Story of Ray-Ban : एका चष्म्याची कहाणी, ज्यावर फिदा होते प्रत्येकाची जवानी

रे-बॅन हा गॉगलमधील सर्वात मोठा आणि लोकप्रिय ब्रँड. त्याचा इतिहास फारच रंजक आहे.

Story of Ray-Ban
एका चष्म्याची कहाणी, ज्यावर फिदा होते प्रत्येकाची जवानी  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • रे-बॅनची सुरुवात होऊन झाली 80 वर्षे
  • आजही जगातील सर्वोत्तम ब्रँड
  • पहिल्या महायुद्धात झाला प्रचंड फायदा

Story of Ray-Ban | रे-बॅनचे गॉगल घालणं ही गेल्या कित्येक पिढ्यांची स्टाईल बनली आहे. एकाद्या प्रॉडक्टचा ब्रँड कसा तयार होतो, याचं रे-बॅन हे जिवंत उदाहरण आहे. हा ब्रँड बाजारात येऊन आठ दशकांपेक्षा जास्त काळ उलटून गेला आहे. मात्र तरीही या ब्रँडची लोकप्रियता काही घटलेली नाही. उलट ती अधिकाधिक वाढतच चालली आहे. 

रे-बॅनचा इतिहास

लियोनार्डो डेल वेकियो हे रे-बॅन कंपनीचे मालक. त्यांचा वयाच्या 87 व्या वर्षी मृत्यू झाला. वेकियो कंपनीने लक्झोटिका ग्रुपकडून 1999 साली रे-बॅन कंपनी विकत घेतली होती. 

गॉगल म्हणजे रे-बॅन

गॉगल्स किंवा सनग्लासेसच्या दुनियेत रे-बॅनपेक्षा कुठलाही मोठा ब्रँड नाही. वेगवेगळ्या देशांचे राष्ट्राध्यक्ष, पंतप्रधान, सेलेब्रिटी, स्पोर्ट्समन असे सगळेच या ब्रँडचे सनग्लासेस वापरत असल्याचं आपण पाहतो. गेल्या कित्येक पिढ्यांना रे-बॅन गॉगल स्टाईल स्टेटमेंट देत आला आहे. 

अधिक वाचा - Gold-Silver Rate Today, 05 July 2022: सोन्यातील तेजी कायम, चांदीच्या भावातही चांगली वाढ, लगेच पाहा ताजा भाव

व्यवसायाची सुरुवात न्यूयॉर्कपासून

रे-बॅनच्या पॅरेंट कंपनीचं नाव होतं Bausch and Lomb. 1863 साली न्यूयॉर्कमध्ये या कंपनीची स्थापना करण्यात आली होती. ही कंपनी चष्मे, मायक्रोस्कोप, दुर्बिणी आणि टेलिस्कोप बनवत असे. इतरही काही उत्पादनं या कंपनीकडून तयार केली जात होती.

पहिल्या महायुद्धात सैन्याला पुरवठा

पहिल्या महायुद्धावेळी सैन्याकडून येणाऱ्या मागणीला भरपूर फायदा रे-बॅनला मिळाला. विशेषतः ऑप्टिकल उपकरणांची मोठी मागणी सैन्यदलाकडून नोंदवली जात असे. या काळात कंपनीचा बराच फायदा झाला. अमेरिकेच्या सैन्यालाही ही कंपनी उपकरणं पुरवत असे. त्यानंतर कंपनीच्या प्रवासात एक क्रांतीकारक वळण आलं.

अधिक वाचा - आरबीआयचा खासगी क्षेत्रातील मोठ्या बँकांना दणका; या २ बँकांना कोट्यवधीचा दंड, जाणून घ्या कारण

क्रांतीकारक वळण

1930 साली अमेरिकी सैन्यानं अशा सनग्लासेसची मागणी नोंदवली जे कडक उन्हात वापरता येतील. मग कंपनीनं गडद हिरव्या रंगाचे चष्मे तयार केले. हे गॉगल त्यावेळी टियर-ड्रॉप आकाराचे होते आणि अँटि ग्लेअर होते. तर 1937 साली कंपनीनं एव्हिएटर स्टाईल ग्लासेस बाजारात आणले.

रे-बॅन नाव कसं पडलं?

सर्वसामान्य माणसांसाठी जेव्हा कंपनीनं अँटीग्लेअर ग्लासेस बाजारात आणायला सुरुवात केली, तेव्हा त्याला रे-बॅन असं नाव देण्यात आलं. अल्ट्राव्हायोलेट किरणांना रोखणारे चष्मे अशा अर्थाने त्यांना रे-बॅन हे नाव देण्यात आलं होतं.

काही दिवसांतच देशभर प्रसिद्धी

1920 साली फारशा अमेरिकी लोकांना सनग्लासेस हा प्रकारही माहित नव्हता. मात्र 1938 साली 2 कोटींपेक्षा अधिक अमेरिकी नागरिकांनी हा ब्रँड विकत घेतला होता. रे-बॅन हे नाव आणि त्यानंतर एव्हिएटर स्टाईलचे गॉगल या दोन गोष्टींमुळे हे गॉगल तरुणांमध्ये प्रचंड लोकप्रिय होऊ लागले. याचे अनेक व्हेरियंट कंपनीने लॉन्च केले.

एव्हिएटर आणि वेफेयरर्सने गाठला कळस

1990 सालानंतर रे-बॅनच्या लोकप्रियतेचा आलेख हळूहळू खाली येऊ लागला होता. 1999 साली लक्झुटिका कंपनीनं ही कंपनी खरेदी केली आणि बेफेयरर्स गॉगल बाजारात आणत कंपनी रिलॉन्च केली. त्यानंतर पुन्हा या कंपनीच्या यशाचा प्रवास सुुरु झाला. आज सनग्लासेस बनवणारी रे-बॅन ही जगातील सर्वात मोठी कंपनी आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी