Electric Vehicles Sale update : नवी दिल्ली : देशात इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीत जबरदस्त वेगाने वाढ होते आहे. फाडा (FADA)या ऑटोमोबाईल डीलर्स संस्थेने संकलित केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील इलेक्ट्रिक वाहनांच्या (Electric Vehicles) किरकोळ विक्रीत गेल्या आर्थिक वर्षात तीन पटीने वाढ झाली आहे. 2021-22 या आर्थिक वर्षात एकूण इलेक्ट्रिक वाहन (EV Sale) किरकोळ विक्री 4,29,217 युनिट्सवर पोहोचली आहे. तीच 2020-21 या आर्थिक वर्षातील 1,34,821 युनिट्स इतकी होती. मागील आर्थिक वर्षात इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीत तिपटीने वाढ झाली आहे. (Electric vehicle sales jump over three times in the last fiscal year)
अधिक वाचा : Relief to Home Buyers | गृहकर्ज होणार स्वस्त... रिझर्व्ह बॅंकेने गृहकर्जाशी निगडीत नियम केले शिथिल
ऑटोमोबाईल डीलर्स बॉडी FADA ने संकलित केलेल्या आकडेवारीनुसार, इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीची माहिती समोर आली आहे. 2019-20 या आर्थिक वर्षात एकूण इलेक्ट्रिक वाहनांची विक्री 1,68,300 युनिट्सवर होती, असे त्यात नमूद करण्यात आले आहे. फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशन (FADA) च्या मते, गेल्या आर्थिक वर्षात इलेक्ट्रिक पॅसेंजर वाहनांची किरकोळ विक्री 17,802 होती. तर 2020-21 या आर्थिक वर्षात 4,984 युनिट्सची विक्री झाली होती. त्या तुलनेत ही वाढ तीन पटीने जास्त आहे.
अधिक वाचा : Tata Name | पहिल्यांदा जेव्हा कोणत्याही कंपनीसाठी‘टाटा’नाव वापरण्यात आले...त्याची रंजक कहाणी
देशांतर्गत विकसित वाहन प्रमुख टाटा मोटर्सने 15,198 युनिट्सच्या किरकोळ विक्रीसह आणि 85.37 टक्के मार्केट शेअरसह या क्षेत्रात आघाडी घेतली आहे. टाटा मोटर्सची किरकोळ विक्री 2020-21 या आर्थिक वर्षात 3,523 युनिट्स होती. एमजी मोटर इंडिया गेल्या आर्थिक वर्षात 2,045 युनिट्सच्या विक्रीसह 11.49 टक्के मार्केट शेअरसह दुसऱ्या स्थानावर स्थिरावली. 2020-21 या आर्थिक वर्षात त्याची किरकोळ विक्री 1,115 युनिट्स होती.
अधिक वाचा : Job Search | नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर, व्होडाफोन-आयडिया करवून घेणार सरकारी नोकऱ्यांसाठीची तयारी!
महिंद्रा अँड महिंद्रा आणि ह्युंदाई मोटर इंडिया अनुक्रमे 156 आणि 128 युनिट्सच्या डिस्पॅचसह तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर आहेत. दोघांचा बाजार हिस्सा 1 टक्क्यांपेक्षा कमी आहे. M&M आणि Hyundai यांनी 2020-21 आर्थिक वर्षात अनुक्रमे 94 आणि 184 युनिट्सची विक्री केली होती, असे FADA डेटामध्ये म्हटले आहे. गेल्या आर्थिक वर्षात इलेक्ट्रिक टू-व्हीलरची किरकोळ विक्री २,३१,३३८ युनिट्स झाली. तीच २०२०-२१ या आर्थिक वर्षात ४१,०४६ युनिट्स होती. गेल्या आर्थिक वर्षात विक्री पाच पटीने वाढली आहे. हीरो इलेक्ट्रिकने देशांतर्गत बाजारपेठेत 28.23 टक्के वाटा मिळवून 65,303 युनिट्सच्या विक्रीसह या विभागात आघाडी घेतली.
त्यानंतर ओकिनावा ऑटोटेकचा क्रमांक लागतो ज्याने गेल्या आर्थिक वर्षात 46,447 युनिट्सची किरकोळ विक्री केली होती. 24,648 युनिट्सच्या विक्रीसह अँपिअर व्हेइकल्सने तिसरे स्थान पटकावले. हिरो मोटोकॉर्प-समर्थित एथर एनर्जी 2021-22 या आर्थिक वर्षात 19,971 युनिट्सच्या नोंदणीसह चौथ्या स्थानावर आहे. बंगळुरूस्थित ओला इलेक्ट्रिक 14,371 युनिट्सच्या विक्रीसह सहाव्या स्थानावर आहे. तर TVS मोटर कंपनीने 9,458 युनिट्सच्या नोंदणीसह गेल्या आर्थिक वर्षात सातव्या स्थानावर आहे.
FADA ने एकूण 1,605 प्रादेशिक परिवहन कार्यालयांपैकी 1,397 वरून डेटा गोळा केला. त्यात असे म्हटले आहे की गेल्या आर्थिक वर्षात एकूण इलेक्ट्रिक थ्री-व्हीलर विक्री 1,77,874 युनिट्स होती. तर त्याआधीच्या आर्थिक वर्षात ही विक्री 88,391 युनिट्स होती. गेल्या आर्थिक वर्षात ही विक्री दुप्पट वाढली आहे. त्याचप्रमाणे, FADA ने नमूद केले की, 2020-21 या आर्थिक वर्षात 400 युनिट्सच्या तुलनेत गेल्या आर्थिक वर्षात इलेक्ट्रिक व्यावसायिक वाहनांची विक्री 2,203 युनिट्सपर्यंत वाढली आहे.