Elon Musk Wealth | इलॉन मस्ककडे आता वॉरेन बफेंपेक्षा तिप्पट संपत्ती, दक्षिण आफ्रिकेच्या जीडीपीपेक्षा जास्त पैसा, इतिहासातील सर्वात श्रीमंत व्यक्ती

Elon Musk Wealth | जागतिक बॅंकेच्या आकडेवारीनुसार मागील वर्षी दक्षिण आफ्रिकेचा जीडीपी म्हणजे एकूण राष्ट्रीय उत्पन्न ३०१.९ अब्ज डॉलर इतके होते. इलॉन मस्क यांची संपत्ती दक्षिण आफ्रिकेच्या जीडीपीपेक्षादेखील जास्त झाली आहे.

Elon Musk Wealth 3 times more than Buffett
बफेंच्या संपत्तीपेक्षा तिप्पट संपत्ती इलॉन मस्ककडे 
थोडं पण कामाचं
  • इलॉन मस्क यांच्या संपत्तीत एखाद्या सुपरसॉनिक जेटच्या वेगाने वाढ
  • टेस्लाचे मालक असलेल्या इलॉन मस्क यांच्याकडे यांच्याकडे आता ३३५ अब्ज डॉलरची संपत्ती
  • मस्क यांची संपत्ती जेफ बेझॉसपेक्षा १४२ अब्ज डॉलर जास्त

Elon Musk | न्यूयॉर्क: जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या इलॉन मस्क (Elon Musk) यांची संपत्ती एखाद्या सुपरसॉनिक जेटच्या वेगाने वाढते आहे. मागील काही दिवसात झालेल्या वाढीमुळे आता इलॉन मस्क यांच्या संपत्तीत आणि जगातील टॉप श्रीमंतांच्या (World's Richest persons)संपत्तीत मोठे अंतर निर्माण झाले आहे. जगविख्यात गुंतवणुकगुरू वॉरेन बफे (Warren Buffett) यांच्या संपत्तीपेक्षा इलॉन मस्क यांची संपत्ती तिप्पट झाली आहे. तर इलॉन मस्क मूळचे ज्या देशाचे आहेत त्या देशाची म्हणजे दक्षिण आफ्रिकेच्या एकूण जीडीपी (South Africa's GDP) म्हणजे अर्थव्यवस्थेपेक्षाही जास्त संपत्ती एकट्या इलॉन मस्ककडे आहे. टेस्लाचे मालक असलेल्या इलॉन मस्क यांच्याकडे यांच्याकडे आता ३३५ अब्ज डॉलरची (Elon Musk Wealth)संपत्ती आहे. टेस्लाच्या शेअरच्या (Share price of Tesla)) किंमतीत सोमवारी ८.५ टक्क्यांची तेजी आल्यानंतर मस्क यांच्या संपत्तीत जबरदस्त वाढ झाली आहे. (Elon Musk Wealth : After surge in Tesla Stocks, Elon Musk's net worth is now $335 billion, 3 times more than Warren Buffet)

इतिहासातील सर्वात श्रीमंत व्यक्ती

इलॉन मस्क यांच्याकडे आता जितक संपत्ती आहे तितकी अलीकडच्या इतिहासात एखाद्या माणसाकडे कधीही नव्हती. ३०० अब्ज डॉलरपेक्षा जास्त संपत्ती असणारे ते पहिलेच व्यक्ती ठरले आहेत. ते जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती तर आहेतच. मात्र मस्कच्या संपत्तीत आणि टॉप ५ श्रीमंतांच्या संपत्तीतदेखील आता मोठे अंतर निर्माण झाले आहे. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असे बिरुद आयुष्यभर मिरवलेल्या वॉरेन बफे यांच्या संपत्तीपेक्षादेखील तिप्पट संपत्ती आज मस्क यांच्याकडे आहे यावरून मस्क यांच्याकडे किती प्रचंड संपत्ती असेल याचा अंदाज तुम्ही करू शकता. 

दक्षिण आफ्रिकेच्या जीडीपीपेक्षाही अधिक पैसा

सोमवारी टेस्लाच्या शेअरमध्ये मोठी तेजी आली. त्यानंतर २४ अब्ज डॉलरची वाढ झाली. ब्लूमबर्ग बिलियनेर इंडेक्सनुसार बर्कशायर हॅथवेचे सीईओ वॉरेन बफे यांची संपत्ती १०४ अब्ज डॉलर आहे. ही आकडेवारी लक्षात घेता मस्क आता बफेंच्या तिप्पट श्रीमंत झाले आहेत. इलॉन मस्क यांचे वय ५० वर्षे आहे. जागतिक बॅंकेच्या आकडेवारीनुसार मागील वर्षी दक्षिण आफ्रिकेचा जीडीपी म्हणजे एकूण राष्ट्रीय उत्पन्न ३०१.९ अब्ज डॉलर इतके होते. इलॉन मस्क यांची संपत्ती दक्षिण आफ्रिकेच्या जीडीपीपेक्षादेखील जास्त झाली आहे.

एकाच वर्षात कमावले १६५ अब्ज डॉलर

विशेष म्हणजे २०२१ या एकाच वर्षात इलॉन मस्क यांच्या संपत्तीत तब्बल १६५ अब्ज डॉलरची वाढ झाली आहे. ही वाढ अभूतपूर्व अशीच आहे. टेस्लाचे २२.५ टक्के शेअर इलॉन मस्क यांच्या मालकीचे आहेत. मागील वर्षी टेस्लाच्या शेअरमध्ये १३ टक्के वाढ झाल्यानंतर मस्क यांनी एकाच दिवसात ३६ अब्ज डॉलरची कमाई केली होती. हर्ट्झने टेस्लाला १ लाख गाड्यांची ऑर्डर दिल्याचे वृत्त समोर आल्यानंतर टेस्लाचा शेअर बुलेट ट्रेनच्या वेगाने पळू लागला आहे.

जेफ बेझॉसपेक्षा १४२ अब्ज डॉलर जास्त संपत्ती

मस्क यांच्यानंतर दुसऱ्या क्रमांकाची श्रीमंत व्यक्ती असलेले अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझॉस यांच्याकडे १९३ अब्ज डॉलरची संपत्ती आहे. म्हणजेच जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या श्रीमंत व्यक्तीपेक्षा तब्बल १४२ अब्ज डॉलर जास्त संपत्ती मस्क यांच्याकडे आहे. यावर्षी आतापर्यत टेस्लाच्या शेअरमध्ये विक्रमी ६५.६ टक्के वाढ झाली आहे. मार्च आणि मे महिन्यात या शेअरमध्ये घसरण झाली होती. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी