलिक म्हणाले, "आम्ही जागतिक स्तरावर किंमतीतील कपातीचे फायदे ग्राहकांपर्यंत पोचवले आहेत आणि नवीन माल लवकरच बाजारात पोचेल."

महागाईने त्रस्त झालेल्या सर्वसामान्यांसाठी खाद्यतेलाच्या किंमतीत झालेली घट हा एक मोठाच दिलासा ठरणार आहे. खाद्य तेलावरील खर्च हा सर्वसामान्यांच्या दर महिन्याच्या घरगुती खर्चातील मोठा हिस्सा असतो. इंडोनेशियाने (Indonesia) निर्यातीला चालना देण्यासाठी आणि मोठा साठा कमी करण्यासाठी 31 ऑगस्टपर्यंत सर्व पाम तेल उत्पादनांवरील निर्यात शुल्क रद्द केले आहे, अशी माहिती अर्थ मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी दिली आहे. इंडोनेशिया हा पाम तेलाचा (Palm Oil)जगातील सर्वात मोठा निर्यातदार देश आहे आणि या निर्णयामुळे पाम तेलाच्या किंमती आणखी घसरण्याची शक्यता आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी