Elon Musk Update : तुम्हाला अल्गोरिदमद्वारे फसवले जातंय, इलॉन मस्कचा ट्विटरच्या युजर्सना इशारा

Elon Musk Tweet : टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क (Elon Musk)यांनी ट्विटरच्या युजर्सना (Twitter Users)सावधगिरीचा इशारा दिला आहे. मस्कने म्हटले आहे की ट्विटरमधील "अल्गोरिदम" अशा प्रकारे हाताळले जात आहेत की ते युजर्सच्या लक्षात येत नाहीत. मस्क यांनी ट्विटरवर ट्विट (Musk Tweet) करत म्हटले आहे की, "ट्विटरवरील तुम्हाला अल्गोरिदमद्वारे अशा प्रकारे हाताळले जात आहे की तुम्हाला कळत नाही.''

Elon Musk latest Tweet
इलॉन मस्कचे ताजे ट्विट 
थोडं पण कामाचं
  • इलॉन मस्कने ट्विटरसंदर्भात युजर्सना दिला इशारा
  • ट्विटरच्या अल्गोरिदमसंदर्भात मस्कने युजर्सना दिला इशारा
  • मस्कने ट्विटरबरोबरचा 44 अब्ज डॉलरचा सौदा स्थगित केला आहे

Elon Musk latest News : नवी दिल्ली : टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क (Elon Musk)यांनी ट्विटरच्या युजर्सना (Twitter Users)सावधगिरीचा इशारा दिला आहे. मस्कने म्हटले आहे की ट्विटरमधील "अल्गोरिदम" अशा प्रकारे हाताळले जात आहेत की ते युजर्सच्या लक्षात येत नाहीत. मस्क यांनी ट्विटरवर ट्विट (Musk Tweet) करत म्हटले आहे की, "ट्विटरवरील तुम्हाला अल्गोरिदमद्वारे अशा प्रकारे हाताळले जात आहे की तुम्हाला कळत नाही.'' मस्कच्या ट्विटरसंदर्भातील या नव्या ट्विटची आता जोरदार चर्चा आहे. आधीच ट्विटरबरोबरचा सौदा इलॉन मस्कने स्थगित केल्यामुळे आता मस्क ट्विटरसंदर्भात कोणती भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.   (Elon Musk alerts Twitter users about manipulation by the algorithm) 

अधिक वाचा : EPFO Update : पीएफखातेधारकांच्या खात्यात जमा होणार पैसे, या नंबरवर लगेच चेक करा तुमचा बॅलन्स

इलॉन मस्कने आधीच ट्विटरबरोबरचा सौदा केला आहे स्थगित

अलीकडेच ट्विटरबरोबरचा सौदा स्थगित करण्याच्या इलॉन मस्कच्या ट्विटने सर्वांनाच धक्का दिला होता. ट्विटरमधील बनावट अकाउंटच्या संख्येसंदर्भात मस्कचे ट्विट होते. ट्विटरमधील स्पॅम आणि बनावट खाती एकूण युजर्सपेक्षा 5 टक्क्यांपेक्षा कमी आहेत, याची खातरजमा करणारी आकडेवारी समोर येईपर्यत ट्विटरबरोबरचा 44 अब्ज डॉलरचा करार तात्पुरता थांबण्याचे ट्विट इलॉन मस्क यांनी करून सर्वांना आश्चर्यात टाकले होते.

अधिक वाचा : Gold-Silver Rate Today, 14 May 2022: धुमधडाक्यात करा लग्न, सोने झाले स्वस्त...पाहा ताजा भाव

इलॉन मस्कने ट्विटमध्ये युजर्सना दिल्या सूचना

मस्कने आपल्या ताज्या ट्विटमध्ये सांगितले की युजर्ससाठी त्यांचे ट्विटर फीड "निश्चित" करणे खूप महत्वाचे आहे. इलॉन मस्कने पुढील तीन स्टेप्स सुचवल्या ज्याद्वारे हे करता येईल:

1. 'होम' बटण टॅप करा
2. स्क्रीनच्या वरच्या उजवीकडे असणाऱ्या स्टार्सवर टॅप करा.
3. 'लेटेस्ट ट्विट' निवडा

असे केल्याने "फरक पाहण्यासाठी मागे आणि पुढे जाणे सोपे आहे," असे इलॉन मस्क यांनी ट्विट केले आहे.

अधिक वाचा : CNG Price Update : सीएनजी झाला महाग, पाहा आज पेट्रोल-डिझेल स्वस्त झाले की महाग?

इलॉन मस्कने दिला होता धक्का

स्पॅम/बनावट खाती 5% पेक्षा कमी युजर्सचे प्रतिनिधित्व करतात अशा प्रकारचे कॅल्क्युलेशन दाखवणारी माहिती समोर येईपर्यत ट्विटरबरोबरचा सौदा (Twitter Deal on hold) तात्पुरता स्थगित करण्यात येत असल्याचे धक्कादायक ट्विट इलॉन मस्कने काही दिवसांपूर्वीच केले आहे.  इलॉन मस्क यांच्या या धक्कादायक ट्विटमुळे एकच खळबळ उडाली आहे. आता इलॉन मस्कच्या ट्विटरबरोबरच्या सौद्याचे काय होणार यावर अनेक अंदाज वर्तवले जात आहेत. इलॉन मस्कची ट्विटरबरोबरचा सौदा पूर्णत्वास जाणार की नाही यावरही चर्चा होते आहे. काही दिवसांआधीच इलॉन मस्क हे ट्विटर विकत घेण्यासाठी अत्यंत उत्साही होते आणि त्यासाठी त्यांचे जोरदार प्रयत्न सुरू होते. व्यवस्थितपणे लॉबिंग करत इलॉन मस्क यांनी ट्विटरबरोबरचा सौदा केलासुद्धा होता. इलॉन मस्क यांनी ट्विटर विकत घेतल्याचे जाहीर करताच सर्वांनाच धक्का बसला होता. 

गेल्या काही आठवड्यांपासून, मस्क Twitter चा कामकाजी खर्च कमी करण्याबद्दल बोलत आहे. कंपनीच्या संचालक मंडळाचे पगार कमी करण्याबद्दल किंवा बंद करण्याबद्दलदेखील मस्कने ट्विट केले आहे. यामुळे सुमारे 30 लाख डॉलर्सची बचत होऊ शकते असे इलॉन मस्कचे म्हणणे आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी