Unacademy Mass layoffs : खर्च कमी करण्यासाठी अनअकॅडमीने एका फटक्यात कामावरून काढले तब्बल 1,000 कर्मचारी

Unacademy Policy : शिक्षण क्षेत्रातील आघाडीचे स्टार्टअप (EdTech startup)असलेल्या अनअकॅडमीने (Unacademy)त्यांच्या खर्च कपात योजनेचा भाग म्हणून सुमारे 1,000 कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. एकाच फटक्यात अनअकॅडमीने आपल्या 1,000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. अनअकॅडमीमधील ऑन-रोल कर्मचारी आणि कंत्राटी शिक्षकांसह कर्मचाऱ्यांना गेल्या काही आठवड्यांत बडतर्फ ( Mass layoffs at Unacademy)करण्यात आले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

Mass layoffs at Unacademy
अनअकॅडमीने मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले 
थोडं पण कामाचं
  • 2015 मध्ये स्थापन झालेल्या कंपनीने त्वरीत स्वतःचे नाव कमावले आणि ऑगस्ट 2021 मध्ये सिंगापूरच्या टेमासेकच्या नेतृत्वाखाली 44 कोटी डॉलर उभे केले तेव्हा कंपनीचे मूल्य 3.4 अब्ज डॉलर इतके होते.
  • गेल्या काही आठवड्यांमध्ये, युनाकेडमीने सुमारे 1,000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे.
  • एका व्यक्तीने सांगितले की त्यांनी दररोज 12-14 तास काम करणे अपेक्षित होते आणि जर त्यांनी तसे केले नाही तर त्यांना सोडण्याचा निर्णय घेण्यास सांगितले गेले.

Unacademy Update : नवी दिल्ली : शिक्षण क्षेत्रातील आघाडीचे स्टार्टअप (EdTech startup)असलेल्या अनअकॅडमीने (Unacademy)त्यांच्या खर्च कपात योजनेचा भाग म्हणून सुमारे 1,000 कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. एकाच फटक्यात अनअकॅडमीने आपल्या 1,000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. अनअकॅडमीमधील ऑन-रोल कर्मचारी आणि कंत्राटी शिक्षकांसह कर्मचाऱ्यांना गेल्या काही आठवड्यांत बडतर्फ ( Mass layoffs at Unacademy)करण्यात आले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. गेल्या आठवड्यातच, सॉफ्टबँकेची गुंतवणूक असलेल्या या स्टार्टअपने सुमारे 600 कर्मचाऱ्यांना बाहेर पडण्यास सांगितले होते. बेंगळुरूस्थित असलेली ही कंपनी मंदीच्या पार्श्वभूमीवर आणि एकूणच आर्थिक तणावाची परिस्थिती लक्षात घेत कर्मचारी संख्या कमी करण्याचा विचार करत आहे. (EdTech Unacademy layoffs 1,000 employees for cost cutting policy)

2015 मध्ये स्थापन झालेल्या या कंपनीने त्वरीत स्वतःचे नाव कमावले आणि ऑगस्ट 2021 मध्ये सिंगापूरच्या टेमासेकच्या नेतृत्वाखाली 44 कोटी डॉलरचे भांडवल उभारले होते. त्यावेळेस अनअकॅडमीचे बाजारमूल्य 3.4 अब्ज डॉलर इतके होते.

अधिक वाचा : World's Richest Person : गौतम अदानींची घोडदौड, आता जगातील 8 व्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती, तर मुकेश अंबानी घसरले 11व्या स्थानी

खर्च वाचवण्यासाठी तब्बल 1,000 कर्मचारी काढले

"Unacademy प्रत्येक विभागातून खर्च कमी करण्याचा विचार करत आहे आणि म्हणूनच त्यांनी हे पाऊल उचलले आहे," असे वक्तव्य इकॉनॉमिक टाईम्सने वर नमूद केलेल्या लोकांपैकी एकाचा उल्लेख करत दिले आहे. 1,000 बडतर्फ कर्मचार्‍यांना काढून टाकण्यात आले आहे. त्यातील सुमारे 300 कंत्राटी शिक्षक होते, तर उर्वरित विक्री, व्यवसाय आणि इतर कामांवर होते. अनअकॅडमीमधून काढून टाकण्यात आलेले बहुसंख्य कर्मचारी हे विक्री आणि व्यवसाय विकास विभागातील आहेत.

अधिक वाचा : Sukanya Samriddhi Yojana : सुकन्या समृद्धी योजनेत 5 मोठे बदल! तुमच्यावर होणार थेट परिणाम, गुंतवणूक करण्यापूर्वी जाणून घ्या

कामकाजाचे मूल्यांकन करून निर्णय घेतल्याचे कंपनीचे म्हणणे

एका निवेदनात, Unacademy च्या प्रवक्त्याने सांगितले की कंपनी उच्च कामगिरी आणि पारदर्शकतेची संस्कृती निर्माण करत आहे. "अनेक मूल्यमापनांच्या परिणामांवर आधारित, आमच्या आकार आणि प्रमाणातील कोणत्याही संस्थेसाठी सामान्य आहे. त्याप्रमाणे कर्मचाऱ्यांचे कामाचे स्वरुप आणि कार्यक्षमता या निकषांवर कर्मचारी, कंत्राटदार आणि शिक्षकांच्या कामाचे पुनर्मूल्यांकन केले गेले," असे त्यात म्हटले आहे.

अधिक वाचा : IRCTC Tatkal Rail Ticket : रेल्वेचे कन्फर्म 'तत्काल तिकीट' मिळविण्यासाठीच्या महत्त्वाच्या टिप्स...

कर्मचारी मात्र म्हणतात आम्ही अनभिज्ञ

मात्र, कर्मचाऱ्यांचे म्हणणे वेगळे आहे. सुमारे अर्धा डझन प्रभावित कर्मचार्‍यांनी दावा केला आहे की त्यांना कंपनीच्या या खर्च कमी करण्याच्या धोरणाबद्दल अनभिज्ञ ठेवण्यात आले आहे. त्यांनी हे स्पष्ट केले की खराब रेटिंग किंवा कामगिरीबद्दल त्यांना कोणताही अभिप्राय दिला गेला नाही. प्रभावित कर्मचार्‍यांना कंपनीकडून कामावरून काढून टाकताना 2 महिन्यांची नोटिस स्वीकारण्यासाठी फक्त एक तास देण्यात आला होता. पुढे, कर्मचार्‍यांनी सांगितले की नवीन नोकर्‍या शोधण्यासाठी अनॅकॅडमीने त्यांना मदत केली नाही. एका व्यक्तीने सांगितले की त्यांनी दररोज 12-14 तास काम करणे अपेक्षित होते आणि जर त्यांनी तसे केले नाही तर त्यांना सोडण्याचा निर्णय घेण्यास सांगण्यात आले. "कामाच्या ठिकाणी खूप दबाव आणि अयोग्य वातावरण आहे," असेही एका कर्मचाऱ्याने पुढे सांगितले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी