पेट्रोल-डिझेलचे भाव गगनाला, इलेक्ट्रिक कार चालवणे स्वस्त? जाणून घ्या गणित

देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर वेगाने वाढत आहेत. अशा परिस्थितीत इलेक्ट्रिक कार चालवणे स्वस्त होणार? जाणून घेऊया याचे गणित.

Electric Charging station
प्रातिनिधीक फोटो  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • भारतात पेट्रोल-डिझेलचे भाव गगनाला
  • इलेक्ट्रिक वाहनांचा वापर स्वस्त होणार
  • १ रुपया प्रति किमी येवढा येऊ शकतो खर्च

मुंबई : भारतात पेट्रोल (Petrol) आणि डिझेलचे (Diesel) भाव रॉकेटप्रमाणे थेट गगनाला भिडत आहेत. ते आणखीन किती वाढतील हे सांगणे कठिण आहे. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतीने सामान्यांना वाहन चालवावे की नाही असा विचार करण्यास भाग पाडले आहे. आतातर, लोकांकडे इलेक्ट्रिक वाहनांचा पर्याय उपलब्ध आहे. परंतु, पेट्रोल-डिझेलच्या गाड्यांपेक्षा इलेक्ट्रिक वाहन वापरणे परवडणारे असेल का हा प्रश्नच आहे. इलेक्ट्रिक वाहनांसाठी मुलभूत सुविधा अद्यापही उपलब्ध नाहीत. परंतु, आज आपण यासंबंधीत इतर गोष्टींवर लक्ष केंद्रीत करूया. 

आयएएनएसच्या वृत्तानुसार, इलेक्ट्रिक वाहन चालवणे पारंपारिक वाहनांपेक्षा कमी खर्चिक असल्याचे दिसून येत आहे. रिपोर्टमध्ये म्हटल्याप्रमाणे सध्यस्थितीत पेट्रोलचे भाव शंभरच्य़ा पुढे जाण्यासाठी वेगाने वाढत आहेत. तर, डिझेलसुद्धा ८०रू प्रति लिटर झाले आहे. याच्या तुलनेत, इलेक्ट्रिक वाहनांसाठी लागणारा खर्च अंदाजे १ रू प्रति किमी येवढा आहे. हेच पेट्रोल गाड्यांसाठी ९ रू, डिझेल गाड्यांसाठी ६ रू आणि सीएनजीवर चालणाऱ्या वाहनांसाठी २.५ रू प्रति किमी इतका आहे. इलेक्ट्रिक वाहनांना लागणारा खर्च विविध राज्यांतील प्रति युनिट वीजदरानुसार बदलू शकतो.

इलेक्ट्रिक वाहन चालवण्यास येणारा खर्च, पाहूया गणित 

रिपोर्टमध्ये हे स्पष्ट म्हटले आहे की, सुरूवातीच्या काळात गाडीच्या बॅटरिच्या आकारावरून त्या गाडीची किंमत ठरवली जाईल. कारण, घरगुती ७ किलोवॅट प्रति तास क्षमता असलेल्या चार्जरला ४० किलोवॅटची बॅटरी चार्ज करण्यासाठी ६-८ तास लागतात. घरात अशी व्यवस्था उभी करण्यासाठी लागणारे परवाणे, वायर यांचाही खर्च यात ग्राह्य धरला जातो. तथापि, एकदा या मूळ सुविधा उपलब्ध झाल्यास येणारा खर्च हा वीजेच्या प्रति युनिट खर्चा इतका आहे.

नवी दिल्लीतील एका इलेक्ट्रिक वाहनाचे उदाहरण पाहूया. इथे घरी वाहन चार्ज करण्यासाठी प्रति युनिट ६.२५ रू इतका किमान खर्च होतो. यानुसार, ४० किलोवॅटच्या बॅटरीला चार्ज करण्यासाठी ६-८ तास लागतील. त्याचा एकूण खर्च २५० रू इतका असेल. ह्युंदाई कोना इलेक्ट्रिकसारख्या कारांमध्ये ४० किलोवॅट बॅटरी आहे. ही एकदा चार्ज केल्यास कार ३५०-४०० किमी धावू शकते. याप्रमाणे, एका इलेक्ट्रिक वाहनासाठी १रू प्रति किमी येवढा खर्च येईल असा अंदाज या रिपोर्टमध्ये व्यक्त केला आहे. त्यामुळे, इलेक्ट्रिक वाहन चालवणे तुमच्या फायद्याचेच ठरणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी