Elon Musk update | सोशल मीडियासाठी महत्त्वाची बातमी...इलॉन मस्कची ट्विटरच्या संचालक मंडळावर नियुक्ती

Twitter Board : सोशल मीडियाच्या क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या ट्विटरने (Twitter) आता इलॉन मस्क यांची नियुक्ती ट्विटरच्या संचालक मंडळावर (Musk appointed to Twitter board) नियुक्ती करत असल्याचे जाहीर केले आहे. इलॉन मस्कने देखील या निर्णयाचे स्वागत करत ट्विटरमध्ये आगामी महिन्यांमध्ये मोठी सुधारणा घडवण्याचे सूतोवाच केले आहे. दोनच दिवसांपूर्वी इलॉन मस्क यांनी ट्विटरच्या एकूण शेअर्सपैकी 9.2 टक्के शेअर्स विकत घेतल्याची माहिती समोर आली होती.

Elon Musk appointed on the board of Twitter
इलॉन मस्कची ट्विटरच्या संचालक मंडळावर नियुक्ती  
थोडं पण कामाचं
  • इलॉन मस्क यांची नियुक्ती ट्विटरच्या संचालक मंडळावर नियुक्ती
  • इलॉन मस्क यांनी ट्विटरमधील 9.2 टक्के हिस्सेदारी उघड केली आहे
  • ट्विटरच्या संचालक मंडळासोबत काम करण्यास मी उत्सुक असल्याचे ट्विट यानंतर मस्क यांनी केले आहे.

Elon Musk appointment on Tiwtter board : न्यूयॉर्क :  टेस्लाचे सीईओ आणि स्पेसएक्सचे संस्थापक इलॉन मस्क (Elon Musk) यांनी ट्विटरमधील 9.2 टक्के हिस्सेदारी उघड केल्यानंतर आता एक महत्त्वाची घडामोड झाली आहे. सोशल मीडियाच्या क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या ट्विटरने (Twitter) आता इलॉन मस्क यांची नियुक्ती ट्विटरच्या संचालक मंडळावर (Musk appointed to Twitter board) नियुक्ती करत असल्याचे जाहीर केले आहे. इलॉन मस्कने देखील या निर्णयाचे स्वागत करत ट्विटरमध्ये आगामी महिन्यांमध्ये मोठी सुधारणा घडवण्याचे सूतोवाच केले आहे. दोनच दिवसांपूर्वी इलॉन मस्क यांनी ट्विटरच्या एकूण शेअर्सपैकी 9.2 टक्के शेअर्स विकत घेतल्याची माहिती समोर आली होती. (Elon Musk appointed on the board of Twitter)

अधिक वाचा : Elon Musk Investment | इलॉन मस्कचा मास्टर स्ट्रोक, गुपचूप विकत घेतली या कंपनीची मोठी हिस्सेदारी, बातमी येताच शेअरमध्ये तुफान तेजी...

ट्विटरने केली घोषणा

मस्कची ट्विटरच्या बोर्डावर नियुक्तीची घोषणा करताना, ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल यांनी बोर्डावर मस्कचे स्वागत उत्साहाने केले. पराग अग्रवाल म्हणाले की "अलीकडच्या काही आठवड्यात इलॉनशी झालेल्या संभाषणातून, आमच्यासाठी हे स्पष्ट झाले की त्यांच्याकडून आमच्या संचालक मंडळाला मार्गदर्शन मिळत मोठाच फायदा होणार आहे." परागने त्याच्या वैयक्तिक हँडलवरून हे पोस्ट केले  आहे. 

अधिक वाचा : Government Scheme | आता सरकार विवाहितांना देणार मोठा लाभ, दरमहा मिळणार 44,793 रुपये

मस्कने केले ट्विटरच्या घोषणेचे स्वागत

अग्रवाल यांच्या ट्विटला मस्कने त्वरीत उत्तर दिले आणि पोस्ट केले की "येत्या काही महिन्यांत ट्विटरमध्ये लक्षणीय सुधारणा करण्यासाठी पराग आणि ट्विटरच्या संचालक मंडळासोबत काम करण्यास मी उत्सुक आहे!" ट्विटरच्या 2024 च्या स्टॉकहोल्डर्सच्या वार्षिक बैठकीत टर्म संपत असताना मस्क वर्ग II संचालक म्हणून काम करतील. ट्विटरच्या संचालक मंडळावर नियुक्ती झाल्यानंतर मस्क यांना आता ट्विटरच्या शेअरचे नव्याने व्यवहार करता येणार नाहीत किंवा आपला मालकी हिस्सा वाढवता येणार नाहीत. "जोपर्यंत मिस्टर मस्क संचालक मंडळावर सेवा देत आहेत आणि त्यानंतर 90 दिवसांपर्यंत, इलॉन मस्क, एकटे किंवा समूहाचे सदस्य म्हणून, कंपनीच्या 14.9% पेक्षा जास्त सामान्य शेअर्सचे लाभार्थी मालक होणार नाहीत. अशा वेळी डेरिव्हेटिव्ह सिक्युरिटीज, स्वॅप किंवा हेजिंग व्यवहारांद्वारे आर्थिक प्रदर्शनासह या उद्देशांचाही यात समावेश असेल," असे ट्विटरने आपल्या फाइलिंगमध्ये जोडले आहे.

अधिक वाचा : Earning Tips | फक्त 15 मिनिटांसाठी ई-मेल वाचून पैसे कमविण्याची उत्तम संधी, दरमहा करा दणकून कमाई

ट्विटरच्या शेअर्समध्ये आली तेजी

सोमवारी 27 टक्‍क्‍यांवर बंद झाल्यानंतर सुरुवातीच्या सत्रापूर्वी ट्विटरच्या शेअर्सच्या किंमतीमध्ये 6 टक्क्यांची वाढ झाली. मार्चच्या अखेरीस, टेस्ला प्रमुख आणि स्पेसएक्सचे संस्थापक असलेले इलॉन मस्क म्हणाले की ते नवीन सोशल मीडिया प्लॅटफॉर्म तयार करण्यासंदर्भात "गंभीरपणे विचार" करत आहेत. त्यामुळे इलॉन मस्क लवकरच एखादी सोशल मीडिया कंपनी सुरू करणार की काय याविषयी जोरदार चर्चा सुरू झाली होती. स्वत: ट्विटरचा मोठ्या प्रमाणात वापर करणाऱ्या इलॉन मस्कने ट्विटर आणि त्याच्या धोरणांवर मोठी टीका केली आहे. त्यांनी म्हटले आहे की कंपनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या तत्त्वांचे पालन करण्यात अयशस्वी होऊन लोकशाहीचे नुकसान करत आहे.  

टेस्लाची कामगिरी

दरम्यान, टेस्लाने शनिवारी पहिल्या तिमाहीत विक्रमी इलेक्ट्रिक वाहन वितरणाची नोंद केली. परंतु पुरवठा साखळीतील व्यत्यय आणि चीनमधील उत्पादन प्रकल्पाच्या निलंबनामुळे त्याचे उत्पादन मागील तिमाहीपेक्षा कमी झाले. सीईओ इलॉन मस्क यांनी ट्विट केले की, पुरवठा साखळीतील व्यत्यय आणि चीनच्या शून्य कोविड धोरणामुळे ही अपवादात्मक कठीण तिमाही होती. टेस्लाने या तिमाहीत 310,048 वाहने वितरीत केली. ही संख्या मागील तिमाहीच्या तुलनेत थोडी जास्त आणि एका वर्षापूर्वीच्या याच तिमाहीशी तुलना करता 68% जास्त आहेत.


ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी