Electric Vehicles खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी, बीपीसीएल सुरू करणार ७,००० चार्जिंग स्टेशन

BPCL | भारत पेट्रोलियमचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अरुण कुमार सिंह यांनी कंपनीच्या इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंग पायाभूत सुविधेचे नेटवर्क तयार करण्याच्या योजनेबद्दल बोलताना म्हटले की पुढी काही वर्षात देशातील वाढत्या इलेक्ट्रिक वाहनांच्या उद्योगाला अनुरुप व्यवसाय करण्यासाठी ७,००० चार्जिंग स्टेशन बनवण्याचे टार्गेट कंपनीने ठेवले आहे.

EV Charging station by BPCL
बीपीसीएल सुरू करणार ईव्ही चार्जिंग स्टेशन 
थोडं पण कामाचं
  • वाहन उत्पादक कंपन्या इलेक्ट्रिक वाहनांसाठीच्या पायाभूत सुविधा विकसित करत आहेत
  • बीपीसीएल पुढील ५ वर्षात इलेक्ट्रिक वाहनांसाठी ७,००० चार्जिंग स्टेशन (Charging station) बनवणार
  • भारत सध्या चीन आणि अमेरिकेनंतर जगातील कार्बन डायऑक्साइड उत्सर्जन करणारा तिसऱ्या क्रमांकाचा देश

Electric Vehicles | नवी दिल्ली: देशात टाटा मोटर्स (Tata Motors), एमजी मोटर्स (MG Motors) आणि इथरसारख्या वाहन उत्पादक कंपन्या इलेक्ट्रिक वाहनांसाठीच्या पायाभूत सुविधा विकसित करत आहेत. आता यात भारत पेट्रोलियमचीदेखील (BPCL) भर पडणार आहे. बीपीसीएलने घोषणा केली आहे की ते पुढील ५ वर्षात इलेक्ट्रिक वाहनांसाठी ७,००० चार्जिंग स्टेशन (EV Charging station) बनवणार आहेत. या स्टेशनना एनर्जी स्टेशन असे संभोधले जाणार आहे. बीपीसीएलने म्हटले आहे की इलेक्ट्रिक वाहनांच्या पायाभूत सुविधांमुळे कंपनीला एक नवी संधी मिळणार आहे. आगामी वर्षांमध्ये भारतामधील इलेक्ट्रिक वाहनांसाठीची (Electric Vehicles) व्यवस्था आणखी मजबूत होण्याची चिन्हे आहेत. कारण ग्राहक इलेक्ट्रिक वाहनांकडे आपला रस दाखवत आहेत, त्याचबरोबर वाहन उत्पादकदेखील इलेक्ट्रिक वाहनांकडे लक्ष देत आहेत. (Electric Vehicles : BPCL to start 7,000 charging stations for Electric vehicles)

बीपीसीएलच्या आगामी योजना

भारत पेट्रोलियमचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अरुण कुमार सिंह यांनी कंपनीच्या इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंग पायाभूत सुविधेचे नेटवर्क तयार करण्याच्या योजनेबद्दल बोलताना म्हटले की पुढी काही वर्षात देशातील वाढत्या इलेक्ट्रिक वाहनांच्या उद्योगाला अनुरुप व्यवसाय करण्यासाठी ७,००० चार्जिंग स्टेशन बनवण्याचे टार्गेट कंपनीने ठेवले आहे. या स्टेशनना एनर्जी स्टेशन असे म्हटले जाणार आहे. ईव्ही चार्जिंग पायाभूत सुविधा त्या पाच महत्त्वाच्या क्षेत्रांपैकी एक आहे ज्यावर बीपीसीएल पेटकेम, गॅस, कन्झ्युमर रिटेलिंग, रिन्युएबल्स आणि बायोफ्युएल्ससोबत काम करते आहे. ही क्षेत्रे देशाची ऊर्जेची गरज पूर्ण करतील.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्रसंघात हवामान बदलासंदर्भातील परिषदेत म्हटले होते आम्ही भारताला २०७० पर्यत शून्य कार्बन उत्सर्जन देश बनण्यासाठी कटिबद्ध आहोत. त्या पार्श्वभूमीवर बीपीसीएलची चार्जिंग स्टेशनची घोषणा झाली आहे. भारत सध्या चीन आणि अमेरिकेनंतर जगातील कार्बन डायऑक्साइड उत्सर्जन करणारा तिसऱ्या क्रमांकाचा देश आहे. जगाच्या एकूण कार्बन उत्सर्जनाच्या हे ७ टक्के इतके प्रमाण आहे.

जागतिक हवामान बदलाचे संकट

जगात सध्या कोरोना महामारीचे संकट आहे. मात्र याहूनही मोठे असे हवामान बदलाचे किंवा ग्लोबल वार्मिंगचे संकट जगासमोर आ वासून उभे आहे. सर्व देश आणि आंतरराष्ट्रीय संघटना यासंदर्भात प्रयत्न करत आहेत. क्लायमेट चेंज किंवा हवामान बदलासंदर्भात पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे की भारताने २०७० पर्यत नेट झीरो कार्बन उत्सर्जनाचे उद्दिष्ट ठेवले आहे. जगातील सर्वात मोठी ऊर्जा संघटन असलेल्या इंटरनॅशनल एनर्जी फोरमने या निर्णयाचे कौतुक केले आहे. एका अहवालानुसार जागतिक कार्बन उत्सर्जन कोरोना महामारीच्या पूर्वी असलेल्या पातळीवर पोचते आहे.

जीवाश्म इंधनापासून तयार होणाऱ्या कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण २०२० मध्ये त्याआधीच्या तुलनेत ५.४ टक्के कमी झाले होते. मात्र यावर्षी २०२०च्या पातळीच्या तुलनेत कार्बन उत्सर्जनात ४.९ टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. याचे कारण जागतिक बाजारपेठ आणि अर्थव्यवस्था पुन्हा गतीमान होऊ लागल्याने इंधनाची झालेली वाढ हे आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी