जर तुम्ही Education loan घेतले असेल तर या मुख्य बाबींकडे द्या लक्ष, होईल फायदा

जर तुम्ही शैक्षणिक कर्ज घेतले असेल तर सहजपणे याची परतफेड करण्यासाठी काही महत्त्वाच्या बाबी लक्षात घ्या. यामुळे शैक्षणिक कर्जाची परतफेड करणे सोपे होईल.

Education loan
शैक्षणिक कर्ज  
थोडं पण कामाचं
  • च्चशिक्षण, बारावीनंतचे शिक्षण खूपच खर्चिक झाले आहे
  • शैक्षणिक कर्ज घेण्याशिवाय पर्याय नाही
  • भारतात शैक्षणिक खर्चातील वाढीचा दर जवळपास ११ ते १२ टक्के

नवी दिल्ली: अलीकडच्या शिक्षणासाठी मोठा खर्च करावा लागतो. अनेकवेळा शिक्षणाचा खर्च पालकांच्या आवाक्याबाहेर जातो. विशेषत: उच्चशिक्षण, बारावीनंतचे शिक्षण खूपच खर्चिक झाले आहेत. सर्वसामान्यांना शैक्षणिक खर्चाचा हा भार त्यांच्या बचतीतून हाताळणे शक्य नसते. अशावेळी शैक्षणिक कर्ज घेणे आवश्यक ठरते. अनेक पालक सध्या शैक्षणिक कर्ज घेताना दिसतात. प्रत्येक बॅंकेला शैक्षणिक कर्जासाठी काही भाग राखून ठेवावा लागतो. शिक्षण पूर्ण झाल्यावर नोकरी मिळणे सोपे नसते. अशावेळेस जर शैक्षणिक कर्जाची परतफेड करण्यासाठीचे नियोजन केले नाही तर विद्यार्थ्यांना अडचणींना तोंड द्यावे लागू शकते. (If you have taken the Education loan, then these points will be beneficial for you)

शैक्षणिक कर्जाची परतफेड करण्यासाठी कोणत्या बाबींचे भान ठेवणे गरजे आहे ते पाहूया. यामुळे शैक्षणिक कर्जाची परतफेड करणे सोपे होईल. समोर आलेल्या माहितीनुसार भारतात शैक्षणिक खर्चातील वाढीचा दर जवळपास ११ ते १२ टक्के आहे. त्यामुळे शैक्षणिक कर्जाची आवश्यकता वाढली आहे. हे कर्ज आता नाईलाज झाले आहे. जर तुम्ही शैक्षणिक कर्ज घेतले असेल तर सहजपणे याची परतफेड करण्यासाठी काही महत्त्वाच्या बाबी लक्षात घ्या. 

कालावधी मोठा ठेवल्यास ईएमआय होईल कमी

जर तुम्ही शैक्षणिक कर्ज घेतले असेल तर त्याचा कालावधी जास्त ठेवा. यामुळे तुमच्या ईएमआयची रक्कम कमी असेल आणि त्याची परतफेड करणे तुम्हाला सोपे जाईल. विद्यार्थी जोपर्यत शिक्षण घेतात तोपर्यत बॅंक मोराटोरियम देते. म्हणजेच तोपर्यत परतफेडीचा ताण नसतो. मात्र शिक्षण पूर्ण झाल्यावर बॅंक तुमच्याकडून ईएमआयची वसूली करते. अशावेळेस जर तुम्ही मोराटोरियमच्या कालावधीत काही हिस्सा परत केलात तर त्याचा तुम्हाला फायदा होईल.

पार्ट टाइम नोकरी करा

जर तुम्ही शिक्षण घेत असाल तर त्याचवेळी कर्जाची परतफेड करण्याची तयारी सुरू करा. यासाठी तुम्ही पार्ट टाइम नोकरी करू शकता. पार्ट टाइम नोकरी किंवा उत्पन्नासाठी तुम्ही ट्युशन घेऊ शकता. जर कलेमध्ये रस असेल तर त्याचा व्यावसायिक वापर करू शकता. जर ग्राफिक्स वर्क येत असेल तर ती कामे मिळवू शकता. याच प्रकारे काही काम करून मिळणाऱ्या उत्पन्नातून कर्जाची परतफेड करू शकता.

कमवण्याइतकीच बचत महत्त्वाची

शिक्षण घेत असताना बचत करणेदेखील महत्त्वाचे असते. लाइफस्टाइलच्या वाढत्या खर्चामुळे बचत करणे अवघड जाते. त्यामुळे एक ठराविक रकमेची बचत करायची आहे हे ठरवा. गरजा आणि इच्छा यातील फरक ओळखा. जिथे खरोखरच आवश्यकता असेल तिथेच खर्च करा.

भविष्यातील उत्पन्नाचा अंदाज आताच बांधा

तुम्ही शैक्षणिक कर्ज घेतलेले असल्यास भविष्यातील आर्थिक गणिताचा अंदाज आताच घ्या. तुम्ही आज घेत असलेले शिक्षण सध्या चांगले किंवा तेजीत असू शकते. मात्र भविष्यात त्या क्षेत्रात किंवा सेक्टरमध्ये नोकऱ्या कमी होऊ शकतात. त्यामुळे तुमचे सगळे आर्थिक गणित बिघडू शकते. या सर्व बाबी लक्षात घेऊन योग्य तो अभ्यासक्रम निवडा आणि त्याप्रमाणे शैक्षणिक कर्ज घ्या. कारण जर वेळेत योग्य नोकरी मिळाली नाही तर शैक्षणिक कर्जाची परतफेड करणे अवघड होऊन बसते. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर एकंदरित काय परिस्थिती येऊ शकते याचा अंदाज आजच बांधा आणि त्याप्रमाणे आर्थिक जुळवाजुळव करा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी